अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीसाठी वायसीएम इन्टरनॅशनल गेस्ट हाऊस , (एर्नाकुलम) कोच्ची,राज्य -केरळ येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती.एक्झिक्युटिव्ह कोअर कमिटी तसेच जनरल कौन्सिल बैठकीच्या शिफारशी नूसार नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक संपन्न होऊन त्यामध्ये पुढील तीन वर्षासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवराज बुरीकर(कर्नाटक),राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे (महाराष्ट्र),राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी (ओडिशा), राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी उमा शंकर सिंग(उत्तर प्रदेश)यांची तर राष्ट्रीय संयुक्त सचिवपदी श्रीम विनयश्री पेडणेकर , सिंधुदूर्ग (महाराष्ट्र ) यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती संघाचे राज्य संयुक्तचिटणीस राजेंद्र निमसे व संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर यांनी दिली .
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या स्थापनेनंतर प्रथमच दक्षिणात्य राज्याला शिक्षक संघाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली असून कर्नाटकचे बसवराज गुरीकर यांना हा मान प्रथमच मिळाला आहे. या संघटनेचे आद्य संस्थापक दादासाहेब उर्फ मो.वा.दोंदे,
शिक्षक नायक प्रा.अरुण भाई दोंदे,स्व.नेत्या सुलभाताई दोंदे यांच्यानंतर महाराष्ट्रातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे विद्यमान राज्याध्यक्ष मा देविदास बस्वदे(जि नांदेड) यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच राज्य कोषाध्यक्षा श्रीम विनयश्री पेडणेकर यांना(जिल्हा - सिंधुदूर्ग)अखिल भारतीय स्तरावर संयुक्तसचिव या पदावर नूतन कार्यकारिणी मध्ये संधी मिळालेली आहे.
या बैठकीस सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्यकार्याध्यक्ष अण्णाजी आडे, राज्य महिला विभाग प्रमुख श्रीम उर्मिला बोंडे, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील,दीपक भुजबळ(सातारा),रमेश सूर्यवंशी(हिंगोली),रामु गोतमारे(नागपूर),सोपान चांदे (रायगड)आदींची उपस्थिती होती.
या निवडीबद्दल राज्य संयुक्तचिटणीस राजेंद्र निमसे, राज्य संघटक बाळासाहेब कदम,संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर,जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष विलास लवांडे,जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर बोऱ्हाडे,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण,जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले,जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर रणदिवे , जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर,ऐक्य मंडळाचे जिल्हा नेते विष्णू बांगर,संजय शेळके, डीसीपीएसचे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव,पदवीधरचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद,जिल्हानेते राजकुमार शहाणे,संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर डहाळे,महेश लोखंडे,ज्ञानदेव कराड,प्रकाश पटेकर,भाऊसाहेब घोरपडे, नितीन थोरात,बजरंग बांदल, प्रकाश पटेकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता उदबत्ते,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, बँकेच्या माजी संचालिका संगीता राजेंद्र निमसे,जिल्हा संयुक्त चिटणीस मनिषा क्षेत्रे, संगीता निगळे,नगर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सविता नागरे,नगर संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग देवकर,पारनेर संघाचे अध्यक्ष लक्ष्मण चेमटे,ऐक्य मंडळाचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष ठाणगे,रवींद्र अनाप,लहू फलके,संजय सोनवणे,जनार्दन काळे,प्रताप कदम,बथूवेल हिवाळे,उद्धव डमाळे ,नंदू गायकवाड,पांडुरंग झरेकर,शिवाजी माने,सुखदेव डेंगळे,बंडू नागरगोजे,लक्ष्मण जटाडे,बबन देशमुख,राजेंद्र सोनवणे,शहाजी जरे,प्रदीप कांबळे,विनायक गोरे,अशोक दहिफळे,प्रविण शेळके,रविंद्र दरेकर,संजय कांबळे,वर्षा शिरसाठ,शितल ससे,आदिनाथ पोटे,राजेंद्र गांगर्डे,विशाल कुलट, राहुल व्यवहारे,अमोल मुरकुटे, प्रविण खाडे,आदिल शेख, संजय थोरात,सर्जेराव ससाणे,बाळासाहेब जाधव, आबा कडूस,मुकुंद शिंदे,मच्छिंद्र कडाळी,संजय तेलोरे,संदीप शेळके,राजाराम वणे यांनी केले आहे .
Comments
Post a Comment