जलव्यवस्थापन कृतीपंधरवाडा

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा
   - जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त  पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ,  पाण्याचे नियोजन  आदी विषयावर जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. 

 पाथर्डी तालुक्यात आयोजित कार्यशाळेत  उप विभागीय कृषी अधिकारी भूषण उबाळे व तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे  यांनी मिश्र पिक पद्धती तसेच पिकाला आवश्यक असणारी पाण्याची गरज याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
 वितरण बांधकाम विभाग कोळवाडी, तालुका कर्जत येथे आयोजित कार्यशाळेत  कार्यकारी अभियंता धायगुडे  प्रमुख वक्ते सुपेकर यांनी मार्गदर्शन केले. 

मुळा पाटबंधारे विभागामार्फत नेवासा येथे कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे  होते. 
 कृषी पर्यवेक्षक विलास जाधव यांनी जमिनीची सुपीकता यावर मार्गदर्शन करत ऑरगॅनिक कार्बनचे सुयोग्य प्रमाण, जैविक खतांचा वापर,आडवी नांगरणी व पेरणी याबाबत मार्गदर्शन केले.  धनंजय हिरवे यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून ४० ते ५० टक्के पाण्याची बचत करता येते व पाण्याच्या संवर्धन होऊन उत्पादनात वाढ होते.तसेच ऊस पिकामध्ये आंतरपीक घेतल्याने पाण्याचे संवर्धन होते व उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य केल्यास पाण्याचे संवर्धन होऊन उत्पादनात वाढ होण्यास निश्चित मदत होईल, असे सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी दादासाहेब चिमणे यांनी मनोगत व्यक्त केले. 
अकोले तालुक्यात आढळा, प्रवरा, मुळा, कृष्णवंती या नद्याच्या पाण्याची जलपूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. 
 कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कृषी विभागाचे बाळनाथ सोनवणे, तालुका तंत्रज्ञान व्यस्थापक रत्नमाला शिंदे, कृषी अधिकारी भानुदास तिकाडे यांच्यासह तालुक्यातील मोठया व मध्यम, लघु प्रकल्पातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते. यावेळी लाभधारक शेतकऱ्यांची  समृद्धी कशी साधता येइल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

संगमनेर  तालुक्यातील मालपाणी लॉन येथे कार्यशाळा संपन्न झाली.  कार्यशाळेस कार्यकारी अभियंता कै. हि. ठाकरे, बापूसाहेब कडलग, श्री.गणेश शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

राहुरी तालुक्यात आयोजित कार्यशाळेत प्रा.पोफळे यांनी पाणी व्यवस्थापन बाबत विद्यापीठाने विकसित केलेल्या ऑनलाईन ॲपबाबत उपस्थितांना माहिती दिली. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन