सहेवाल गाय प्रकल्प विद्यापीठात
कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाईंचे संवर्धनाकरीता संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गाईंच्या अनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व अनुवंशिक सुधारणा करणे हा आहे. देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी साहिवाल गायीचे संवर्धन करण्यास या केंद्राचे माध्यमातून प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशी गाईंचे दूध उत्पादन वाढीस हातभार लागेल असे ते म्हणाले. भारत व पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्हा हे साहिवाल गायींचे उगमस्थान. या गाई लंबी बार, लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी आणि तेली अशा नावांनी देखील ओळखल्या जातात. अत्यंत शांत...