Posts

Showing posts from December, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूरत

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिदे श्रीरामपूरात  शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या साठी 4जानेवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे येणार आहेत  त्याचबरोबर महसूल मंत्री जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत  गेली दहा वर्षापासून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत 

नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ याच्या सह 18 बढती

Image
@प्रमोशन   : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना बढती. (सिलेक्शन ग्रेड, १ जानेवारी २०२४ पासून). तूर्त आहे त्याच जागी नियुक्ती राहणार. पूर्वी नगरला असलेले भाऊसाहेब दांगडे, शिर्डीहून बदली झालेले पी. सिवा शंकर, कान्हूराज बगाटे यांचाही बढती झालेल्यांमध्ये समावेश

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्प अव्वल

Image
कडधान्य सुधार प्रकल्पांतर्गत तुर व हरभरा संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन राहुरी- महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन प्रकल्पाअंतर्गत तूर व हरभरा योजनेला भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपुर यांचे पंचवार्षिक संशोधन आढावा अहवालानुसार उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या संस्थेचा पंचवार्षिक संशोधन आढावा अहवाल नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. कडधान्य सुधार प्रकल्पाकडे आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात तूर आणि रब्बी हंगामात हरभरा पीकावर संशोधनाचे कार्य चालते. कडधान्य सुधार प्रकल्पाची स्थापना सन 1973 साली झाली. सन 1982 साली आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. हरभरा पिकाचे मुख्य संशोधन केंद्र म्हणून 1994 साली तर तूर पिकाचे उपकेंद्र म्हणून 2002 साली आणि मुख्य केंद्र म्हणून 2015 मध्ये भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली. कडधान्य पिकांमध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, मटकी, चवळी, कुळथी आणि राजमा या पिकांच्या एकूण 49 वाणांची शिफ...

निभेरे येथे ग्राम मेळावा

Image
निंभेरे येथे शासकीय योजना अभिसरण मेळावा संपन्न  कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था अंतर्गत गावामध्ये जलकल जीवन कार्यक्रम सुरू आहेत जलकल जीवन कार्यक्रमांतर्गत निंभेरे गावात वृक्ष लागवड,  बायोगॅस उभारणी,शेत तलाव,शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुकूटपालन, तसेच एकूण 250 घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग ,lbs,gabian पाणलोट उपचार,सिमेंट बंधारा दूरुस्ती,फळबाग लागवड,मत्स्य व्यवसाय,शेतीशाळा,शेतकरी अभ्यास सहली,बचत गट प्रशिक्षण,भिंतीचीत्रे,शासकीय इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग,अनेक छोटे मोठे लोककल्याणकारी उपक्रम चे काम झालेले आहेत व अजून पुढील टप्प्यात इतर घरांना  हार्वेस्टिंग करणार आहेत तसेच गांडूळ,बायोडेनामिक खत प्रात्यक्षिक,ऑरगॅनिक शेती,डेमो प्लॉट इत्यादी वैयक्तिक लाभ तसेच माती आणि पाणी संवर्धनासाठी गॅबियन,LBS , शिवडी तलाव नाला खोलीकरण,नागरे वस्ती नाला खोलीकरण इत्यादी कामे झालेली आहेत. गावामध्ये सोलर दिवे मराठी शाळेला रंगकाम इत्यादी सार्वजनिक कामे पूर्ण करण्यात आलेले आहेत तसेच बुधवारी  27 डिसेंबर 2023 रोजी जलकल जीवन कार्यक्रम आणि ग्रामपंचायत ...

दत्त जंयती साजरी

✍️राहुरी फॅक्टरी वर दत जंयती सुरेश चव्हाण यांच्या माध्यमातून साजरी  ✍️नगरसेविका सुजाता कदम व सुधाकर कदम यांनी केली आरती  ✍️श्रध्दाळु साठी महाप्रसाद  https://youtu.be/52B7iPMxIsY?si=LGEqWjknmUW-YraJ

पिंपळने येथे एसटी बस पल्टी

Image
पिपळने एसटी बस पल्टी  मंगळवारी सकाळी एस टी महामंडळाची राहुरी कडून संगमनेर कडे येणारी बस संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये एक्सेल तुटल्यामुळे पलटी झाली आहे. सदर बसने मुख्यत्वे करून विद्यार्थी प्रवास करत होते.    काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर पोलीस घटनास्थळी असून, स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी हजर आहेत. किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवलेले आहे.      "जखमीना उपचारा साठी रुग्णालयात पाठविण्यात आले पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.    -सोमनाथ वाघचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर

ऊसाला चाबुक काणी रोगाने घेरल

Image
उसामध्ये चाबूक काणी रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ देशातील एकमेव कृषि विद्यापीठ - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील राहुरी  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे की ज्यांनी उसावरील चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून सन 2016 मध्ये को एम  7601, एम एस 7604 या दोन आणि सन  2023 मध्ये को एम  11086 व को एम  13083 अशा एकूण चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील यांनी दिली.  मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे राहुरी कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असून भारतातील ऊस संशोधनामध्ये काम करणार्या संस्थेपैकी एक अग्रेसर केंद्र आहे. या केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे 16 पेक्षा जास्त वाण, 105 पेक्षा जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत शिफारशी व तंत्रज्ञान दिले...

जिद्दीला आत्मविश्‍वासाची जोड द्या:कुलगुरु डॉ पी जी पाटील

Image
जिद्द, संवेदना व धाडस असेल तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील राहुरी  कृषि क्षेत्रामध्ये खूप सार्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. तुम्ही नोकरीच्या मागे न लागता त्या अमर्याद संधींचा फायदा घ्या. स्वतःमध्ये नेहमी कृतीशीलता बाळगा त्याचबरोबर काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी प्रयोगशीलताही जपा. तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवा. तुमच्यामध्ये जिद्द, संवेदना व धाडस असेल तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना व नाहेप प्रकल्पाच्या सहयोगाने महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य व प्रसिद्ध व्याख्या...

झी मराठी मुळे गावाकडील गौरी झाली स्टार गायिका

Image
गौरीला विद्यार्थ्यांकडून टाळ्याची साद  झी टी व्ही मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावून गायक म्हणून अव्वल ठरलेली गौरी पगारे ही बुधवारी देवळाली प्रवरात श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रत्नप्रभा दत्तात्रय कडु पाटील यांच्या दिवंगत भगिनी प्रभावती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बक्षीस वितरण समारंभ पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य पोपटराव कडुस हे होते  गौरी हिने हीने विद्यार्थ्यांना गाणे गाऊन आपल्या आवाजातील जादुने आपलेसे करून टाकले  यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी,माजी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,प्राचार्य पोपटराव कडुस यांनी मार्गदर्शन केले  गायत्री सांबारे,तेजल दिवे याच्या सह वकृत्व,क्रिडा,चित्रकला यशस्वी विद्यार्थीना रोख रक्कम व प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले उपप्राचार्य एस जी अल्हाट यांनी स्वागत केले तर श्रीमती जे ए कोरडे यांनी आभार मानले  "गोरी पगारे हीच्या सोबत विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर सेल्फि काढत गौरीशी हस्तांदोलन केले...

शाश्वत शेती साठी ड्रोन तंत्रज्ञान-कुलगुरु पी जी पाटील

Image
भविष्यातील शाश्वत शेतीसाठी रोबोटीक्स, आयओटी, डिजीटल ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात पदार्पण करतांना विकसीत भारत 2047 ला लोकसंखेचा विचार करता अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये डिजीटल व माहिती तंत्रज्ञानाचा सर्वांगीन वापर करणे आवश्यक आहे. 2047 मध्ये जगाची लोकसंख्या 970 कोटी अपेक्षीत असतांना भारताच्या वाढत्या लोकसंखेस अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी कृषि क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेणे आवश्यक आहे. माती, पाणी, हवा, इंधन यांची गुणवत्ता एका बाजुने घसरत असतांना वेगाने बदलत चाललेले हवामान हे कृषि क्षेत्रातील आव्हानाची दुसरी बाजु आहे. त्यासोबत शेती क्षेत्रापासून दुर चाललेले तरुण, शेतीत कमी होत चाललेले मनुष्यबळ यांचा विचार करता शेतीमध्ये स्वयंचलीत यंत्र आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्य...

जुनी पेन्शन कामबंद आंदोलन

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जुनी पेशंन योजना लागु करण्यासाठी कर्मचार्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु झाले असुन याचा मोठा परिणाम झालाय शासकीय व निमशासकीय नोकर जुणी पेशंन पुन्हा सुरु करावी म्हणून गुरुवार पासून संपावर गेले आहेत राहुरी तहसील कार्यालय देखील शुकशुकाट दिसून आला समोर संभा घेण्यात आली  जुनी पेशंन योजना लागु करण्यासाठी राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, मुंबई या संघटनेशी सलग्न असलेल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठातील  या आंदोलनात नविन पेशंनमध्ये (एन.पी.एस.) समाविष्ठ असलेले हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. झालेल्या आंदोलनात या कर्मचार्यांनी पदव्युत्तर महाविद्यालयापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत भव्य रॅली काढली. या ठिकाणी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचार्यांनी एकच मिशन-जुनी पेशंन अशा घोषना दिल्या. त्यानंतर सर्व कर्मचारी बाईक रॅलीने राहुरी येथे गेले. त्या ठिकाणी तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने पोलिस निरिक्षक संजय सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. हे आंदोलन महात्मा फुले कृषि विद्य...

