Posts

Showing posts from April, 2025

शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सयाराम बानकर शासनाचा पोलीस पाटील पुरस्कार जाहीर

Image
शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सायराम पाटील बानकर यांना शासनाचा  पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे 1मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे  विशेष उल्लेखनीय काम केल्या बद्दल सयाराम पाटील यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे  पुरस्कार बद्दल महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या वतीने  सयाराम पाटील बानकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे तर नेवासा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने फटाके वाजवून आनंद उस्वोव साजरा केला 

खरीपपुर्व हंगाम कार्यशाळेचे आयोजन

Image
खरीप हंगामापूर्व कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे यांच्यातील चांगला समन्वय महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेतकरीभिमुख संशोधन सुरू आहे. या दोन दिवसीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेमध्ये महत्त्वाच्या विविध 10 घटकांवर कृषि विभागाच्या अधिकार्यांसाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे खर्या अर्थाने या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान निश्चितपणे शेतकर्यांच्या शेतावर पोहोचेल असे प्रतिपादन अकोला व राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. राज्याचा कृषि विभाग व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय दोन दिवसीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा 2025-26 चे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी यांनी अधिकार्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी व्यासपीठा...

कालव्याच्या नूतनीकरण तसेच दुरुस्ती कामाना निधी कमी पडु देणार नाही-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Image
 कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरण निधीची कमी पडू देणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा - महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  ब्राम्हणी येथे  महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत (एम. आय. पी.) टप्पा १ मधील मुळा प्रकल्पांतर्गत मुळा उजवा कालवा व वितरण व्यवस्था कामांची दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.    आ. शिवाजी कर्डिले, आ. विठ्ठल लंघे, आ. मोनिका राजळे, आ. हेमंत ओगले, माजी आ. पांडूरंग अभंग, जेष्ठ नेते सुभाष पाटील, नामदेव ढोकणे, बाळकृष्ण बानकर, सुवर्णा बानकर, देवीदास म्हस्के, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता, राजेश गो...

जलव्यवस्थापन कृतीपंधरवाडा

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा    - जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त  पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ,  पाण्याचे नियोजन  आदी विषयावर जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.   पाथर्डी तालुक्यात आयोजित कार्यशाळेत  उप विभागीय कृषी अधिकारी भूषण उबाळे व तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे  यांनी मिश्र पिक पद्धती तसेच पिकाला आवश्यक असणारी पाण्याची गरज याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  वितरण बांधकाम विभाग कोळवाडी, तालुका कर्जत येथे आयोजित कार्यशाळेत  कार्यकारी अभियंता धायगुडे  प्रमुख वक्ते सुपेकर यांनी मार्गदर्शन केले.  मुळा पाटबंधारे विभागामार्फत नेवासा येथे कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे  होते.   कृषी पर्यवेक्षक विलास जाधव यांनी जमिनीची सुपीकता यावर मार्गदर्शन करत ऑरगॅनिक कार्बनचे सुयोग्य प्रमाण, जैविक खतांचा वापर,आडवी नांगरणी व पेरणी याबाबत मार्गदर्शन केले.  धनंजय हिरवे यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध...