मतदान यंत्र एकत्रीकरण झाले

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ

  जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या  उपस्थितीत जिल्ह्यातील 3 हजार 734 मतदान  केंद्रांसाठी द्यावयाच्या मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन)  प्रकिया बुधवारी करण्यात आली.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, भूसंपादन अधिकारी चंद्रशेखर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आदी उपस्थित होते.
  जिल्ह्यातील ३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभा मतदार संघ  व ३८- शिर्डी अनुसूचित जाती लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभा मतदारसंघ अशा एकुण १२ विधानसभा मतदार संघाच्या आवश्यकतेनुसार  9 हजार 517 बॅलेट युनिट, 5 हजार 194 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 644 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. अंतिमतः 4478 सीयू, 4478 बीयु  व 4850 व्हीव्हीपॅट   याचे दोन लोकसभा 
मतदारसंघतील 12 विधान सभा साठी वाटप करण्यात आले.
     तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
       सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जयंत वाघ, प्रताप शेळके, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अमोल जाधव, भारतीय जनता पक्षाचे सचिन पारखी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार