Posts

Showing posts from November, 2023

राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले

Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले  शनि दर्शन खरच एक काळ असा होता की महिलांना शनि चौथऱ्यावर जाण्यास मज्जाव होता शनि चौथऱ्यावर जाण्या साठी आदोलन झाली मात्र राष्ट्रपती ना आदराने चौथऱ्यावर नेऊन शनी अभिषेक केला   महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी  शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.  यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री  दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.  अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.   ...

एम पी केव्हीचे प्राध्यापक थायलंडला जाणार

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पांतर्गत प्राध्यापक थायलंड परदेश दौर्यासाठी रवाना जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान प्रकल्प नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठात कार्यान्वित असलेले प्राध्यापकवर्ग यांना हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यासाठी ड्रोन, रोबोट, आय.ओ.टी., कृत्रिम बुध्दीमत्ता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सींग, अर्थ इंजिन इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथे परदेश दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कास्ट प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषि महावि...

अवकाळी पाऊस सुरु

अवकाळी पाऊस सुरु  एकीकडे जायवाडी साठी नगर व नाशिक धरणातून नदीव्दारे पाणी जात असताना रविवारी रात्री अवकाळी पाऊस बरसत आहे  दिवसभर वातावरण ढगाळ होते तर सकाळी धुके व दवबिंदू पडलेले पाहवयास मिळाले

प्रेरणाचे संस्थापक सुरेश वाबळे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

Image
प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी फलटण येथील महाराजा  मंगल कार्यालयात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष  व इतिहास संशोधक प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या हस्ते मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र व रोग 11000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,शाखा फलटण व श्री सद्गुरु प्रतिष्ठान फलटण व श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीदिनी एक दिवशीय  मराठी साहित्य संमेलन फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात काल पार पडले. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील मल्टिस्टेट संस्थेच्या फेडरेशन मार्फत प्रेरणाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी उल्लेखनीय कार्य करीत  आहेत. केंद्र व राज्य...

कोपरगाव ची गौरी पगारे महाविजेती

Image
@पत्रकार शिवाजी घाडगे  गौरीला गौवरविले महाराष्ट्रीची महाविजेती  कोपरगावची गौरी पगारे 2023  महाराष्ट्र ची लिटील चॅम्प्स महाविजेती  झी मराठी वाहिनीवरील  सारेगमप लिटिल चॅम्प्स मानकरी जाहीर करण्यात आलीय शनिवारी महाअंतिम फेरीत एकुण सहा स्पर्धक होते तील गौरीला महाविजेती होण्याचा बहुमान मिळाला आहे दिड लाख रुपये व सारेगमप स्मृतीचिन्ह देऊन गौरीला गौरविण्यात आले  तर दुतीय क्रमांक राहुरी चा जयेश खरे हा 

ट्रेडीशनल बेल्ट रेसलिग राज्य उपाध्यक्ष पदी आघाव

Image
ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंगच्या राज्य उपाध्यक्षपदी पहिलवान राजकुमार आघाव पाटील यांची नियुक्ती  युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असलेल्या ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंग महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पहिलवान राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष सी.ए. तांबोळी यांनी आघाव पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा . यावेळी उमर मुख्तार तांबोळी उपस्थित होते.  राजकुमार आघाव पाटील नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील असून, त्यांनी जागतिक कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तीन वेळा कास्य पदक पटकाविले आहे. ते एक उत्तम कुस्तीपटू असून, नवोदित कुस्तीपटूंना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत असतात. तसेच कुस्ती खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आघाव पाटील यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्हा सचिव संतोष खैरनार व जिल्हाध्यक्ष संतोष भुजबळ शुभेच्छा दिल्यात 

कौण बनेगा लिटिल चॅम्प्स नगरचे दोघे महा अंतिम फेरीत

Image
 आवाज @पत्रकार शिवाजी घाडगे  झी मराठी च्या गायन सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये महा अतीम फेरी साठी राहुरीचा जयेश खरे व कोपरगाव ची गौरी पगारे याच्या सह  श्रावणी,देवाश, रुषीकेश,आदित्य हे शनिवारी महाअंतिम फेरीत गेले आहेत  गौरी व जयेश यांच्या आवाजाची जादु कायम राहिली अतिशय खडतर परिस्थितीत दोघे ही आपली गायन कला जोपासत आहेत गायन क्षेत्रात उपजतच कला अंगीकार दोघांनी केला असून या दोघांतच खरी रस्सीखेच दिसून येत असली तरी गौरी व जयेश महा अंतिम फेरीत पोहचले ही भुषणाची बाब आहे गाव कुसावरील कलाकार झी शोधून काढून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे  जयेशचे वडील बॅड वाजवण्याचे काम करतात तर गौरीला वडील नाहीत लिटील चॅम्प्स मध्ये गौरी चमकल्याने गावकऱ्यांनी तीला घर द्यायचे ठरवले आहे  जयेश चा पहाडी आवाज तर गौरीचा कोमल त्यामुळेच जिल्याचे नाव गाजणार यात शंका नाही तर राहुरी की कोपरगाव ठरणार महाराष्ट्र ची शान हे लवकरच स्पष्ट होईल   सारेगमप लिट्ल चॅम्प्स मानकरी  जाहीर होणार होईल  राहुरी तालुक्यातील वाजुळ पोही येथील प्राथमिक शाळेत श...

राष्ट्रपती दौपदी मुर्मू शनिशिगणापुर येथे येतात

Image
भारताच्या राष्ट्रपती मोहदया दौपती मुर्मू ह्या शनिशिगणापुर येथे शनि दर्शनासाठी येत गुरुवार 30नोव्हेबर रोजी येत आहेत पुढील  शनिशिगणापुर येथे येतात  राष्टपती सारखी महनीय व्यक्ती शनिशिगणापुर येथे येत असल्याने शनिशिगणापुर येथे रंगरंगोटी व डागडुजी कामे वेगाने सुरु आहेत  राष्ट्रपती मोहदयाच्या हस्ते विकास कामाचे लोकार्पण होणार असल्याचे समजते 

पारगावची शेती ब्रँड म्हणून तयार व्हावी- गणेश शिदे

Image
पारगावच्या नांवाने शेतमालाचा ब्रँड तयार व्हावा - कार्यकारी परिषद सदस्य  गणेश शिंदे जोपर्यंत  घामाला प्रतिष्ठा मिळत नाही तोहोर शेतकरी आर्थिकदृट्या संपन्न होत नाही तोपर्यंत गाव समृध्द होणार नाही. आपण जर नवनविन तंत्रज्ञान अवगत केले तरच आपण बाजारात टिकू शकू. जग बदलत असून आपणही बदलत्या काळानुसार, वेळेनुसार शेतीमध्ये बदल केले पाहिजेत. कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषि विभागाच्या योजना यांचा आपण अवलंब करायला हवा. शेतीमध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वापर करुन मुल्यवर्धनाने पारगावचा ब्रँड तयार झाला पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठ व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पारगाव, ता.जि. अहमदनगर येथे शेतकरी मेळाव्यात  गणेश शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील होते. ...

सावधान घोणस या काळात येतात उबेला

Image
सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प अडगळीच्या ठिकाणांमधुन बाहेर पडतात.हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासुन स्वत:च्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी ऊब मिळवण्यासाठी ऊन्हात येवून बसण्यासाठी,शेणखताजवळच्या ऊबेला किंवा बाथरूमच्या पाईपमधुन,दाराच्या फटीतुन ऊबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे या कालावधीत यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होते.बागकाम करणार्‍या बागप्रेमींनी व शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी काम करताना आपली काळजी घेणे खुप गरजेचे आहे. मांजरांची नजर अतिशय तिक्ष्ण असते.त्यामुळे मोकळ्या शेतात,रानात घर असणार्‍यांनी मांजर पाळणे खुप फायद्याचे ठरते कळत नकळत मांजर अशा सरपटणार्‍या प्राण्यांबद्दल आपणास सावधान करते,त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतात.या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजेच मुंगुस त्याच्यामुळेही घोणसची संख्या नियंञणात येते. पाठीवर असणार्‍या बदामी आकाराच्या एकसारख्या नक्षीवरून हा सर्प चटकन ओळखता येतो,कोणाला जर या सर्पाचा दंश झालाच तर कुठेही कसल्याही प्रकारे वेळ न दवडता रूग्णास त्वरीत नजीकच्या सरकारी...

