विकसीत भारत घडवण्यात कृषी विद्यापीठाचा वाटा-राज्यपाल रमेश बैस
विकसीत भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार - राज्यपाल रमेश बैस कृषि हा आपल्या देशाचा मुख्य आधार असुन 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. तुम्ही कृषि विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसुन तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून ही परंपरा सर्मपक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकर्यांचे जीवन पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा. सन 2047 चा विकसीत भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठे व या विद्यापीठातून पदवी घेतलेले तुम्ही कृषिचे पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार कराल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 37 व्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उदद्ेशून अध्यक्षस्थानावरुन...