शेतकरी दौ-याचे आयोजन
शेतकरी अभ्यास दौर्याचे आयोजन
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी.के. ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत निघोज, ता. पारनेर येथे रसाळ डाळिंब फार्म येथे एक दिवसीय शेतकरी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ यांनी शेतकर्यांना त्यांच्या प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की डाळिंब लागवड, तण नियंत्रण, एकात्मिक अन्नदव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. डाळिंब लागवड ही उत्तर दक्षिण दिशेस 14x10 फुटावर केल्यास पिकास चांगला सुर्यप्रकाश उपलब्ध होतो. डाळिंब बागेच्या चोहोबाजूला गिन्नीसारख्या उंच वाढणार्या पिकांची लागवड केल्यास त्याचा वारा विरोधक म्हणुन चांगला उपयोग होतो तसेच वार्यापासून फळबागेचे संरक्षण होते. फवारणी करतांना हवामान आधारीत घटकांची स्थिती लक्षात घेऊन व्यवस्थित फवारणी सायंकाळी केल्यास त्याचा चांगला परिणाम किड व रोग नियंत्रणावर दिसून येतो. यावेळी त्यांनी बहार व्यवस्थापनात कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. डाळिंब व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे व्यवस्थित अनुपालन केल्यास डाळिंब पिकावरील मर व तेल्यारोगाचे यशस्वी नियंत्रण करणे शक्य आहे. यानंतर त्यांच्या घरी द्राक्षबागेत बसविलेल्या स्वयंचलीत हवामन केंद्रास शेतकर्यांनी भेट दिली. श्री. रसाळ यांनी त्यांच्या शेतात डिजीटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. फळबागांना फवारणी करतांना त्यांच्या शेतावर बसविलेल्या डिस्टील वॉटर युनिटचा वापर करतात. त्यामुळे पीक उत्पादन खर्चात निश्चितच बचत होते. यावेळी शेतकर्यांनी देशी गायींच्या गोठ्याला भेट देवून शेणापासून स्लरी तयार करण्याच्या युनिटची पाहणी केली. या स्लरीचा वापर ते त्यांच्या डाळिंब, पेरु, द्राक्ष, पपई या फळबागांसाठी करतात. यावेळी राहुल रसाळ यांनी शेतकर्यांच्या शंकाचे निरसन केले. प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांचे हस्ते शेतकरी अभ्यास दौर्याला प्रारंभ झाला. या दौर्यात प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर, राहुल कोर्हाळे आदींनी सहभाग घेतला. शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत असलेल्या तांभेरे, कानडगांव, कणगर, चिंचविहिरे या गावातील 44 डाळिंब उत्पादक शेतकरी या अभ्यास दौर्यात सहभागी झाले होते
Comments
Post a Comment