दैनंदिन पाण्याला जपून वापरा
दैनंदिन पाण्याचे महत्व आहे
वाणी व पाणी जपुन वापर करायला हवा वाणी मुळे आपला वर्तमानकाळ चांगला जाईल तर पाण्या मुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित राहाणार आहे .
तेव्हा सुरक्षित भविष्य साठी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करायला पाहीजे
पाणी हे आपले राष्ट्रीय संपत्ती आहे तीचा योग्य वापर करणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे
पाण्याच्या नियोज व काटकसर फायदेशीर असते. विविध मार्गांनी जास्तीत जास्त पाण्याचे शक्य तितके नियोजन करुन व त्याचा कसा उपयोग होईल यावरून जलसंधारणाच्या कामाचे मोजमाप होत असतं .
पावसाळ्यात पुराचे जे पाणी नद्यांतून वाहत जाऊन समुद्रास मिळते ते पूर्णपणे वाया जाते. हे पुराचे पाणी थोपविणारे नदी जोड प्रकल्प भविष्यात राबवणे गरजेचे आहे
किंवा तसेच रेनवाटर हार्वेस्टीग तसेच वाटर रिसायकलिंग प्रकल्प जुरुची आहे
पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी व मानवी आरोग्यासाठी, वनस्पतिसंवर्धानासाठी, अन्नधान्यसमृद्धीसाठी व खाद्यनिर्मितीसाठी, मत्स्योत्पादनासाठी, सिंचाईसाठी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, विद्युत् निर्मितीसाठी व इतर करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या साधनांसाठी पाण्याचा पुरवठा नियमितपणे करणारे प्रकल्प आयोजित करणे, हे जलसंधारणाचे मुख्य उद्दिष्ट आहे
भूमिजल हे जलसंधारणाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. धरणे बांधून करावयाच्या जलसंचयापेक्षा भूमिगत जलसंचय फार कमी खर्च लागतो. तो संचय करण्याचा व्यापही फार नसतो.
जमिनीवरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास झाडाच्या मुळांमुळे व पालापाचोळ्यामुळे प्रतिरोध होतो. त्यामुळे ते जमिनीत मुरणे सोईचे असते. ज्या पाणलोट क्षेत्रात वने व झाडी असते तेथील मृदा मुबलक प्रमाणात पाणी मुरू देईल अशाच स्वरूपाची असते. झाडीमुळे जमिनीची धूप होत नाही. वनसंवर्धनाने भूमिगत पाण्याचे साठे वाढविता येतात ते ह्याच कारणामुळे. माळजमिनीवरून पावसाचे पाणी शीघ्र गतीने इतरत्र वाहून जाते, तेही जमिनीत जास्त प्रमाणात मुरावे असे उपाय योजणे शक्य आहे.
पाणी वाहून नेणाऱ्या ओहळात बंधारे किंवा इतर अडथळे घालून प्रवाहाचा वेग कमी करतात येतो, पाणी जमिनीत मुरण्यास जास्त वेळ मिळतो. तसेच डोंगराच्या पायथ्याशी आणि इतरत्र असलेल्या जास्त उताराच्या माळाच्या व शेतीच्या जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी केल्यास ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरू शकते. यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे जमिनीच्या नैसर्गिक उताराच्या उलट दिशेकडे टप्प्याटप्प्यांनी विशिष्ट प्रमाणात उतार देणे, त्यामुळे मूळ उतारावरून खाली आलेले पाणी स्थिरावून जास्त उताराच्या दिशेने सावकाशपणे वाहू लागते. पाण्याच्या वाहण्याच्या नैसर्गिक मार्गापेक्षा अशा रीतीने काढलेल्या कृत्रिम मार्गाची लांबी अधिक असते. त्यामुळे जमिनीवरील पाण्याची गती मंदावते, ते अधिक काळ जमिनीवर रेंगाळते व हळूहळू अधिक प्रमाणात जमिनीत मुरू लागते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी जे समपातळी बांध घालतात त्यामुळेही पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते.
तसेच विद्युत् निर्मिती, सिंचन, नागरी वस्त्या आणि औद्योगिक प्रकल्प यांना थोड्या वेळात प्रचंड प्रमाणात पाण्याचा पुरवठा व्हावा लागतो. केवळ भूमिजलावर अवलंबून राहून त्या घटकांना अल्पावधीत पाणी पुरविता येत नाही. त्याकरिता अनेक मार्गांनी भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी अडवून योग्य ठिकाणी जलाशय निर्माण करून त्यांतून आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करता येतात.
आजूबाजूच्या ओढ्यांचे व नाल्यांचे प्रवाह वळवूनही जलाशयात अधिक पाणी उपलब्ध करणे शक्य असते. काही दलदलीचे प्रदेश असतील, तर त्यांतील पाणी चर खणून मुख्य जलाशयात नेऊन सोडतात. वर्षभर सतत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात उघडझाप करता येतील असे लोखंडी दरवाजे बसवून काही विशिष्ट प्रसंगी जलप्रवाह थोपवून धरतात व तो प्रवाह अवश्य त्या दिशेला वळवून किंवा त्यातील पाणी पंपाच्या साहाय्याने विशिष्ठ दिशेला आणून नंतर ते उपयोगात आणतात. कधीकधी एकापुढे एक अशी ठराविक अंतरावर धरणे बांधून ठिकठिकाणी पाण्याचे संचय करतात. तसेच, जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील उपनद्यांवर व जलाशयांतील अनुस्त्रोत भागातील उपनद्यांवर लहान धरणे बांधून साठे वाढवितात. पूर नियंत्रणाकरिताही काही ठिकाणी असे जलाशय निर्माण करणे आवश्यक असते.
उपलब्ध झालेले पाणी वाया न जाणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे
जलाशय, कालवे, नळ व इमारतींतील नळांचे जोडकाम-साहित्य यांच्यामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे हा जलसंधारणाच्या अप्रत्यक्ष मार्गापैकी महत्त्वाचा भाग आहे. उपलब्ध झालेला पाण्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेता येईल हे जलशक्ती योजनेचे महत्त्वाचे फलित मानले गेले आहे
Comments
Post a Comment