Posts

Showing posts from October, 2023

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचे आदेशः नाशिक व नगरचे

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  जायकवाडी धरणा साठी सम न्याई पाणीवाटप कायद्या नुसार  8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक गोदावरी खोरे यांनी सोमवारी दिले आहेत  नगर जिल्ह्य़ातील मुळा धरणातून 2.10 टीएमसी,तर भंडदरा व निळवडेतुन 3.36 पाणी नदीतुन सोडण्यात येणार आहे दोन दिवसात तातत्काल हे पाणी जायकवाडीच्या धरणाकडे झेपावताना दिसेल  जायकवाडी ला पाणी गेल्याने भंडारदरा धरण चे दोन आर्वतन तर मुळा धरण चे एका आर्वतनाला शेतकऱ्यांना मुकावे लागणार असल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत 

तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवयला पाच जण इच्छुक

Image
चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे  तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवयला पाच जण इच्छुक  नगर जिल्हा बॅकेचे 124.75 कोटी रुपये कर्ज कारखन्याकडे घेणे असल्याने बॅकेने हा कारखाना पंधरा वर्ष भाडेतत्त्वावर चालवयला देऊन कर्ज वसूल करणार आहे  30 ऑक्टोबर ही भाडेतत्त्व निविदा स्विकारण्याची अंतीम तारीख असून आज पोहत पाच निविदा ची विक्री झाली आहे पुण्यातील तीन तर नगर मधील एक जणानी 30हजार रुपये भरून अर्ज नेले आहेत  कारखान्यांची सध्य स्थिती पहाण्या साठी उद्योजक येत आहेत  सहकारातील चांगला कारखाना राजकीय कुरघोडीपाई संपला असल्याची भावना सभासद शेतकरी व कामगार वर्गातुन बोलून दाखवली जात आहे  आसवानी प्रकल्प लायसन्स विक्री करुन कारखाना कर्ज मुक्त होऊ शकला असता मात्र त्या साठी कोणीच पुढे आले नाही  आता पंधरा वर्ष तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देताना आमचे प्राव्हिडट फड व थकीत पगार मिळावेत ही कामगाराची अपेक्षा आहे 

राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांची महात्मा फुले विद्यापीठास भेट

Image
राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सदिच्छा भेट राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती परिसरातील विविध संशोधन प्रकल्पांना भेटी देऊन संशोधनाविषयीची माहिती संबंधित शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव  विठ्ठल शिर्के, पुणे कृषि विभागाचे सहसंचालक  रफिक नाईकवडी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, अहमदनगरचे आत्मा प्रकल्प संचालक  विलास नलगे, प्रसारण अधिकारी डॉ. पंडित खर्डे, आत्मा उपसंचालक राजाराम गायकवाड, राहुरी तालुका कृषि अधिकारी  बापुसाहेब शिंदे, मंडल कृषि अधिकारी अशोक गिरगुणे उपस्थित होते. कृषि आयुक्तांनी यावेळी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच नैसर्गिक शेती संशोधन प्रकल्प, बांबू संशोधन प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प तसेच बियाणे विभागांना भेटी दिल्या. यावेळी डॉ. आनंद सोळंके, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. उल्हास सुर्...

नाशिक च्या तहसीलदार डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा नोकरीचा राजिनामा

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीच्या तात्कालिन तहसीलदार   डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा शासकीय सेवेतील नोकरीचा राजिनामा दिला आहे राजिनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे   सध्या त्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या लोकसेवा आयोगामार्फत त्या नायब तहसीलदार म्हणून महसूल मध्ये नोकरीस लागल्या सोळा वर्ष सेवा केली  नाशिक देवळाली विधान सभा मतदार संघातील विद्यभान आमदार सरोज अहिरे व राजश्री अहिराव याच्यात शित युध्द सुरु होते राजश्री अहिराव या भविष्य राजकारणात आल्या तर नवल नाही 

माजी मंत्री बबनराव ढाकणे निधन

Image
माजी मंत्री बबनराव ढाकणे निधन केंद्रात पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात सहकार खाते तसेच उर्जा संसाधन मंत्री  माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी शुक्रवारी उपचारा दरम्यान दुःख  निधन झालं आहे. त्याच्या निधनाने जिल्ह्यात शोक कळा पसरली आहे   त्यामुळे एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्व कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी विविध पक्षात काम केलं असून केंद्रात तसेच राज्यात अनेक मंत्रीपद भुषवली आहेत. अहमदनगर येथील अकोला येथे १० नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता. १९७८ मध्ये बबनराव ढाकणे यांनी विधानसभेची निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले होते. त्याच वर्षी त्यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर १९७९ मध्ये त्यांनी ग्रामविकासमंत्री 

