Posts

Showing posts from April, 2024

शिर्डी लोकसभेसाठी 22 नामनिर्देशन

Image
शिर्डी लोकसभा मतदारसंघात २२  नामनिर्देशन अर्ज वैध                      शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी, २६ एप्रिल २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज नाकारण्यात आले नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या २२ उमेदवार -भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना - उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव‌ किसन (शिवसेना), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी),  बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर राजाराम कदम (अपक्ष), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष) , प्रशांत वसंत निकम (अपक्ष),...

पॅलस्टीक पुर्नवापर करा-कुलगुरु डॉ पी जी पाटील

Image
प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील दिवसेंदिवस प्लॅस्टिकची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच मानवी जीवनावरही होताना दिसत आहे. झालेल्या एका संशोधनानुसार मानवाच्या संपुर्ण आयुष्यात 20 किलोपर्यंत प्लॅस्टिक त्याच्या पोटात जात आहे. या मायक्रोप्लॅस्टिकमुळे कॅन्सर तसेच विविध रोगांमुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अशा या प्लॅस्टिकला बंदी हा पर्याय नाही तर प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अहमदनगर लोकल सेंटर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची थीम पृथ्वी विरुध्द प्लॅस्टिक ही ...

लोकसभेसाठी खर्च निरीक्षक-शक्ती सिंग

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ३७- अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग यांची नियुक्ती  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने ३७- अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी शक्ती सिंग (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे.     निवडणूक निरिक्षक (खर्च) शक्ती सिंग यांच्याशी ८५२७६६८५८३ या मोबाईल  क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक ( खर्च) श्री सिंग यांचा मुक्काम  शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे असणार आहे. निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन दंडगव्हाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून  त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७८८८०००३०९,९३५९८९४७७४ असा असल्याचे  निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.  

नगर जिल्ह्यातील गोशाळेला चारा देणार

Image
वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्याकडून नगर जिल्ह्य़ातील गोशाळेला चारा देऊ   दुष्काळ परिस्थितीत नगर जिल्ह्यातील गोशाळेच्या मागे उभा राहणार आणि गोरक्षकांना गोरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचा आश्वासन राजू भाई शहा वर्धमान संस्कार धाम यांनी केले त्याचबरोबर गोरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तर एडवोकेट अशोकजी जैन यांनी गोरक्षण करण्यासाठी लागणारे व सर्व प्रकारची कायदेशीर  गोरक्षक आणि गोसंवर्धन बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले...     अॅड किशोर जैन यानी गोरक्षणाचा कायदे विषयक माहिती गोरक्षकांना दिली  गोशाळा आणि गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारणे गोसंवर्धनाचे कार्य अविरत करत असतात  त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे असं मत मिलिंद ची एकबोटे यांनी व्यक्त केले तर गोशाळा आणि गोरक्षण काळाची गरज असल्याचं वसंत लोढा यांनी म्हटले प्रस्ताविक गौतम कराळे यांनी केले या सर्व मेळाव्याचे सूत्रसंचालन ललितजी चोरडिया यांनी केले तर आभार श्रीहरी महाराज घाडगे यांनी मानले यावेळी रवींद्रनाथ महाराज सुद्रिक हिंद...

महापुरुषांचे विचार स्विकारा-कुलगुरू पाटील

Image
महापुरुषांचे विचार स्विकारा  - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे समता, बंधुता व न्याय या तत्त्वांवर कार्य करणारे समाजसुधारक तसेच बुद्धिवादाला आणि तर्कबुद्धीला प्राधान्य देणारे श्रेष्ठ शिक्षणतज्ञ होते. हंटर कमिशनच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा त्यांनी पाया रचला. त्यातूनच निर्माण झालेली आजची कर्तबगार स्त्री ही सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन करीत आहे. स्त्रियांच्या प्रगतीसाठी सती प्रथेचे निर्मूलन, विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न, अनौरस संततीसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची निर्मिती असे प्रवाहाच्या विरुध्द जाऊन क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय त्यांनी घेतले. 19 व्या शतकातील परिस्थिती लक्षात घेता ब्रिटीश सत्तेच्या विरोधात न जाता सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन खर्च केले. आजच्या काळातील महापुरुषांच्या जयंती तथा पुण्यतिथी साजर्या करण्याच्या पद्धती व स्वरूप बदलणे गरजेचे असून महापुरुषांचे विचार अंगीकृत करणे अत्यावश्यक आहे असे प्रति...

मतदान यंत्र एकत्रीकरण झाले

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ   जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या  उपस्थितीत जिल्ह्यातील 3 हजार 734 मतदान  केंद्रांसाठी द्यावयाच्या मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन)  प्रकिया बुधवारी करण्यात आली.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, भूसंपादन अधिकारी चंद्रशेखर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आदी उपस्थित होते.   जिल्ह्यातील ३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभा मतदार संघ  व ३८- शिर्डी अनुसूचित जाती लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभा मतदारसंघ अशा एकुण १२ विधानसभा मतदार संघाच्या आवश्यकतेनुसार  9 हजार 517 बॅलेट युनिट, 5 हजार 194 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 644 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणक...

आचार सहिता अमलात आणा राहुरीचे तहसीलदार पाटील

Image
आचार सहितेच कडेकोट पालन करा  संध्या लोकसंभा निवडणूक साठी निवडणूक आयोगाने आचार सहिता लागु केली असून सन उस्वोव,जंयत्या साजरे करताना आचार संहिता भग होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी राहुरी येथील शांतता कमिटीच्या बैठकित केले  राष्ट्र पुरुषाचा अथवा कोण्या समाजाचा अवमान होणार नाही ही सर्वाची जबादारी आहे भावनेच्या भरात कधी कधी वेळेचे भान राहत नाही मात्र ठरवून दिलेली वेळ पाळली पाहीजे  प्रशासनाच्या परवागी घ्यावी व प्रशासन देखील मदत करेल  यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,गटविकास अधिकारी शिदे यांनी यांनी प्रशासकीय सुचना दिल्या