राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले  शनि दर्शन
खरच एक काळ असा होता की महिलांना शनि चौथऱ्यावर जाण्यास मज्जाव होता शनि चौथऱ्यावर जाण्या साठी आदोलन झाली मात्र राष्ट्रपती ना आदराने चौथऱ्यावर नेऊन शनी अभिषेक केला 
 महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी शनिशिंगणापूर येथे
श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी  शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.
 यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री  दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
 अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.
   श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे
यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना
 शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. 
श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर  प्रसादालयात  राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर