सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सहभाग नोंदवा
प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन सुब्रतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय 62 वी फुटबॉल कप सबज्युनियर,ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा १४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १७ वर्षाखालील मुले/मुली (ज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होत आहेत. व १४ वर्षाखालील मुले,मुली सबज्युनियर या वयोगटाच्या स्पर्धा बंगलुरु या ठीकाणी तर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व विभागस्तरावरील स्पर्धेचे आयोजन ३० जुलै २०२३ पूर्वी करण्याबाबत संचालनालयाने निर्देश दिले असुन जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा, महाविद्यालयांनी 12 जुलै, 2023 पर्यंत प्रवेशिका जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत जे संघ सहभागी होणार आहेत अशा संघानी जिल्हास्तर स्पर्धेत सहभागापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तर स्पर्धेत ज्या शाळा,महाविद्यालय सहभागी होणार आहेत त्यांनी १२ जुलै २०२३ रोजी पर्यन्त आपल्या शाळेची प्रवेशिका जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर येथे जमा करावी किंवा ८०८७०७६६३३ विशाल गर्जे यांच्या whats-up नंबरवर पाठवावी. जेणेकरून स्पर्धेचे ठिकाण व वेळापत्रक, ठरविणे सोयीस्कर होईल. संघाच्या प्रवेशिका प्राप्त झाल्यानंतर संबंधित संघाना स्पर्धा वेळापत्रक कळविण्यात येईल.
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेकरिता खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा ही १४ वर्षाखालील मुले,मुली (सबज्युनियर) दि.०१ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षाखालील मुले व मुली ज्युनियर दि.०१ जानेवारी २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. सन २०२३-२४ या वर्षातील जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर,ज्युनियर क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयातील संघानी सहभाग घ्यावा असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात
Comments
Post a Comment