Posts

Showing posts from December, 2024

सर्वात मोठा चंद्र

Image
जगाने त्याला Hunter Moon म्हटले तर भारतासाठी शरद पौर्णिमा 2024 असेल. हा या वर्षातील तिसरा आणि सर्वात मोठा सुपरमून असणार आहे. या दरम्यान चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 3 लाख 57 हजार 364 किलोमीटर असेल. 2024 मध्ये हे पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे सर्वात कमी अंतर असेल.

नगर जिल्ह्य़ात भाजपाची रिंगटोन वाजली

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  जिल्हात मंत्री पदासाठी भाजपाची रिंगटोन वाजली असून राजभवनात रविवारी शपथविधी होणार आहे   फक्त विखे-पाटील यांचीच रिंगटोन वाजली असून रविवारी नागपुरात महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार होत  नगर जिल्ह्य़ातील शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना सागर बंगल्यावरून फोन आल्याने केवळ विखे-पाटील यांचीच मंत्रीपदावर वर्नी लागेल हे स्पष्ट झाले आहे  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यागोदर कृषी , गृहनिर्माण  व महसूल मंत्री म्हणून जबाबदारी संभाळली होती यावेळेस त्यांनी कोणते खाते मिळेल हे सायंकाळी सष्ट होईल  दरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी रॅली काढली तर राष्ट्रवादीने अजित पवार गटाने विजयी मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले असले तरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची  शांत दिसते 

जलसंधारण कामाने करंजीत फळबागा बहरल्या

Image
जलसंधारण च्या पाण्याने बहरल्या करजीच्या फळबागा  पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या  ७५ टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते.  पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत   ४ ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि १९ सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. य...

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे

Image
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे  संघाचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कोची (केरळ) येथे दिमाखात संपन्न अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीसाठी वायसीएम इन्टरनॅशनल गेस्ट हाऊस , (एर्नाकुलम) कोच्ची,राज्य -केरळ येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती.एक्झिक्युटिव्ह कोअर कमिटी तसेच जनरल कौन्सिल बैठकीच्या शिफारशी नूसार  नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यासाठी  बैठक संपन्न होऊन त्यामध्ये पुढील तीन वर्षासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवराज बुरीकर(कर्नाटक),राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे (महाराष्ट्र),राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी (ओडिशा), राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी उमा शंकर सिंग(उत्तर प्रदेश)यांची  तर राष्ट्रीय संयुक्त सचिवपदी श्रीम विनयश्री पेडणेकर , सिंधुदूर्ग (महाराष्ट्र ) यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती संघाचे राज्य संयुक्तचिटणीस...

सुक्ष्म पाणी व्यवस्थापन गरजेचे डाॅ विठ्ठल शिंदे

Image
सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या वापराने सिंचन व्यवस्थापन करणे ही काळाची गरज - संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के राहुरी - पाण्याच्या अतिवापरामुळे पिकांच्या मुळांचे नुकसान होऊन मुळांच्या शोषण क्षमतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर जमिनीच्या भौतिक आणि जैविक गुणधर्मावर प्रतिकुल परिणाम होतात. परिणामी पिकांचे उत्पादन घटते. यासाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा योग्य वापर करुन सिंचन व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेले काटेकोर शेती विकास केंद्र व एन.सी.पी.ए.एच., भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म सिंचन प्रणाली या विषयावरील सात दिवसीय कृषि अधिकारी प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.डी. बनसोड, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस.बी. गाडगे, काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. एस.के. डिंगरे उपस्थित हो...

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठचे कुलगुरु प्रशांत पाटील हटवा

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठचे कुलगुरु प्रशांत पाटील हाटवा  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात ... कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा अशी घोषणा देत विद्रोही विद्यार्थी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुक दरम्यान आचारसंहिता भंग केल्याच्या घटना कुलगुरू यांचेकडून घडल्या आहेत. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी होऊन कार्यवाही झाली आहे. कुलगुरू यांचेवर गुन्हे दाखल करून अटक करावी असे आदेश देखील झाले आहेत.  आदिवासी विद्यार्थी कल्याण निधी गैरवापर, महिला अत्याचाराचे कोर्टात सुरु असलेले प्रकरण ई सह अनेक तक्रारी आणि आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करावी असा आदेश इतके गंभीर आरोप असतानादेखील अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शासन प्रशासन स्पष्टपणे पाठीशी घालत आहे. राज्यपाल महोदयांना सुस्ती आल्या सारखे झाले आहे.  अश्या परिस्थितीत विद्रोही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रच्या वतीने राज्यपाल भवनावर मोटार सायकल 'लॉग मार्च' काढून महात्मा फुले कृर...