गीता व्दारे मतदान जागृती - अशोक
नगर जिल्ह्यातील शाळांमधूनर मतदार जनजागृती - अशोक कडूस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी , अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मध्ये मतदार जनजागृतीसाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी-माध्य.जि.प.अहमदनगर) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील समस्त शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा "हम भारत के मतदाता है-उत्सव 100 टक्के मतदानाचा"हा महोत्सव 1 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये साजरा होणार असून भारत निवडणूक आयोगाच्या- मे भारत हो हम भारत के मतदाता है व मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र द्वारा प्रकाशित झालेल्या -ये पुढे मतदान कर लोकशाहीचा सन्मान कर ही दोन गीते जिल्ह्यातील हजारो शाळांमधून समूहगीत गायनाच्याद्वारे विद्यार्थी म्हणणार आहेत. मतदार जनजागृतीच्या अधिकृत गीतांद्वारे स्वीप मोहीम जनमानसामध्ये पोहोचवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे, असे प्रतिपादन अशोक कडूस यांनी केले. महोत्सवाचे नियोजन पुढील प्रमाणे-1) सोमवार दि....