भारत,जर्मनी,बेनीन यांत्रिकीकरण करार

Image
भारत-जर्मनी आणि बेनीन देशातील त्रिदेशीय सहकार्य करार संपन्न - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बेनीन देशामध्ये कृषि अवजारे, यंत्रे चाचणी व प्रमाणीकरण यंत्रणा उभारणीसाठी नुकताच महात्मा फुले कृषि विद्यापीठातील तज्ञांचा बेनीनला दौरा झाला. या दौर्याचे आयोजन जर्मन सरकारच्या जि.आय.झेड. या संस्थेमार्फत करण्यात आले होते. कोणतेही कृषी यंत्र विकसीत केल्यानंतर त्या यंत्राची चाचणी व प्रमाणीकरण ही प्रक्रिया करावी लागते. कृषि अवजारे व यंत्रे यांची चाचणी व प्रमाणीकरण करण्यासाठी भारतामध्ये वापरात असलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती कोटनौ बेनीन येथे पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अधिष्ठाता (कृषि अभियांत्रिकी) डॉ. दिलीप पवार, कृषि यंत्रे व शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे व कृषि यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुलशीदास बास्टेवाड यांनी दिली. तसेच बेनीनमध्ये कृषी यांत्रीकीकरणाला चालना देण्यासाठी यंत्र प्रमाणीकरण यंत्रणा उभारणी करण्याबाबत सखोल चर्चा केली. या कार्यशाळेला बेनीन देशातील कृषी संशोधक, अवजारे उत्पादक, प्रमाणक अधिकारी, कृषी मंत्रालय अधिकारी आणि ...

दिव्यांग सेवा संस्थेचा वर्धापन साजरा

Image
दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे प्रथम वर्धापन जागतिक दिव्यांग दिन उत्साहात संपन्न   - दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे प्रथम वर्धापन व जागतिक दिव्यांग  दिनानिमित्त  दिव्यांगा साठी अंत्योदय रेशन कार्ड व  संजय गांधी निराधार योजना अर्ज संकलन शिबिर , ,तसेच तीन दिव्यांग बांधवांना  तीन चाकी सायकल  व  एका दिव्यांग  बांधवांना कानाचे मशीन वाटप माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे  यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्याभवन या ठिकाणी  करण्यात आले या  कार्यक्रमा चे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय तमनर हे होते. जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्यावाढदिवस असल्याने केक कापून  सत्कार  आ.प्राजक्त  तनपुरे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच झी मराठीसारेगमप लिटल चॅम्प मध्ये उपविजेता  जयेश खरे  याचा  सत्कार करण्यात आला.  मधुकर घाडगे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले दिव्यांग शक्ती सेवा संस्थेत स्थापन करून एक वर्षात माणुसकीची भिंत या उपक्रम...

भाऊसाहेब खासदारकीला इच्छुक

Image
शिर्डी लोकसभे साठी भाऊसाहेब इच्छुक! मंगळवारी श्रीरामपूर येथे जुण्या व नवीन शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यात श्रीरामपूर चे माजी आमदार भाऊसाहेब काबळे यांनी आपण ही इच्छुक असल्याचे बोलले  काही दिवसांपुर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतले असून त्यांनी भेटी गाठी सुरु केल्या आहेत तर दुसरीकडे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे दहा वर्ष खासदार आहेत सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेत आहेत  

राहुचे पोलीस निरीक्षक धनजय जाधव यांना नगर कंट्रोला हलवले ?

Image
बेक्रीग @ पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरी चे पोलीस निरीक्षक धनजय जाधव यांची नगर कंट्रोला बदली  मागील नागपूर हिवाळी अधिवेशनात तात्कालिन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे नगर कंट्रोल गेले आता जाधव  राहुरी पोलीस ठाण्यात कारभारी टिकेना? जाधव आत्ता कुठे भेटी गाठी द्यायला लागले होते अण लगेच त्यांना कंट्रोल जावे लागले  पोलीस उपनिरीक्षक सजन्न नहा-डा अद्याप फरार असून ते सापडत नाहीत अण आता धनजय यांना देखील जय मिळण्या ऐवजी पराभवाला सामोर्य जाव लागल  मध्यंतरी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे आले होते सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी फक्त दिवस काढले 

शेळीला झाले पाच करडे

Image
शेळीने दिला पाच करडांना जन्म महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अ. भा. समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात. याअंतर्गत संगमनेर केंद्रातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळयांच्या कळपातील शेळ्यांनी विद्यापीठाने दिलेला नर एस.एम.-410 द्वारे प्रजनन केलेल्या दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे व एका शेळीने पाच करड़े देण्याचा विक्रम केला आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या 3000 वरून 50000 पर्यंत नेण्यात यश मिळविले आहे. हा प्रकल्प कार्यक्षमरित्या राबविण्यासाठी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. दिनकर कांबळे यां...