आम्ही विकास कामाचे आकडे सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
आम्ही विकास कामांवर खर्च केलेल्याचे आकडे सांगतो तर या आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे आकडे ऐकावयास मिळायचे असे म्हणत काॅगेस वर निशाना साधला तर  इतके वर्षांपासून लाभाची पदे भोगत असलेले व दिल्लीत कृषी मंत्री पद उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकरया साठी काय केले असा सवाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार,महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,याच्या सह अण्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते  सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोभावे साईबाबाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली तर विविध विकास कामांचे लोकार्पण केले तसेच पन्नास वर्षां पासुन रखडलेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचे जल पूजन करत डाव्या कालव्यातून पाणी सोडुन तो लोकार्पण केला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या सत्ता धारयाचे नाव न घेता भष्ट्राचाराचा आरोप करून पुन्हा शरद पवार यांना लक्ष्य केले  पाणी हे जीवन असून थेंब अण थ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जलपूजन करत डाव्या कालव्यातून पाणी सोडले

Image
निळवंडे धरणाचे जलपूजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाव्या कालव्यातून पाणी सोडत केले शेतकऱ्यांन अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्पाचे लोकार्पण  गेली पन्नास वर्ष रखडलेला प्रकल्प पूर्ण झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त  यावेळी राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, महसूल मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,उपस्थित होते 

बारामती व लासलगाव बाजार समितीला पहिला नंबर तर संगमनेर तिसरी

Image
कृषी बाजार उत्पन्न समित्यांची क्रमवारी जाहीर झाली असून  लासलगाव आणि बारामती  बाजार समितीचा प्रथम क्रमांक तर कारजा दुसरी व संगमनेर तिसरी   राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची  वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे.             बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती, पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.             स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यामध...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज शिर्डी  हिंदुस्थान चे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी  गुरुवारी २६ ऑक्टोंबरला  शिर्डी येथे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा देखील करणार आहेत यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतर शिर्डी जवळील काकडी विमानतळालगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे,  रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.   शिर्डीत येणाऱ्या देश- विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे. यासाठी  साई संस्थानने  १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २...

एकात्मिक शेती प्रकल्प मंजूर

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाला पीक  विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प मंजुर महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे एकात्मिक शेती पध्दती प्रकल्प कार्यरत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या उत्तरप्रदेशातील मोदीपूरम येथील भारतीय शेती प्रणाली संस्थेने पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाची निवड केली आहे. भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध राज्यातील 75 जिल्ह्यात सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांकरीता पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणार्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकर्यांच्या 100 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प पुढील पाच वर्षांसाठी राबविला जाणार आहे.  यामध्ये बदलत्या हवामानानुसार व जमिनीचे आरोग्य अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विविध पीक पध्दतींचा अवलंब करणे आणि त्या अनुशंगाने सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार व अधिकाधिक उत्पन्न घेण्याबरोबरच जमिनीची सुपीकता ठ...

शूटींग बाॅल स्पर्धेत छत्रपतींचा संघ विजेता

Image
आज दाढ येथे पार पडलेल्या 19 वर्ष  आहमदनगर जिल्हा शासकीय पावसाळी क्रीडा स्पर्धा सन 2023 शूटिंग बॉल जिल्हा स्थरिय स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा या विद्यालयाचा 19 वर्ष वयोगटात ( मुली ) प्रथम क्रमांक पुणे विभागीय स्पर्धे साठी संघाची निवड. खालील शालेय जिल्हास्तरीय शूटींग बाॅल स्पर्धेत जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल च्या मुलीच्या संघाने पटकावला पहिला क्रमांक या संघाने अतिम सामन्यात प्रवरा विद्यालय दाढ संघाचा पराभव केला  विजयी संघात राष्ट्रीय खेळाडु प्रज्ञा गडाख,प्रगती गडाख यांच्या सह ,नेहा कडु,आरती देशमुख , ईश्वरी मुसमाडे अमृता नरोडे आकांशा कदम तनिष्का गवळी यशांजली विघे तनुजा जगताप प्रज्ञा मुसमाडे  या खेळाडु सहभागी झाल्या होत्या संघ व्यावस्थापक गणेश भांड होते विजयी खेळाडुचे विदयालयाचे प्राचार्य पोपट कडुस याच्या सह क्रिडा प्रेमी दत्तात्रय कडु पाटील, जिल्हा शूटींग बाॅल फेर्डेशन अध्यक्ष चंद्रशेखर कन्हेरकर, शिवनेरी कल्बचे प्रक्षीक राजेंद्र पुजारी आदीनी अभिनंदन केले 

अजून चार ठिकाणी कृषि कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्याचा मानस

Image
विद्यापीठ चे कृषि संशोधन थेट बांधावर पोचवण्या साठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आणखी चार ठिकाणी  कृषी कम्युनिटी रेडिओ सेंटर सुरु करण्याचा महात्मा फुले कृषी विद्यापिठाचा मानस असल्याचे मत कुलगुरु डॉ पी के पाटील यांनी एस जी न्युज बरोबर बोलताना व्यक्त केले  संध्या बुधवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत पन्नास लाख रूपये खर्च करून फुले कृषी वाहीनी 90.8 एफ एम सुरु करण्यात आला असून किमान नऊ लाख शेतकऱ्यांपर्यंत हा आवाज पोहचनार आहे अतिशय नवीन अद्यावत असा स्टुडिओ उभारण्यात आला असून विद्यापीठाचे संशोधन थेट काम करतात करता शेतकरी ऐकु शकतील व तज्ञ शास्त्रज्ञ यांना थेट आपली समस्या सागु शकतील विद्यापीठात आपण आपल्या काळात एक चांगले कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारु शकलो यांचा मनस्वी आनंद आहे 

महत्मा फुले कृषी विद्यापीठाने केला सुरु केला कम्युनिटी एफ रेडिओ

Image
नगर जिल्ह्य़ात आणखी एक खासगी कम्युनिटी एफ रेडिओ  महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या एफ एम रेडीओ आवाज आता शेतकर्यांना पर्यंत पोहोचेल तंत्रज्ञान   फुले कृषि वाहिनीचे कुलगुरू डॉ  पी जी पाटील यांनी केले उद्घाटन   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कम्युनिटी रेडिओ सेंटरची फुले कृषि वाहिनी 90.8 एफ.एम. चे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. आनंद सोळंके, डॉ. आण्णासाहेब नवले, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. कांबळे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे व रेडिओ सेंटरचे प्रमुख अधिकारी डॉ. आनंद चवई उपस्थित होते.  याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की तंत्रज्ञान प्रसारासाठी रेडिओ हे फार प्रभावी माध्यम असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पो...

तनपुरे साखर कारखान्या साठी एकच निविदा

Image
बातचीत @पत्रकार शिवाजी घाडगे  आत्तापर्यंत गेली एकच निविदा   राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी कोणी होणार का मनोज जंरागे पाटील ! पाटलांनी सुरु केलेला सहकारी साखर कारखाना पाटलांच्या कुरघोडीत बंद पडला आता तो भाडेतत्त्वावर चालवण्या देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने जाहीरात काढली असून 140 कोटी कर्ज वसूली साठी पंधरा वर्ष कराराने व 20 कोटी रुपये भाडे यावे अशीच बॅकेची अपेक्षा  आहे मात्र हा कारखाना सुरु करण्यासाठी मनोज जंरागे पाटील सारख्या निष्ठावंत व सच्च्या विचाराच्या महनीय व्यक्तीच्या विचाराची गरज आहे मात्र तसे होणार का फक्त राजकारण? निवेदा दाखल करण्यास हा आठवडा आहे व आजपोहत एकच निवेदा गेली आहे  राहुरी तालुक्याचा विधान सभा मतदार संघात विभागणी झाल्याने तालुक्याच्या राजकारणाला मरगळ आली असून या आगोदर संगळे राजकारण तनपुरे सहकारी साखर कारखान्या भोवती फिरत होते आता सगळेच चक्रे उलटे फिरले अण राज्य मार्गा लगतचा सहकारी साखर कारखाना बंद पडला  जिल्हा बॅकेत हजार,पाचशेच्या नोटा पडून आहेत त्याचे काहीच होत नाही मात्र एक तनपुरे साखर कारखान...

डाॅक्टर कलाम जन्म दिवस निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम  - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस  हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  कार्यक्रम संपन्न झाला.   कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हाग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर,संजय कळमकर, शशिकांत नजान, प्रा.डॉ.सुधाकर शेलार,प्रा.शशिकांत शिंदे आदींसह  उपस्थित होते.      यावेळी मान्यवरांनी  वाचनाचे महत्त्व विषद करुन  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती दिली.  

साई आदर्श पतसंस्थेला पुरस्कार जाहीर

Image
येधील साई आदर्श या पतसंस्थेस अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचा स्थैर्यनिधी संघाचा सहकार समृद्ध पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. सहकार क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने यावर्षीचा पतसंस्था पुरस्कार 2023 साठी साई आदर्श पतसंस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श पतसंस्थेची निवड करण्यात आलेली आहे.  या पुरस्काराचे वितरण दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच सहकार आयुक्त  अनिल कवडे व बुलढाणा अर्बनचे चेअरमन  राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  साई आदर्श संस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे म्हणाल्या की सहकार समृद्धी पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. यामध्ये संस्थेचे मार्गदर्शक  शिवाजी कपाळे , व्हा. चेअरमन  स्वराज गीते व संचालक मंडळ तसेच कर्मचारी  यांचेही सहकार्य लाभले आहे.  सभासद ठेवीदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे तो सार्थ ठरत आह...

तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवयला देणार

Image
होत्याच नव्हत झाल @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देणार जिल्हा सहकारी बॅकेने दिली जाहिरात  40 कोटीचे झाले 124 कोटी रुपये  आता कोण घेणार कारखाना भाडेतत्त्वावर चालवयला कामगारांचे पगार ही थकलेले तसेच इतर शासकीय देणेदारी देणे  शेवटी साखर कारखाना जाणार भाड्याने  संध्या कारखान्यांवर प्रशासक असून सदर कारखान्याचे भवितव्य आधारात असून आगे आगे होता है क्या यह देखणा पडेगा 

लाच मागणी करणाऱ्या पोलीस हवालदार विरोधात गुन्हा दाखल

Image
लाच मागणी गुन्हा अहवाल एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मुरलीधर खैरे याला लाच मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा दाखल केला आहे   आलोसे नंदलाल मुरलीधर खैरे, पोलिस हवालदार/301, नेमणूक, एम आय डी सी पोलिस स्टेशन, जि. अहमदनगर लाचेची मागणी-30,000/-₹  तडजोडी अंती10,000/-₹ लाचेची मागणी दिनांक- ता.26/07/2023 लाचेचे कारण तक्रारदार यांचे कुटुंबिय व त्यांचे शेजारी राहणारे  यांच्यामध्ये कचरा गोळा करून पेटवून देण्याच्या कारणावरून  दि.10/07/2023 रोजी वाद झाला होता. सदर वादात तक्रारदार  यांची भावजयी   किरकोळ जखमी झाली होती म्हणून तक्रारदार यांनी एमआयडीसी पोस्टेला गुन्हा नोंदविला होता. त्याअनुषंगाने आलोसे हे तक्रारदार यांचे घरी पंचनामा करणे करिता गेले होते. त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार यांचे शेजारी हे तक्रारदार व त्यांचे भाऊ  यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देणार  असल्याबाबत सांगितले होते व विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवुन घेण्याच्या मोबदल्यात 30,000/-रुपयाची  लाच मागणी करत असल्याबाबतची ...

आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवा

Image
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक उत्पादन वाढवावे - संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध पिकात संशोधन करुन अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत केले आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, डिजीटल पध्दतीने शेतीसाठी पाण्याचा वापर तसेच शेतीचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी विविध मोबाईल अॅपस्ची निर्मिती यांचा समावेश आहे. शेतीसाठी यंत्रमानव निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांचे शेतीमधील कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करुन पीक उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटातील शेतकर्यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्यानंतर डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात विद्यापीठातील शास्त्रज्ञांबरोबर संवाद साधला. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन व...

