मतदार जागृती आयोजन

मिशन ७५ टक्के’ अंतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारसंघात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘मिशन ७५ टक्के’ अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्याने मतदार जागृती उपक्रमासाठी विशेष आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विविध वयोगटातील आणि क्षेत्रातील नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वीदेखील जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमांचे विविध पातळीवर कौतुक करण्यात आले आहे.

स्वीप उपक्रमात जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, क्रीडा संघटना, पुरस्कारप्राप्त खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, ग्रंथालये यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. २२ ऑक्टोबर रोजी ‘डेमोक्रसी ऑन व्हिल’ उपक्रमाद्वारे या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. याअंतर्गत सायकल फेरीचे आयोजन करण्यात येऊन मतदानाची शपथ घेण्यात येणार आहे.

‘माय एपीक, माय बाईक’ उपक्रमाच्या माध्यमातून २३ ऑक्टोबर रोजी मतदार ओळखपत्राचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरला नागरिकांच्या सहभागातून लोकशाही दौडचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर रोजी आयोजित हेाणाऱ्या जनजागृती प्रभातफेरीत खेळाडू, सामाजिक संस्था, ग्रंथालयांचे सदस्य सहभागी होतील. २६ ऑक्टोबर रोजी मान्यवरांचे संदेश समाज माध्यमांद्वारे देण्यात येणार आहेत.

‘सर्वसमावेशक मतदान’ या संकल्पनेनुसार उपक्रमात समाजातील विविध घटकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीत मतदान करणे आवश्यक असून नागरिकांनी येत्या २०  नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजवावा आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रेरित करण्यासाठी मतदान जागृती उपक्रमात सहभागी व्हावे

Comments

Popular posts from this blog

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार