श्रीरामपूरात तीन पोलीसांनी लाच घेतली म्हणून कारवाई
रघुवीर कारखिले, गौतम लगड व राहुल नरोडे यांनी मटका सुरू ठेवण्यासाठी मागितली होती लाच व दारूची बाटली.. कारखिलेचे अनेक कारनामे..!
एकीकडे अवैध व्यावसायवर आचारसंहिता काळात छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले
हे तीन पोलीस लाच घेऊन कोणाच्या घशात घालत होते हे तपासात कळणार
तर दुसरीकडे कर्जत येथील एका संभेत खासदार निलेश लंके यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नाव न घेता सत्ता आल्यावर यांना नक्षल क्षेत्रात पाठवू असा इशारा दिला आहे
तक्रारदार-पुरुष,वय- 40 वर्षे
आलोसे रघुवीर ओंकार कारखिले, पोलीस नाईक, बक्कल नंबर 232, वर्ग-3,
राहुल महादेव नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 651, वर्ग-3,
गौतम शंकर लगड, पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 717, वर्ग-3, सर्व नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर
लाचेची मागणी
6000/- रुपये तडजोडीअंती 5,000/- रुपये व 2600/- रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूची बाटली दिनांक -06/09/2024
लाच स्विकारली
हस्तगत रककम
लाचेचे कारण
तक्रारदार यांचा श्रीरामपूर येथे मटक्याचा व्यवसाय असून तक्रारदार यांचे मटक्याचे व्यवसायावर कारवाई न करता मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्याकरता पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे 6000/- रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दि.06/09/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.06/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 6000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आरोपी लोकसेवक कारखिले यांनी तक्रारदार नको म्हणत असताना त्यांना त्यांच्या मटक्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणावरून तक्रारदार यांच्याकडून 4000/- रुपये त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या आठ भारतीय चलनी नोटा अशी रक्कम स्वीकारली व उर्वरित 1000/- रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली व पोलीस कॉन्स्टेबल राहुल महादेव नरवडे यांनी तक्रारदार यांच्या मटक्याचे व्यवसायावर कारवाई न करता त्यांचा मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 2600/- रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूच्या बाटलीची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली व पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांनी मागणी केलेली दारूची बाटली आणण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गौतम शंकर लगड यांनी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले. सदर बाबत तिन्ही आरोपी लोकसेवक यांचेविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी
राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर.सापळा पर्यवेक्षण अधिकारी
अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि.,
"सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
दुरध्वनी क्रं. 0241-2423677
टोल फ्रि क्रं. 1064
Comments
Post a Comment