अक्षय कर्डीले यांनी जिकले मने वडिलांच्या आठवणीने रडले मने

राहुरीत अक्षय कर्डीले यांनी जिंकली जनतेची मने; वडिलांच्या आठवणींनी रडले सगळेच 
राजरंग।शिवाजी घाडगे 
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी झालेली भाजपची प्रचार सभा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता भावनांचा महासागर ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला प्रचंड जनसमुदायाने प्रतिसाद दिला. मात्र या सभेचे खरे केंद्रबिंदू ठरले ते उमेदवार अक्षय कर्डीले यांचे हृदयस्पर्शी, प्रांजळ आणि अश्रूंनी दाटलेले भाषण.
सभास्थळी वातावरण उत्साहाने भरलेले असतानाच अक्षय कर्डीले व्यासपीठावर उभे राहिले आणि काही क्षणांसाठी त्यांनी जनसमुदायाकडे पाहिले… तो क्षण जणू भावनांनी भारलेला होता. आपल्या भाषणाची सुरुवात करताच त्यांनी दिवंगत वडील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि क्षणार्धात संपूर्ण वातावरण गंभीर झाले. माझ्या मनात काय वेदना आहेत प्रतेक जण भेटायला येतो मात्र वडील भेटायला कधी येणार नाहीत ही वेदना सहन होत नाही. वडलांच्या आठवणीने,बहीण, पत्नी नातेवाईक संगळेच रडले मात्र उपस्थित जनसमुदाय सुध्दा रडला 
“माझ्या वडिलांनी आयुष्यभर समाजासाठी झटत, लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केले, तो केवळ जनसमुदाय नाही, तर एक विश्वासाचा महासागर आहे. त्या महासागराच्या काठावर उभा राहून मी स्वतःला अनेकदा विचारतो—मी हे सर्व पेलू शकेन का?” असे म्हणताना त्यांचा आवाज दाटून आला.
ते पुढे म्हणाले, “वडिलांचे छत्र हरपल्यावर आयुष्य किती बदलून जाते, हे मी गेल्या काही महिन्यांत अनुभवले आहे. त्यांच्या सावलीत असताना कोणतीही अडचण मोठी वाटत नव्हती. पण आज प्रत्येक निर्णय घेताना त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. इतक्या लवकर एवढी मोठी जबाबदारी अंगावर येईल, असे कधीच वाटले नव्हते.”
सभास्थळी उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांसमोर त्यांनी मन मोकळे केले. “आजही वडिलांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मला भेटायला येतात. त्यांच्या आठवणी सांगतात, त्यांच्या कामांची उदाहरणे देतात… आणि त्या प्रत्येक क्षणी मला वाटतं—आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकू का? पण त्याच वेळी तुमचा विश्वास आणि साथ पाहून माझ्या मनात नवे बळ निर्माण होते,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अक्षय कर्डीले म्हणाले, “मुख्यमंत्री साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी कधीही खोटा ठरू देणार नाही. हा विश्वास तुमच्या मतांच्या बळावर मी निश्चितच सार्थ करून दाखवेन.”
भाषणाच्या शेवटाकडे जाताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. “आपण सर्वांच्या आशीर्वादाने आणि साथीनं नक्कीच विजय मिळवू. पण वडिलांची आठवण आली की डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही… आज ते असते, तर कदाचित माझ्या या प्रयत्नांकडे पाहून त्यांना अभिमान वाटला असता,” असे म्हणत त्यांनी क्षणभर शब्द थांबवले. त्या क्षणी सभास्थळी एकच शांतता पसरली आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
ही सभा केवळ राजकीय भाषणापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती एका मुलाच्या मनातील वडिलांप्रती असलेल्या प्रेमाची, आदराची आणि जबाबदारीची जिवंत साक्ष ठरली. अक्षय कर्डीले यांच्या या भावनिक आणि प्रामाणिक संवादाने मतदारांच्या मनावर खोलवर ठसा उमटवला.
सभेच्या शेवटी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.”
भावनांनी ओथंबलेली ही सभा राहुरीच्या राजकीय इतिहासात एक वेगळा ठसा उमटवून गेली.
यावेळी मुक्यभंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुढे, संभापती प्रा राम शिंदे, पालमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार मोनिका राजळे, प्रसाद लाड, विक्रम पाचपुते, अमोल खताळ, काशिनाथ दाते, संग्राम जगताप, डाॅ सुजय विखे-पाटील, अँड सुभाष पाटील, अरुण तनपुरे, आदी सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर