राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठचे कुलगुरु प्रशांत पाटील हटवा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात ... कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा अशी घोषणा देत विद्रोही विद्यार्थी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुक दरम्यान आचारसंहिता भंग केल्याच्या घटना कुलगुरू यांचेकडून घडल्या आहेत. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी होऊन कार्यवाही झाली आहे. कुलगुरू यांचेवर गुन्हे दाखल करून अटक करावी असे आदेश देखील झाले आहेत.
आदिवासी विद्यार्थी कल्याण निधी गैरवापर, महिला अत्याचाराचे कोर्टात सुरु असलेले प्रकरण ई सह अनेक तक्रारी आणि आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करावी असा आदेश इतके गंभीर आरोप असतानादेखील अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शासन प्रशासन स्पष्टपणे पाठीशी घालत आहे. राज्यपाल महोदयांना सुस्ती आल्या सारखे झाले आहे.
अश्या परिस्थितीत विद्रोही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रच्या वतीने राज्यपाल भवनावर मोटार सायकल 'लॉग मार्च' काढून महात्मा फुले कृर्षी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या अनागोंदी कारभाराचे पुरावे सादर करणार आहोत.
Comments
Post a Comment