जप्त अंमली पदार्थ चोरी व विक्री प्रकरणाला वेगळे वळण

जप्त अमली पदार्थ चोरी व विक्री प्रकरणाला नवे वळण; अधिकाऱ्यावर 
 वळणचे  डाॅक्टर विजय मकासरे यांचे गंभीर आरोप
घाडगे न्यूज।प्रतिनिधी  
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या चोरी व विक्री प्रकरणात आता स्थानिक गुन्हे शाखेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या भूमिकेची नव्याने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी डाॅक्टर विजय मकासरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांच्या कडे 
 तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 
 सरकारी मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असतानाही त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुद्देमाल कक्षाची नियमित तपासणी, नोंदवही पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात केवळ एक पोलिस हवालदार  शामसुंदर गुजर याच्यावर कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आक्षेपही अर्जात घेण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे  डाॅक्टर विजय मकासरे यांनी  म्हटले आहे. तेव्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील 
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तात्काळ निलंबित करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अमली पदार्थ नियंत्रण कायदा (NDPS) अंतर्गत निर्धारित नियमांचे तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घेतल्याचे समोर आले आहे. संबंधित आमदार तसेच गृहराज्यमंत्री यांनीदेखील या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे.
राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. जर या प्रकरणात योग्य व निष्पक्ष कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालय तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही अर्जाद्वारे देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी चौकशीत नेमकी कोणती तथ्ये समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर