राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन
डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी २५ सष्टें.१९२५ रोजी विजयादशमी { दसरा }च्या दिवशी जातीच्या आधारावर नाही तर सकल हिंदु समाजाचे संघटन व्हावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.आजही संघात कुणाची जात विचारली जात नाही.आणि संघ जातीयवादीही नाही.संवाद,संपर्क, सातत्य,संघाचे विचार सर्वदुर पसरुन सद् विचारी समाज निर्माण करण्याचे काम संघ अखंड अविरत गेल्या ९९ व्या वर्षापासुन काम करीत आहे.सन२०२५ हे वर्ष शताद्बीवर्ष म्हणून साजरे करणार असल्याचे प्रतिपादन— रा.स्व. सघाचे अहिल्यादेवीनगर उत्तर जिल्हा श्रीरामपूरचे जिल्हाप्रचारक प्रतिक परळीकर यांनी केले.
बेलापूर येथील रा.स्व. संघ शाखेच्या विजयदशमी { दसरा } उत्सवात ते बोलत होते.यावेळी वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ. प. विजयमहाराज कोहीले,रा.स्व. संघाचे अहिल्यादेवीनगर जिल्हासंघचालक किशोर निर्मळ हे होते.कृष्णा कर्पे यांनी प्रास्ताविक केले.तर " हिंदु भाग्यविधाते आम्ही.।
परळीकर म्हणाले संघाचा विचार आणि प्रसार करण्यासाठी संघ विजयादशमी { दसरा } उत्सव साजरा करतो.फक्त एक दिवस उत्सवासाठी येणारा स्वयंसेवक संघाला अपेक्षित नाही.संघ व्यक्ती निष्ठीत नाही.संघ विचार निष्ठीत काम करतो. नित्यशाखा हाच संघाचा खरा आधारआहे.
संघाचे सघोष संचलन पाहण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना घेवून आले होते. त्यांची
Comments
Post a Comment