राहु-केतू-शनि दैवत पुस्तकाचे प्रकाशन गायिका अणुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशन
राहुरीचे राहु-केतू-शनि दैवत पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका अणुराधा पौडवाल यांनी राहुरी येथे शुक्रवारी केले अध्यक्षस्थानी प्रथम नगराध्यक्षा डाॅ उषाताई तनपुरे ह्या होत्या
अणुराधा पौडवाल म्हणाल्या की शनिचे माझ्या मनात अढळ स्थान आहे मी गेले अनेक वर्षांपासून येथे दर्शना साठी येत असते येथे आल्यावर मनाला समाधान लाभते राहुरीत असे राहु-केतु व शनि असे दैवत दर्शन घेऊन मला मनोभावे आनंद झाला असून हे दैवत देखील नावारूपास येईल यावेळी डाॅ उषा तनपुरे,शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सायराम बानकर,पुस्तकाचे लेखक प्राचार्य डाॅ बापुराव देसाई,आदीची भाषणे झाली
लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल महिलांनी अणुराधा पौडवाल यांचा सत्कार केला
दरम्यान शनिशिगणापुर येथे शनिला अभिषेक करुन शनिला राखी बांधली व अणुराधा पौडवाल यांना शनि प्रसाद व माहेरची साडी व्रस्त्र देऊन गौरविण्यात आले तेव्हा अनेक भाविकांनी अणुराधा यांच्या समवेत आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून घेत आनंद व्यक्त केला
Comments
Post a Comment