टाळिमिया गावाला थेट मुळा धरणातून पाईप लाईन व्दारे पाणी द्या

ग्रामस्थ म्हणतात थेट मुळा धरणातून पाईप व्दारे पाणी द्या अण आ. कानडे म्हणतात ठेकेदारावर कारवाई करा 
टाकळीमियाँ च्या पाणी प्रश्नावर आ. लहू कानडें यांनी  आपली राजकीय पोळी भाजू नये -सिद्धांत सगळगिळे.
.............................................  टाकळीमियाँ गावाला मुसळवाडी तलावातून पाणी पुरवठा होतो . त्या तलावातील पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व खराब वास येणारे व पिवळे असून पिण्यास योग्य नाही तसेच आरोग्यास हानिकारक असून आम्हाला मुळा धरणातून स्वतंत्र पाईप लाईन करून आमच्या हक्काचे पाणी आम्हाला देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आ. लहू कानडे यांचेकडे नागरिकांनी समक्ष केली होती.पण त्यांनी विधानसभेत ठेकेदार व अधिकारी यांच्या चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने टाकळीमियाँ च्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटणार आहे का? आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपण टाकळीमियाँ करांच्या जीविताशी खेळत आहात. असा आरोप रिपाई चे जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे यांनी केला आहे.
            तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, टाकळीमियाँ येथे सन 2016 साली महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग अहमदनगर उपविभाग श्रीरामपूर यांनी राबविलेल्या जल स्वराज्य टप्पा - 2 अंतर्गत टाकळीमियाँ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण न होताच अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ठेकेदार बिले काढून पसार झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. जल स्वराज्य टप्पा - 2 हि योजना मंजूर 8.808.12 लाख रुपयांची होती त्याचा ठेकेदार श्रीराज कन्स्ट्रक्शन सातारा यांनी काम घेतले होते. त्यांनी अतिशय खराब व निकृष्ट दर्जाचे काम करून श्रीरामपूर येथील जिवन प्राधिकरण या उपविभागाच्या अधिकाऱ्याशी संगनमत करून योजना अर्धवट ठेऊन ग्रामपंचायत च्या बळजबरीने ताब्यात देऊन गावकऱ्यांची अक्षरशः फसवणूक केली आहे.
संबंधित योजनेचे कामकाज पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी श्रीरामपूर मतदार संघांचे आ. लहू कानडे यांनी नुकतीच गावाला भेट दिली व पाण्या बाबद सर्व काही समजून घेतले. यावेळी लोकांनी सांगितले कि आम्हाला शुद्ध पाणी पाहिजे आम्हाला पाण्यासाठी देवळाली प्रवरा, राहुरी, तसेच खासगी प्लॅन्ट चे पाणी आणावे लागते. गावातील अशुद्ध पाण्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले असून आम्हाला मुळा धरणातून स्वतंत्र पाईप लाईन करून आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळवून द्या. यावर आ. कानडे यांनी सांगितले कि मी मुळा धरणातून तुम्हाला तातडीने पाणी मिळवून देण्यासाठी विधानसभेत तुमचा प्रश्न मंजूर करून घेतो. मात्र असं न करता जाणीवपूर्वक आ. कानडे यांनी विधानसभेत टाकळीमियाँ येथील जल स्वराज्य टप्पा - 2 च्या कामाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत यासाठी त्यांनी जोर लावला.
       प्रत्यक्षात मात्र मुळा धरणातून स्वतंत्र पाईप लाईन आणण्याचे काही एक जाणीव पूर्वक विधानसभेत सांगितले नाही. तसेच राहिला विषय संबंधित भ्रष्ट अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल होऊन निलंबित करण्याचा तर ते टाकळीमियाँ तील कोणीही सामान्य नागरिक ते काम करू शकतो तो मुद्दा विधानसभेत मांडण्याची गरज काय? आ. कानडे यांनी केवळ निवडणूक डोळ्या समोर ठेऊन काही तरी बिनकामाचा पब्लिसिटी स्टंट केला आहे. असा आरोप निवेदना द्वारे रिपाईचे जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे यांनी केला आहे.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद