आई समवेत ठेवले तीच्या अल्पवयीन मुलांना तुरुंगात

📌 आरोपी सोबत तीच्या अल्पवयीन मुलांना ठेवले पोलीस कोठडीत.!
📌 राहुरीच्या पोलिस कोठडीत अल्पवयीन मुलांचा तब्बल ७९ दिवस मुक्काम म्हणून..
📌 प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांची बाल हक्क आयोगाकडे तक्रार..!
📌 सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे .. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश..!

       राहुरीच्या पोलिस कोठडीत अल्पवयीन मुलांचा तब्बल ७९ दिवस छळ झाला असल्याने तात्काळ या घटनेची चौकशी करण्यात यावी व त्या अल्पवयीन मुलांना न्याय मिळावा म्हणून प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली तसेच बाल हक्क संरक्षण आयोग,  मुंबई व मे. प्रधान जिल्हा न्यायाधिश साहेब, जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्या नगर यांना पत्र देवून घटनेची चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली होती.. त्यानुसार सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे .. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना ईमेल द्वारे आदेश दिले आहे. 
       आप्पासाहेब ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 
     फरिदा रोजाउद्दीन शाही वय २४ वर्षे ह. रा. ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर मुळ रा. ताजपुर बसाही, ता. जनताबाजार जि. छपरा, राज्य बिहार या महिलेवर राहुरी पालिस स्टेशनला गु.र.नं. ३०/२०२४ नुसार भा.द.वि. कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला व तिला दि. १३/०१/२०२४ रोजी राहुरी पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले. असे.., तिने मे. न्यायालयाला दिलेल्या अर्जावरून प्रथमदर्शनी लक्षात येते. या महिलेच्या अर्जानुसार तिला एक मुलगा नामे जावेद वय ५ व एक मुलगी नामे जबनम अंदाजे वय ३ असे दोन अपत्य आहेत. तिला अटक झालेनंतर तिने मुलांना सांभाळणेसाठी घरी कुणी नसल्याने खालील प्रमाणे दोन वेगवेळ्या मे. न्यायालयासमोर अर्ज केले आहेत.
      दि.१३/०१/२०२४ रोजी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब, राहुरी यांचेकडे फरिदाने दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की, माझेवर राहुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होउन मला अटक केले असून माझे जबनम रोजादीन साई (वय - अर्जात लिहीलेले नाही) या मुलीला सांभाळण्यासाठी कुणीही जवळचे नातेवाईक नसल्याने तिस लॉकअप मध्ये माझेसोबत ठेवण्याची परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. सदरचा अर्ज मे. न्यायालयाने मंजूर करून त्यावर मे. न्यायालयाने "आय.ओ. इज डायरेक्टेड टू मेक नेसेसरी अरेंजमेंट यॅज पर रूल्स" असे आदेश दिले आहेत.
     तसेच दि.१५/०१/२०२४ रोजी  जिल्हा व सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे फरिदाने यांनी दिलेल्या दुसऱ्या अर्जात म्हंटले की, माझेवर राहुरी पालिस स्टेशनला गुन्हा दाखल होवून मला अटक केली असून माझा मुलगा नामे जावेद रोजाउददीन शाही (वय ०५ वर्ष) हा गावी एकटाच होता. त्यास आज रोजी पोलिस स्टेशनला आणले आहे. मुलाच्या सांभाळासाठी आमचे जवळचे कुणीही नातेवाईक नसल्याने व नातेवाईक बाहेर राज्यात असल्याने मुलास सांभाळण्यास कुणीही नसल्याने त्यास राहुरी दुय्यम कारागृह मध्ये माझे सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी ही विनंती. सदरच्या अर्जावर मे. न्यायालयाने "ऑर्डर पास्ड अलाँग वुईथ पीसीआर अॅक्ट" असे आदेश दिले आहेत.
     दि. १७/०१/२०२४ रोजी फरिदा रोजाउद्दीन शाही मोतीराजपूर बिहार यांना राहुरी येथील पोलिस कोठडीत ठेवणेत आले व जिल्हा न्यायालयाकडून तिला जामिन मंजूर झाल्याने दि.०२/०४/२०२४ रोजी सायं. १८.०० वा. आरोपीस मुक्त करणेत येत आहे असे जनमाहिती अधिकारी, तहसिल कार्यालय राहुरी यांनी कैदयांची माहिती ठेवणेत आलेल्या रजिष्टरच्या दिलेल्या सत्यप्रति नक्कलांवरून दिसून येत आहे.
      फरिदा रोजाउद्दीन खातुन शाई यांनी राहुरी व अहमदनगर येथील मे. न्यायालयांसमोर दोन वेगवेगळे अर्ज देवून ती अटक असल्याचे तिने दोन न्यायालयांसमोर कबुल केले आहे. तसेच राहुरी तहसिल कार्यालयातील कैदयांच्या नोंद रजिष्टर नुसार दि. १७/०१/२०२४ रोजी फरिदा  यांना राहुरी येथील पोलिस कोठडीत ठेवणेत आल्याचे दिसत आहे. व मे. न्यायालयाने जामिन मंजूर केल्याने दि. ०२/०४/२०२४ रोजी सायं. १८.०० वा. म्हणजे कोठडीत ठेवल्यापासून ७५ दिवसांनी कोठडीतून मुक्त करणेत आले. तथापी कैदयांच्या नोंद रजिष्टरमध्ये या दोनही मुलांची नोंद आढळून येत नाही. त्यामुळे दि.१३/०१/२०२४ रोजीच्या राहुरी येथील मे. न्यायालयासमोरील फरिदा रोजाउद्दीन शाही यांच्या पोलिस कोठडीत असल्याच्या पहिल्या अर्जापासून ते राहुरी तहसिल कार्यालयातील कैदयांच्या नोंद रजिष्टर वरील दि. १७/०१/२०२४ पर्यंत फरीदा रोजाउद्दीन शाही यांना कोठडीत ठेवणेत आल्याच्या नोंदी पर्यंत म्हणजे ०४ दिवस फरीदा शाही व त्यांची दोन अल्पवयीन मुले जावेद वय ५ वर्ष व जबनम अंदाजे वय ३ वर्ष यांना राहुरी पोलिसांनी ०४ दिवस बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवले असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. तसेच दि. १७/०१/२०२४ पासून ते तिला कोठडीतून मुक्त केलेचा दि.०२/०४/२०२४ पर्यंतच्या ७५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी दरम्यान त्यांची मुले नामे जावेद व जबनम या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कोठे ठेवले व त्यांची काय व्यवस्था केली याची संदर्भीय पत्रान्वये पोलिसांकडे माहिती मागवूनही पोलिसांनी माहिती दिलेली नाही.
     तसेच या दोन अल्पवयीन मुलांना राहुरी पोलिसांनी त्यांची आई फरीदा शाही यांचे सोबत ठेवले किंवा कसे याची कुठेही लेखी नोंद आढळून येत नाही. तथापी या मुलांना काही लोकांनी कोठडील डांबून ठेवले असल्याचे पाहिले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा मोबाईल मध्ये फोटोही काढलेला असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी फरीदा रोजाउद्दीन शाही या एकाच गुंन्हयातील आरोपीच्या मुलांचे बाबत दोन वेगवेळे अर्ज दोन वेगवेगळ्या न्यायालयात सादर करून मे. न्यायालयांची दिशाभुल व फसवणुक केली आहे.
      मे. न्यायालयाने "आय. ओ. इज डायरेक्टेड टू मेक नेसेसरी अॅरेंजमेंट अॅज पर रूल्स" असे पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेले असतांनाही पोलिसांनी अशा परिस्थीतीत कायदयातील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांना ठेवणेत येत असलेल्या योग्य त्या मान्यताप्राप्त ठिकाणी मुलांना ठेवण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे मे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. तसेच ७५ दिवस अधिकृत व ०४ दिवस अनधिकृत असे एकुण तब्बल ७९ दिवस जावेद आणि जबनम या अल्पवयीन मुलांना राहुरी पोलिसांनी त्यांच्या फरिदा या आईसोबत राहुरीच्या पोलिस कोठडीत अनधिकृतपणे डांबून ठेवले किंवा कसे याची चौकशी होणे गरजेचे आहे. 
         सबब या ७९ दिवसांच्या कालावधीत या मुलांना राहुरीच्या पोलिसांनी त्यांच्या मुलभूत बाल हक्कांपासून वंचित ठेवल्याने कायदयाचे उल्लंघन झाले आहे.
संदर्भीय पत्रास पोलिसांकडून कोणतेही उत्तर मिळाले नसलेने राहुरी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल ७९ दिवस जावेद आणि जबनम या अल्पवयीन मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले आहे. या अल्पवयीन मुलांना या कालावधीत त्यांच्या घरी मिळणा-या वैदयकिय सेवेपासून त्यांना वंचित रहावे लागले आहे. घरी मिळणा-या रोजच्या सकस आहारापासून त्यांना वंचित रहावे लागले आहे. आईसोबत पोलिस कोठडीत जिवण व्यतीत करावे लागल्याने त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे तर या मुलांनी कधीही न केलेल्या गुंन्याची शिक्षा राहुरी पोलिसांनी या मुलांना दिली आहे. त्यांच्या खेळण्याच्या व बागडण्याच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे या मुलांचे बाल मनावर विपरित परिणाम होवून त्यांचे भविष्य उध्वस्त झाले आहे. हे स्पष्ट होते.
     सबब.. जावेद वय ५ वर्ष आणि जबनम अंदाजे वय ३ वर्ष या अल्पवयीन मुलांचा राहुरी पोलिसांनी विनाकारण कोठडीत डांबून ठेवून तब्बल ७९ दिवस छळ केला म्हणून मे. साहेबांना नम्रतेची विनंती की, मी या महिलेला व मुलांना ओळखत नाही. परंतू जनतेमध्ये सुरू असलेली घटनेची चर्चा व त्याची सत्यता पडताळून पाहणेसाठी घेतलेल्या माहितीमुळे ही घटना समोर आली आहे. ही मुले जरी बाहेरच्या राज्यातील असली तरी मानवतेच्या दृष्टीकोणातून व सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या गंभिर घटनेची पुनरावृत्ती टळण्यासाठी वरील बाब मी आपल्या निदर्शनास आणुन देवू इच्छित आहे. असे ढूस यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले असून..
      घडलेली घटना अतिशय गंभिर स्वरूपाची असल्याने या घटनेची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कृपया या घटनेची व त्यातील कागदपत्रांची आपले स्तरावरून सखोल चौकशी करण्याचे संबंधीतांना योग्य ते आदेश दयावेत व चौकशी अंती दोषींवर बाल हक्क कायदयातील व इतर योग्य त्या कायदयातील तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करून पिडीतांचा शोध घेवून त्यांना दोषींकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देणेत यावी अशी विनंती ढूस यांनी त्यांच्या पत्रात केल्याने राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने अहमदनगर चे जिल्हा पोलीस प्रमुख यांना तत्काळ चौकशी करून सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेच्या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

Comments

Popular posts from this blog

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार