कुलगुरु डाॅक्टर खर्चे डोक्यात शिरु देवु नका खुर्ची
घाडगे न्यूज |विशेष प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे नवे कुलगुरु डॉ विलास खर्चे यांना विद्यापीठाचा नाव लौकिक मिळुन देण्यासाठी मोठे योगदान द्यावे लागणार आहे यापूर्वीच्या दोन कुलगुरुचे कारनामे व प्रताप समाजावुन घ्यावे लागतील
राहुरीच्य् महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कृषी संशोधन व विकास क्षेत्रात देशात नाव लौकिक असून अशा महान विद्यापीठाचा कुलगुरु होण्याचा बहुमान मला मिळाला असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरु डाॅक्टर विलास खर्चे यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्वागत समारंभात केले.
बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर होत आहे. जमिनीचे आरोग्य खालावले असून त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेतीबरोबरच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरु आहे. याचबरोबर शेती शाश्वत कशी करता येईल या विषयीचे संशोधन करावे लागेल. या विद्यापीठाचे देशात व देशाबाहेर मोठे नाव आहे. हे विद्यापीठ इतर कृषि विद्यापीठांसाठी दीप स्तंभाप्रमाणे आहे. या विद्यापीठात काम करणे याचा सार्थ अभिमान आहै
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद गडाख होते. यावेळी मंदाकीनी गडाख, सुरुची खर्चे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता इंजि. मिलिंद ढोके, प्रभारी कुलसचिव विजय पाटील, नागपूर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, डॉ. कौस्तुभ खर्चे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधनामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. या विद्यापीठाची उंची कायम ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पूर्ण क्षमतेने प्रयत्न करु. प्रत्येकाने समर्पण वृत्तीने काम केले तर निश्चितच राज्यातील शेतकरी, राज्याच्या प्रगतीबरोबरच सर्वांची प्रगती होईल. पिकांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठातील ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता, रिमोट सेंसिंग या सारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कुलगुरुपदी निवड केल्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार मानले. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. शरद गडाख म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतकर्यांसाठी 321 पेक्षा जास्त वाण, 55 यंत्रे तर 2000 पेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या आहेत. भविष्यात संशोधन करतांना शेतकर्यांची गरज ओळखून संशोधनावर भर द्यावा लागेल. सध्या विद्यापीठातील 65 टक्के जागा रिक्त आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून मिळणारा निधी तसेच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान कमी झाले आहे. विद्यापीठ आत्मनिर्भर होण्यासाठी बिजोत्पादन व विविध कृषि निविष्ठा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे त्याचबरोबर नवनविन प्रकल्प शासनाकडून मंजुर करुन घेणे महत्वाचे ठरणार आहे. येथून पुढे सर्वांनी जबाबदारीने काम करुन एका दिशेने, एका विचाराने व एका ध्येयाने आपले कार्य पुढे नेण्याचे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तीन विद्यापीठांचे कुलगुरुपद भुषविण्यास मिळाले त्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान मंगळवारीच विद्यापीठांच्या संकेत स्थळावर कुलगुरु म्हणून डॉक्टर विलास खर्चे याचे छायाचित्र झळकले
तर विद्यापिठाची विस्कळीत झालेली घडी सुरळीत करण्या साठी त्यांना मेहनत घ्यावी लागेल तसेच काही ठराविक अधिकारी व ठेकदाराची मिलीभगत मोडून काढावी लागेल.
व विद्यापीठाचा बहुमान वाढवत विद्यापीठाची ढासळलेली प्रतिमा सुधारावी लागेल मागील कुलगुरु भोवतीच्या चाडळ चौकटी पासून दुर राहावे लागेल तसेच बरयाच काही गोष्टीला जपावे लागेल.
डॉ.विलास खर्चे यांना पूर्ण पाच वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कारभार पाहायचा आहे अनेक समस्या त्यांच्यापुढे आहेत यामध्ये पंधरा वर्षांपासून नोकर भरती नसल्याने प्राध्यापकांची कमतरता आहे, पस्तीस टक्के वरती विद्यापीठाचा कारभार चाललेला आहे. जो आवश्यक निधी हवा आहे तो शासनाकडून आणायची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पदवी आणि पदव्युत्तर पीएचडीचे दर्जेदार शिक्षण मिळणे आणि विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता चांडाळ चौकडी पासून चार हात लांब राहून स्वतःच्या बुद्धीने चौकसपणाने, डोळसपणाने, अभ्यासपूर्वक महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याचा कारभार त्यांना पहावा लागणार आहे. शासकीय महाविद्यालयांबरोबरच विनाअनुदानित खाजगी महाविद्यालयांची निकृष्ट दर्जाची महाविद्यालये कृषी तंत्र निकेतने व कृषी पदविका वर्ग अ मध्ये आणण्याचं कसब त्यांना दाखवावं लागणार आहे याशिवाय कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, संशोधनात्मक, विस्तार कार्य, शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता चारित्र्यसंपन्न जीवन जगून आपल्या प्रकृतीची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. अनेक समस्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या समोर उभ्या असताना त्यांना शिस्त आणणे व प्रत्येकाला आपली जबाबदारी समजून देणे, कर्मचाऱ्यांचे हित पाहणे, भ्रष्टाचार मुक्त विद्यापीठ करणे अशा अनेक आव्हानांना डॉ. विलास खर्चे सामोर्य जावे लागेल याबाबत कर्मचाऱ्यांपासून सामान्य जनतेपर्यंत कुतूहल निर्माण होणार आहे. लोचटगिरी करणारे, चमचेगिरी करणारे, स्वार्थी, मतलबी आणि बदनाम आणि बदनामी करणारे त्यांच्यापासून चार हात लांब राहण्याचं कौशल्य डॉ.विलास खर्चे कसे आत्मसात करतात हे बघावे लागेल.
याची उत्सुकताही सर्वांना आहे. जाती-पाती,प्रांत,तालुका, जिल्हा, नाते गोते, चमचेगिरी करणारे चमकोगिरी करणारे या सर्व गोष्टींपासून स्वतःला ते कसे अलिप्त ठेवतात यावर त्यांचे नेतृत्व,कर्तुत्व, वकृत्व आणि दातृत्व अवलंबून राहील. निश्चितच ते यशस्वी होतील का महात्मा फुले कृषी विद्यापीठाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम डॉ. विलास खर्चे यांना करावे लागणार आहे. निश्चितच त्यांनी कायद्याने काम केले व पारदर्शिपणाने काम केले तर कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना होणार नाही याची कसरत करावी लागेल
माजी कुलगुरु डाॅक्टर सुभाष पुरी यांच्या कालावधीत कुलगुरु डॉ विलास खर्चे याच विद्यापीठ नोकरीला लागले व डाॅक्टर सुभाष पुरी यांनी अतिशय चागले काम येथे व इफाळला केले त्यांचा आर्दश डोळ्या समोर ठेवून काम केले तर निश्चितच या विद्यापीठात प्राध्यापक ते कुलगुरु हे ब्रीद सार्थकी ठरेल हे विद्यापीठ हे तुमचे कुटुंब आहे तुम्ही निश्चितच चांगले काम कराल अशी अपेक्षा तेवढी कुलगुरु खर्चे कुलगुरुची खुर्ची डोक्यात घुसु देवु नका म्हणजे झाले
Comments
Post a Comment