खेळाडु पोलीस कन्येचा पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते गौरव

Image
पोलीस कन्येचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव नगर जिल्हा पोलीस दलास भुषणाची बाब  अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी संपतराव भोसले यांची कन्या भारतीय टेनिसपटू ऋतुजा भोसले यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

तृतीयपंथीय शिबीर 12 ऑक्टोबर रोजी

Image
तृतीयपंथीयांसाठी एक दिवसीय शिबीराचे आयोजन   तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा देणे, त्यांचे सामाजिक प्रश्न व हक्क, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक जाणीवजागृतीसाठी गुरुवारी 12 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11-30 वाजता डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडीनाका, अहमदनगर येथे एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे  आवाहन सहायक आयुक्त, राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. आहे.             तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधारकार्ड देण्याबरोबरच तृतीयपंथीयांची राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे, प्रमाणपत्र, ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याबरोबरच तृतीयपंथीयांची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांर्माफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन आरोग्य विषयक जाणीव जागृती, ताण-तणाव व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या एकदिवसीय शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तृतीयप...

एम पी के व्हीत जल संशोधन बैठक

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठ  येथे कृषि जल कंन्सोर्टिया संशोधन प्रकल्पांची वार्षिक आढावा बैठक संपन्न भारतीय कृषि संशोधन परिषद अंतर्गत असलेल्या कृषि जल कंन्सोर्टिया संशोधन प्रकल्पांची वार्षिक आढावा बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली या संस्थेचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी हे अध्यक्षस्थानी तर सहाय्यक महासंचालक डॉ. ए. वेलमुरुगन व डॉ. अदलूल इस्लाम उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय जल व्यवस्थापन संस्था, भुवनेश्वर येथील संचालक डॉ. ए. सारंगी, प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. जेना व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस.डी. गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. एस.ए. रणपीसे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील तसेच देशातील विविध संशोधन संस्थेतील कंन्सोर्टिया प्रकल्पांचे प्रमुख संशोधक उपस्थित होते. यावेळी विविध संशोधन संस्थेतील सुरु असलेल्या कंन्सोर्टिया प्रकल्पातील प्रमुख संशोधकांनी तेथील सुरु असलेल्या संशोधनांचे सादरीकरण केले. संपुर्ण कंन्सोर्टिया प्रकल्पांचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. जेना यांनी सर्व प्रकल...

हाॅलिबाल महाराष्ट्र संघ अजिंक्य

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  42 वी न्याशनल शूटींग बाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अजिंक्य रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता उत्तर प्रदेश व महाराष्ट्र संघात लढत झाली  त्यात शेवट घासून होत महाराष्ट्र ने अजिंक्य पद मिळवले  शिवनेरी कल्बच्या प्रज्ञा गडाख,प्रगती गडाख व कावेरी संसारे या तीन खेळाडुचा समावेश आहे  माजी आमदार भाऊसाहेब काबळे,दत्तात्रय कडु पाटील,राजेंद्र पुजारी,अशोक थोरे, संजय छलारे,राजेंद्र पुजारी आदींनी खेळाडुचा सत्कार केला होता 

शिर्डीत पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  शिवसेनेची मशाल अखेर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हाती शनिवारी मुंबईत शिवालय येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेण्यात आले अण्य विषयावर चर्चा झाल्या मात्र आगामी शिर्डी लोकसंभा मतदार संघात पुन्हा वाकचौरे यांनाच संधी दिली जाणार असल्याचे संकेत

आदर्श पंत संस्थेकडे 72 कोटीच्या ठेवी

Image
अर्थ क्रांती मध्ये अग्रेसर असलेल्या  आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडे 73 कोटीच्या ठेवी असून यावेळी संस्थेने 12 टक्के लाभांश आपल्या सभासदाना देणार आहे  अलिकडेच वार्षिक सर्वसाधारण सभा    अध्यक्ष विष्णुपंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली झाली   यावेळी सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले . संस्थेचे संस्थापक शिवाजी कपाळे यांनी म्हणाले की  पतसंस्थेवर ठेवीदार, कर्जदार, खातेदार, सभासदांचा खूप मोठा विश्वास आहे त्यामुळेच आत्तापर्यंत सुमारे 73 कोटी ठेवींचा टप्पा संस्थेने गाठला आहे सर्व सामान्य माणूस, सामान्य सभासद व व्यावसायिकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहोत. सभासदांना याही वर्षी 12 टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे संस्थेचे सर्व व्यवहार सहकार खात्याच्या नियमानुसार करून सभासद खातेदारांना व्यवहाराच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यात आम्हाला सर्व संचालक मंडळ ,सभासद ,कामगार व कलेक्शन एजंट यांचे सहकार्य लाभले आहे यापुढे सर्वांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा चेअरमन विष्णुपंत गीते यांनी व्यक्त केली.  संस्थेच्या थकबाकीदार स...