शेती साठी पाणी व्यवस्थापन महत्वाचे-डाॅ पवार

Image
पाण्याचे योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता  - अधिष्ठाता  डॉ. दिलीप पवार पाण्या शिवाय शेती होऊच शकत नाही  जमिनीच्या पोतनुसार त्यामधील पाण्याची उपलब्धता ठरत असून आपल्या भागातील जमिनीच्या प्रकाराचा उपयोग करुन घेवून आपल्याला माती व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. उपलब्ध असलेली जमीन व पाणी हे सुरक्षीत राहण्यासाठी व त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी चॅप्टर इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सायन्स, मृदविज्ञान विभागाच्या वतीने जागतीक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार बोलत होते. माती आणि पाणी जीवनाचा स्त्रोत या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राहुरी तालुक्यातील खडांबे येथील प्रगतशील शेतकरी कृषिभूषण  सुरसिंग पवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मृदविज्...

जैव तंत्रज्ञान महत्वाचे-कुलगुरू डॉ पी के पाटील

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जैव तंत्रज्ञानावरील कार्यशाळा संपन्न शेतीमधील शाश्वततेसाठी जी.एम. तंत्रज्ञान महत्वाचे - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील कपाशीसारख्या पिकामध्ये बी.टी. जनूके परावर्तीत केल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. जी.एम. तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या पिकांमुळे गेल्या 25 वर्षात मानवाला किंवा पर्यावरणाला धोका झाल्याचा शास्त्रोक्त पुरावा नाही. जी.एम. तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या पिकांमुळे किटकनाशकांचा वापर कमी प्रमाणात होतो त्यामुळे शेतकर्याच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते पर्यायाने शेतकर्यांना आर्थिक फायदा होतो. त्यामुळे शेतीमधील शाश्वततेसाठी जी.एम. तंत्रज्ञान फायद्याचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व नवी दिल्ली येथील बायोटेक कन्सोरशियम ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि जैवतंत्रज्ञानातील विकास, धोरणे आणि पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उ...

आंतराष्ट्रीय संमेलन आयोजन

Image
आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन राहुरी- महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे दि. 20-21 डिसेंबर, 2023 रोजी भविष्यातील शेती या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंतरराष्ट्रीय संमेलनात एक आंतरराष्ट्रीय परिषद व पाच आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहेत. या संमेलनात आधुनिक कृषि तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आणि कृषिमध्ये ड्रोनचा वापर, कृषिमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता व हायपरस्पेक्ट्रल इमेजेस, इंडोर फार्मिंग, कृषिमध्ये यंत्रमानवाचा उपयोग, कृषिमध्ये आय.ओ.टी. चा वापर या पाच विषयांवर परिसंवाद होणार आहेत. संमेलनाचा उद्देश म्हणजे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शेतकरी, नवोद्योजक यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देणे, जगात सुरु असलेले तंत्रज्ञानातील बदल अवगत करुन देणे, नविन तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर, शेतीत होत असलेल्या वेगवान तंत्रज्ञान...

विद्यापीठातील सेवानिवृत्त कार्यकाल 65 ?

Image
कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे ? विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे  एकीकडे तरुणांना नोकरया नाहीतर दुरीकडे बुजुर्ग आपली जागा सोडायला तयार नाही विद्यापीठातुन बाहेर जायचे नसेल तर स्मशान भुमी बाधने देखील गरजेचे झालेय असेच म्हणावे लागेल  गेली तेरा वर्ष झाले उच्च शिक्षित तरुण भरती कडे डोळे लावून बसले आहेत मात्र त्याचा विचार करायला वेळ कोणाला आहे  राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी झुंजत आहे, त्याच्यासमोर हवामान बदलाचे संकट आ वासून उभे आहे. याचा सामना करण्यासाठी राज्यातील कृषि विद्यापीठांनी अत्याधुनिक काल सुसंगत संशोधन करून कात टाकण्याची गरज आहे. परंतु, कृषि विद्यापीठातील शिक्षण व संशोधनाचा गाडा केवळ ४५ टक्के प्राध्यापक हाकत आहेत. गेल्या तेरा वर्षांपासून शासनाने शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांचे निवृत्ती वय वाढवण्याचा घाट घालून जुन्याच लोकांना वारंवार संधि दिली जात आहे. २०१५ पूर्वी कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे होते. एप्रिल २०१५ मध्ये त्यात वाढ करून सेवानिवृत...