अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे संघाचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कोची (केरळ) येथे दिमाखात संपन्न अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीसाठी वायसीएम इन्टरनॅशनल गेस्ट हाऊस , (एर्नाकुलम) कोच्ची,राज्य -केरळ येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती.एक्झिक्युटिव्ह कोअर कमिटी तसेच जनरल कौन्सिल बैठकीच्या शिफारशी नूसार नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक संपन्न होऊन त्यामध्ये पुढील तीन वर्षासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवराज बुरीकर(कर्नाटक),राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे (महाराष्ट्र),राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी (ओडिशा), राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी उमा शंकर सिंग(उत्तर प्रदेश)यांची तर राष्ट्रीय संयुक्त सचिवपदी श्रीम विनयश्री पेडणेकर , सिंधुदूर्ग (महाराष्ट्र ) यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती संघाचे राज्य संयुक्तचिटणीस...