मढी देवस्थान अध्यक्ष विठ्ठल मरकड तर उपाध्यक्ष सुरसिंग पवार

 क्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदी विठ्ठल मरकड तर उपाध्यक्षपदी सुरसिंग पवार यांची  निवड 
राहुरी।
नवनाथ पैकी एक जागृत देवस्थान व भटक्याची पंढरी म्हणून संबोधलेले जाणाऱ्या 
मढी देवस्थानच्या अध्यक्ष पदी विठ्ठल मरकड व उपाध्यक्ष पदी सुरसिंग पवार यांची एक मताने निवड करण्यात आली आहे धर्मादाय आयुक्त नविन विश्वस्त निवड केली या नविन विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली यात नुतन पदाधिकारी निवड झाली 
 अध्यक्ष विठ्ठल मरकड,उपाध्यक्ष सुरसिंग पवार,कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड,सचिव माधुरी मरकड,सहसचिव अनिल साठे,
कार्याध्यक्ष महादेव कोंकाटे,


या निवड प्रक्रियेवेळी भगवान मरकड, उपसरपंच रविंद्र साठे, सतीश मरकड, ज्ञानेश्वर मरकड, विनायक मरकड, राजेंद्र मरकड, माजी अध्यक्ष सचिन मरकड,तानाजीराव धसाळ, अशोक मरकड, सुरेश घोरपडे, प्रदीप पवार, आदित्य पवार, किरण मरकड, संतोष मरकड,तानाजी शिंदे यांच्यासह इतर विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

राहुरी तालुक्याला ऐतिहासिक प्रतिनिधित्व

मढी देवस्थानच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत राहुरी तालुक्यातील सुरसिंग पवार आणि तानाजीराव धसाळ यांच्या रूपाने राहुरी तालुक्याला महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. पहिल्यांदाच मढी देवस्थानचे उपाध्यक्षपद राहुरी तालुक्याला मिळाल्याने परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


देवस्थानच्या निर्णयप्रक्रियेत आता राहुरी तालुक्याचा थेट सहभाग राहणार असल्याने राहुरी परिसरातील भाविकांच्या समस्या, सुविधा आणि विकासकामांना अधिक प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीमुळे राहुरी तालुक्याच्या सामाजिक व धार्मिक प्रतिष्ठेत भर पडली असून भाविक, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून सुरसिंग पवार व तानाजी धसाळ यांचे अभिनंदन केले जात आहे.



Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन