माजी आमदार मुरकुटे भारत राष्ट्र पक्षात

चर्चा तर होणार @पत्रकार शिवाजी घाडगे 
श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा बीआरएस मध्ये प्रवेश
प्रहवाहाच्या विरोधात राजकारण करून जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले अशोक सहकारी साखर कारखाना,मुळा प्रवरा वीज संस्था व अण्य संस्थेचे अध्यक्ष पद भुषविणारे तसेच वसुली साठी तृतीय पंथी नियुक्त करणारे मुरकुटे यांनी स्थानिक नेत्यांच्या पक्षाच्या नादी न लागता थेट भारत राष्ट्र पक्षात प्रवेश केला 
यामुळे जिल्ह्यातील सहकारातील नेता मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनी गळाला लावला आहे आता भानुदास मुरकुटे यांच्या प्रवेशाने चैतन्य येईल कारण रोख रोख व ईरसाल व्यक्ती मत्व माऊलीच्या सेवेला की उत्तर?

 श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार तथा अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
 
तेलंगणा सरकारने तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या विविध योजनांमुळे माजी आमदार मुरकुटे हे भारावून गेले होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री राव यांची भेट घेतलेली होती. आताही आपल्या निवडक समर्थकांसह ते तेलंगणा येथे तेथील सरकारने केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेलेले होते. याच दरम्यान मुरकुटे यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे 



Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद