अॅक्टिव्ह खासदार डाॅक्टर सुजय विखे
भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित करीत संसदेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यामुळे १७व्या लोकसभेतील १० सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद घेण्यात आली आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून जाहीर झालेल्या लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार २५० नवोदित खासदारांमध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने बिर्ला यांनीही खासदार सुजय विखे यांचे विशेष कौतुक केले आहे.
१७ व्या लोकसभेमध्ये २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यापैकी मंत्री न झालेल्या २५० नवोदित सदस्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांनी जनहिताचे ४१ हजार १०४ प्रश्न संसदेत उपस्थित केल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. या सदस्यांपैकी महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४२६ तारांकित प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी होत आपले लक्ष वेधले आहे. जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, चर्चासत्र आणि लोकसभेचे बिल अशा एकूण ५३१ वेळा त्यांच्या सहभागाची नोंद करण्यात आली आहे. लोकसभेच्या पार पडलेल्या ११ सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला, तसेच विविध जनहिताच्या मुद्द्यांवर हस्तक्षेप आपली भूमिका ठाम पणे मांडली.
न्युरोसर्जन असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील जनतेशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेणे, ग्रामीण भागातील प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांची सोडवणूक करणे याला प्राधान्य देत असतात. याच अनुभवाचा आणि शिक्षणासह मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत अस्खलित संवाद साधण्याचा मला संसदेत फार उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. जनतेला भेटून संवाद साधला कि त्यांचे प्रश्न समजतात, त्यांना ऐकल्यावर त्यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे उचलणे सोपे होते. हीच गोष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितली असून त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी झिरो अवर वाढवला आणि अधिक नवोदित खासदारांना सभागृहात बोलता यावे यासाठी सभागृहात दुपारी १ ते २.३० पर्यंत जेवणाचा ब्रेक उशीर केला यांचाही आपल्याला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
Comments
Post a Comment