यंदा ऊस भावा साठी बैठक आयोजित करा:प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे

Image
यंदाच्या ऊस भाव जाहीर करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखानदारांची  बैठक बोलवा : अभिजीत पोटे सन 2023 चालू वर्षाचा हंगाम सुरू होऊन देखील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी उसाचा भाव निश्चित केलेला नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संभ्रमात सापडला आहे        दरवर्षीप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष साखर सहसंचालक आर.जे.डी यांच्या माध्यमातून खाजगी व सहकारी साखर कारखानदारांचे चेअरमन व कार्यकारी संचालक (एम.डी) यांना एकत्रित बोलावून व जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांना आमंत्रित करून साखर कारखानदारी बाबत विविध अडचणी वर मात करण्यासाठी एकत्रित बैठका गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत परंतु साखर सह संचालकांना अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राट न जुमानता या बैठकीला स्वतः चेअरमन व एम.डी उपस्थित न राहता चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा शेतकी विभागाचे अधिकारी या बैठकीला पाठवून देतात यावर साखर सहसंचालक आर.जे.डी मूग गिळून बैठक आटोपती घेतात अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवेळी उसाचे पेमेंट पंधरवाडा ऊस बिल पेमेंट प...

जलयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतला आढावा

Image
जलयुक्त  अभियानाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांना जलपरिपूर्ण करा -- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  :  जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येऊन अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांना जलपरिपूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान-2 बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचवळे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील 368 गावांची निवड करण्यात आली असुन   यामध्ये अहमदनगर तालुक्यातील 14, नेवासा-12, श्रीगोंदा 14, पारनेर 17, कर्जत 39, जामखेड 22, शेवगाव 17, पाथर्डी 18, श्रीरामपूर 12, राहुरी 19,  कोपरगाव 23, राहता 24, संगमनेर 92 तर अकोले तालुक्यातील 45  गावांच...

जेल तोडून पळाले ओरीपी निघाले कच्चे शेवटी नगरचे पोलीस तपासात पक्के

Image
संगमनेर जेलमधून पळालेले आरोपी निघाले कच्चे अण पोलीस तपासात निघाले पक्के  चार आरोपी सह मदत करणारे दोघे  सहा जणांना ताब्यात घेऊन पुन्हा जेलची हवा दाखवली अवघ्या काही तासांतच पोलीसांनी ही कारवाई केल्याने आरोपीची दिवाळी तुरुंगात तर पोलिसांचा शिमगा होण्या पासून बचाव झाला हे मात्र नक्की  मुळात जेल गज हे गजुन कमकुवत झाल्याने ते सहज कापले जाणे सहज शक्य होत असावे मात्र चार आरोपींना तुरुंगात साहीत्य पुरवणाराचा शोध पोलीस घेतीलच  संगमनेर सबजेल मधील न्यायालयीन कोठडीतून पळुन गेलेले 4 आरोपी व त्यांना वाहनातुन पळून जाण्यास मदत करणारे आरोपीसह जेरबंद करण्यात यश आले.  बुधवारी संगमनेर सबजेलमधील बॅरेक क्रमांक 3 मधील न्यायालयीन कोठडीतील कैदी नामे  राहुल देवीदास काळे, (संगमनेर तालुका पोलीस स्टेशन) गु.र.नं. 61/2020 भादविक 302, 307 कैदी नामे  रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा (संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 419/2021 भादविक 376), कैदी नामे  आनंद छबु ढाले (संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 511/2021 भादविक 376), कैदी नामे  मच्छिंद्र मनाजी जाधव (घारगांव पोलीस स्टेश...

तुरुंगातुन चार कैदी पळाले

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  --------------------------------------- तुरुगाचे गज कापून चार कैदी संगमनेर कारागृहातून पसार झाले  तुरुंगातुन चार कैदी पळुन जाण्याची गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे  जर पकडलेले चार कैदी पळुन जात असतील तर सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्या शिवाय राहत नाही तुरुगाचे गज कापून हे कैदी पसार झाले आहेत चार ही कैद्यावर गंभीर गुन्हे दाखल होते  चार गुन्हेगार शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत  असे असले तरी संगमनेर पोलीस ठाण्यात दिवाळीत शिमगा पाहयला मिळाला  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला संबधीत पोलीस निरीक्षक तसेच जेल कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याची चर्चा सुरु होती 

जायकवाडी साठी पाणी जाणारच?

Image
 @पत्रकार शिवाजी घाडगे  समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाड़ी धरणा साठी नाशिक व नगर जिल्ह्य़ातील धरणातील पाणी सोडण्याच्या निर्णया विरोधात नाशिकच्या लोकप्रतिनिधीनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली या याचिकेला आव्हान देणारी हस्तक्षेप याचिका देखील दाखल झाल्या आहेत या सर्वावर एकत्रीत निर्णय देताना न्यायालयाने संबंधित वादी व प्रतिवादिनी आपले सविस्तर लेखी मत 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत उच्च न्यायालयास सादर करावयाचे आहे व पुढील सुनावनी 5 डिसेंबर 2023 होणार आहे  न्यायालयाच्या या निर्णयामुळे किमान महिनाभर काहीही हालचाल होणार नसल्याने पाणी जायकवाडीला सोडण्याची टागती तलवार नगर व नाशिक वर कायम राहाणार आहे  या दोन्ही जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधीनी एकत्रीत पणे शासन दरबारी जाऊन समन्यायी कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार शासनास हस्तक्षेप करायला भाग पाडणे गरजेचे होते तसे न करता न्यायालय व आदोलने उभारण्याची निती अवलंबुन न्यायालय हे अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार निकाल देते या आगोदर देखील अशा याचिका दाखल झाल्या मात्र प्रचलित कायद्यानुसार न्यायाल...

तुर तंत्रज्ञान मुळे स्वयमपुर्ण विकासाकडे-डाॅ नंदकुमार कुटे

Image
तुरीचे सुधारीत वाण व तंत्रज्ञानामुळे डाळीच्या स्वयंपुर्णतेकडे वाटचाल - प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या तुरीच्या सुधारीत वाणांमुळे व तंत्रज्ञानामुळे तुरीचे उत्पन्न वाढून आपण डाळीमध्ये स्वयंपुर्ण होवू शकतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले. कडगांव, ता. पाथर्डी येथील तूर उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेतकर्यांना डॉ. कुटे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ व रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण उपस्थित होते. कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या तुरीच्या नवीन सुधारीत वाणांची व तंत्रज्ञानांची शेतकर्यांना माहिती व्हावी आणि या सुधारीत वाणांचा व तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष अवलंब करुन भरघोस उत्पन्न घ्यावे म्हणून विद्यापीठाच्या वतीने यावर्षी राहुरी, पाथर्डी, नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा व राहाता या तालुक्य...

एटीएम मधुन पैसे काढताना सावधान रहा

Image
सावध  @पत्रकार शिवाजी घाडगे  भामट्या पासून सावध रहा  आज मितीला आपण कोणाला मदत मागायची सोय राहीली नाही कारण कोण कधी कसा गडा घालील यांचा नेम राहिला नाही आता दिवाळी सण जवळ आला बॅकेत पैसे काढायचे असतील तर सावध गिरी बाळगा आपल्या मागे असलेला अथवा अजुबाजुच्या भामट्या वर लक्ष ठेवा कारण आता पैस चोरणे देखील सोपे झाले आहे कोणी आपले एटीएम कार्ड कधी बदली ते सांगता येत नाही आपला पार्सवर्ड कोणाला सागु नका अथवा दाखवु नका नाहीतर दिवाळीत दिवाळे निघल्या शिवाय राहणार नाही   मोबाईल फोन कुणालाही वापरायला न दिलेलाच बरा अथवा ओटीपी देवु नका कोणतीही लिंक ओपन करु नका एटीएम मधुन पैशे काढताना आपल्या पाठीमागे अनओळखी उभा आहे का  तो आपला पिन व एटीएम नंबर पाहात असतो  पैसे काढताना  कुणाचीही मदत घेवु नका मदतीचे बहाण्याने भामटे लोकं एटीएम ची आदला बदली करतात शक्यतो राज्य मार्गावरील कडेचा एटी एम चा वापर करू नका हे प्रकार हायवे लगत होतात हे प्रकार सकाळी आठ ते दहा ह्या वेळेत होतात एटीएम मधून पैशे निघत नसल्यास जास्त झटत बसायला नाही पाहीजे  भामट्या लोकांनी एटीएम स्लो केले...

कुणबी मराठा जातीचे पुरावा शोध मोहीम जलदगतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Image
नगर जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्वीत - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  तालुकास्तरावर ही कक्षांची सोमवार पासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम  युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज 'विशेष कक्ष' कार्यान्वित करण्यात आला.  मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात "स्वतंत्र कक्ष" स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्व...

भोजनात भरडधान्य वापर करा आहारतज्ञ ऋतुजा दिवेकर

Image
शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी भरडधान्य उपयुक्त -  आहारतज्ञ श्रीमती ॠजुता दिवेकर आपल्या दैनंदिन आहारात भरडधान्याचा वापर कसा करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आठवड्यातुन कमीत कमी तीनवेळा आपल्या आहारात भरडधान्याचा समावेश भाकरीच्या रुपाने करावा. आपण आहारामध्ये काय खावे हे एक तर अन्न पिकविणार्या शेतकर्याने आणि आपली आई किंवा आजी यांनी सांगितले पाहिजे तरच आपण परिपूर्ण आहार घेत आहोत असे समजावे. यामुळे आपण खुप सार्या आजारांपासून दुर राहु शकतो. भरडधान्याच्या आहारात केलेल्या योग्य वापरामुळे आपले शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मिशन मिलेटच्या सल्लागार तसेच  आहारतज्ञ  ॠजुता दिवेकर यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे.याप्रसंगी झालेल्या दैनंदिन आहारात श्रीधान्याचे महत्व या विषयावरील विशेष सत्रात मार्गदर्श...

आदिनाथ कराळे यांची व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड

Image
राहुरी फॅक्टरी  व्यापरी संघटना  कधी काळी पोपट पारख व आधापुरे दादा यांनी अनेक वर्ष व्यापाऱ्यांचे नेतृत्व केले कालानुरूप ते पडद्या आड गेले मात्र आता व्यापर वाढल्याने संघटना वाढत आहे ही भुषणाची बाब म्हणावी लागेल  मनोज जंरागे पाटील यांना पाठिबा देण्यात मते मतांतरे झाल्याने राहुरी फॅक्कटरीवर तिसऱ्या व्यापारी संघटना स्थापन झाली असून अध्यक्ष पदी माजी नगरसेवक व शिवबाचे संस्थापक आदिनाथ कराळे यांची सर्वान मते निवड करण्यात आली आहे   राहुरी फॅक्टरी येथील सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे व्यापारी संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी आदिनाथ कराळे यांची उपाध्यक्षपदी जयेश मुसमाडे तर कार्याध्यक्षपदी प्रशांत काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राहुरी फॅक्टरी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे  शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी शेकडो व्यावसायिकांच्या उपस्थित  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राहुरी फॅक्टरी येथील छोटे-मोठे व्यापारी य...

अहरात भरडधान्य वापर करा अपर सचिव अनूप कुमार

Image
आहारात ज्वारी व बाजरीचा वापर करा,गोरेपणावर हर एक जण भुलता है  - अपर मुख्य सचिव अनूप कुमार हिदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर घडलेल्या  हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्यामध्ये  स्वयंपूर्ण झाला.  अन्नाची शाश्वतता झाली. असे असले तरी मैदा युक्त अन्न धान्य वापर आपल्या आहारात वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या जटीलझाल्या. आपली पूर्वीची खाद्य संस्कृती बदलल्यामुळे आपल्याला आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. पूर्वीच्या सिंधु संस्कृतीमध्ये बाजरी वापराचा उल्लेख आढळतो. आद्य संस्कृतीमध्येही हीच खाद्य संस्कृती श्रेष्ठ मानली जात होती. पौष्टिक तृणधान्य पिकविणार्या शेतकर्याला दोन पैसे अधिक मिळावेत आणि त्याचबरोबर शहरातील ग्राहकालाही तृणधान्य वाजवी दरात उपलब्ध व्हावी. आपणा सर्वांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढवावा लागणार आहे. त्याकरीता श्रीअन्न निरंतर हे ब्रिद समोर ठेवून निरंतर चालणार्या मिशनची चांगल्या आरोग्यासाठी भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव  अनूप कुमार यांनी शनिवारी केले.  कृषि विभाग, महाराष्ट्र शा...

अरे बापरे एक कोटीची लाच

Image
ब्रेकींग@ पत्रकार शिवाजी घाडगे  अरे बापरे एक कोटीची लाच  नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने  नगर  शहराजवळ सापळा  रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहा.अभियंता (वर्ग 2) याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अमित किशोर गायकवाड (वय 32 टा. प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर, अहमदनगर,(मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) असे त्या सहा.अभियंत्याचे नाव आहे. दरम्यान,त्याने सदरची लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या कटीता स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले आहे.     लाचेचा यशस्वी सापळा कारवाई  युनिट -ला.प्र.वि. नाशिक  तक्रारदार- पुरुष,  58 वर्ष. आलोसे क्र.1) *किशोर गायकवाड* ,  वय- 32 वर्ष, व्यवसाय - नोकरी , पद- सहाय्यक अभियंता, वर्ग 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर, जिल्हा- अहमदनगर   *क्र.2) गणेश वाघ वर्ग 1 तत्कालीन उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर,...

पद्मश्री राहीबाई पोपरे विद्यापीठा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात शाश्वत श्रीअन्न शेती या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन 4 व 5 नोव्हेंबर, 2023 रोजी विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि)  अनुप कुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत. राज्याचे कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य  अनुप कुमार आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि प्रेरणेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  पहिल्या दिवशी सहा तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्वारी व बाजरी,  नाचणी व बरी, वरई व कोडो, राळा व बर्टी, विपणन,...