Posts

Showing posts from November, 2024

चाणक्य अमित भाई चुप का आहेत

Image
चाणक्य चुप का आहे ! भाष्य @पत्रकार शिवाजी घाडगे  केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणातील आधुनिक चाणक्य म्हणून संबोधले जाते अतिशय धुर्णधर व मुसद्दी व संयमी व्यक्त मत्व तसेच तितकेच प्रखर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातला तिनदा मुख्यमंत्री व आता हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ते अमित शहा यांच्या चाणक्य नितीने असे असले तरी महाराष्ट्रात भाजपाला 132 विधानसंभा सदस्य निवडून आले व ते आमच्या नियोजनाने आले अथवा यांचा फार मोठा त्याग आहे म्हणून यानाच करा मुळात मागे देखील महाराष्ट्रातील स्थानिक नेते उध्दव सेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते मात्र अमित शहा यांनी स्पष्ट नाही म्हटले होते नंतर पुन्हा मुख्यमंत्री व्हायची ईतकी घाई केली की पहाटे शप्पथ विधी झाला तो ओट घपकेचा ठरला व शिवसेनेचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेना काॅगेस बरोबर युती झाली सोबतीला राष्ट्रवादी होतीच अडीच वर्षा नंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले व एक मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे अस म्हणत 40 आमदार व 13 खासदार घेऊन युती करत भाजपाला जाऊन मिळाले तसे आज सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ...

शिंदे सेना नरमली

Image
धनुष्यबाणाचा तिढा न्यायालयात असल्याने एकनाथ शिंदे नरमले ? चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे  शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आहे हे महाराष्ट्रला ठाऊक आहे व धनुष्यबाण हा आमचा आहे यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत यांचा निकाल अद्याप लागलेला नाही  विधानसंभा एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण लढवुन 58 आमदार निवडून आनले निवडून आलेल्या आमदारांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करावे असे वाटत होते भाजपा 132 आमदार निवडून आल्याने मुख्यमंत्री भाजपा असावा असा अग्रह धरला व ते सहाजिक मात्र शिंदे शिवसेना घेऊन आले नसते तर तुम्ही सत्तेत नसता असे शिवसेना आमदार यांना वाटायचे मात्र धनुष्यबाण देखील न्यायालयात आहे याचा विसर त्यांना पडला होता व याचीच आठवण भाजपाने शिंदे सेनेले करुन दिल्याने पंतप्रधान नरेद्र मोदी व केद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य करण्याचा सुरु निघाला 

शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन प्रक्षिण

Image
शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन विषयी प्रशिक्षण  आयोजन - मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फलोत्पादन व अनुषंगिक विषयावर संस्थानिहाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून  इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.  शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला रोपवाटीका, कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती,  जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, ड्रॅगनफ्रुट व जिरॅनियम व नाविन्यपूर्ण पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन, हरितगृह, पॉलीहाऊस व्यवस्थापन हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट प्रशिक्षण, फळे व भाजीपाला काढणीपश्चात व्यवस्थापन आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन ते पाच दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण साहित्य, चहापान, भोजन व निवास व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

शिंदे चा दबाव की शिंदे वर दबाव

Image
शिंदे चा दबाव की शिंदे वर दबाव  महाराष्ट्र विधान संभा निवडणूकीत भाजपा, शिवसेना ( शिंदे ) राष्ट्रवादी (दादा) या महायुतीला डबल बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच करावे असा दबाव संध्या टाकला जात  आहे तर आता भाजपाला जास्तीच्या जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहीजे अशी त्यांच्या समर्थक इच्छा आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपण मुंबई येऊन मुख्यमंत्री जाहीर करु असे सागितल्याने मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा सस्पेन्स वाढला आहे  शिंदे गटाकडून आम्ही अडीच वर्ष पुर्वी जिवाची परवा न करता तुमच्या सोबत आलो व शिंदे यांच्या मुळे ही सत्ता आली आहे तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे आहे केंद्रात देखील आम्ही तुमच्या बरोबर आहोत भाजपाची केंद्रात पूर्ण बहुमत नसल्याने शिंदे देखील भाजपा वर दबाव टाकत आहेत  भाजप नाव निश्चित करायचे व तेच खाली व्हायचे मात्र शिंदे यांनी याला रोख लावला आहे निवडणूक दरम्यान दहा बारा  भाजपा कार्यकर्त्यांना भाजपाने उमेदवारी घेतली व निवडुण देखील आले  कडणविस यांनी शिंदे यांचे मुख्यमंत्री म्ह...

भाई नव्हे भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Image
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाई नव्हे भाऊ  मोठी बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आता भाजपा 133 आमदार आल्याने करणार नसल्याचे राजकीय सुत्राचे म्हणणे असून  देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत  तेव्हा एकनाथ भाई नव्हे तर देवा भाऊ मुख्यमंत्री होणार  दरम्यान शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट मागितली आहे 

सागर होणार की वर्षा ?

Image
महाराष्ट्र चे भावि मुख्यमंत्री यांचे नाव निश्चित होण्यास काही तास उरले आहेत  बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  सागर बंगला होणार का वर्षा अशी चर्चा गल्लीत सुरु असली तरी सारे काही दिल्लीत होणार आहे.  पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिवसेना आमदार उघड पणे बोलुन दाखवत आहेत तसेच लाडक्या मुख्यामंत्र्या साठी बहीणी मैदानात उतरल्या आहे जवळपास 99%मुख्यमंत्री पद पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानले जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साठी संघ दक्ष झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना करावे असे संघाला वाटते    राष्ट्रवादी अजित पवार गटाने अगोदर जाहीर करुन कशाला उगाच विरोध करायचा असे ठरवलेले दिसते  तेव्हा आता काही वेळातच सागर होणार की वर्षा अथवा वर्षा राहणार अबाधित हे अधोरेखित की अघोरीत

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण

Image
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण मराठा ओबीसी की अल्पसंख्याक..... महा ईलेशन चे विश्लेषण  @ पत्रकार शिवाजी घाडगे  शिवसेनेतुन चाळीस आमदारांसह भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिध्ये नाहीत हे 58 आमदार निवडून आणल्याने सिध्द केले आहे मात्र आता पुन्हा भाजपा त्यांना मुख्यमंत्री करेल का कारण मुख्यमंत्री मराठा चेहरा असेलका ओबीसीतून  अजित पवार मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री कारण मुख्यमंत्री पदा साठी भाजपाला पाठींबा देऊन मोकळे झाले 41 आमदार घेऊन आले व काकांची तुतारी अवघ्या दहा वर ठेवली  काॅगेस 16 वर  आली मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात यांची सत्ता संपुष्टात पृथ्वीराज बाबा ही पडले तर नाना पटोले कसे बसे तरले  हिरव्या गुलालाने हिंदु अस्थत्व झाले होते बरे झाले सेफ सरकार आले  शनिवारी विधानसंभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला अण महाविकास युतीने 236  आमदार भगवा गुलाल घेऊन विधान संभेत गेले  मुख्यमंत्रीप एकनाथ शिंदे यांनी जे धाडसी निर्णय घेतले त्याचे फलित समोर आले मुख्यमंत्री होण्या साठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी  व  केद्री...

नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले मतदान

Image
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले मत   टपाली मतपत्रिकेद्वारे बजावला मतदानाचा हक्क लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी  प्रत्येकाने येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.   तहसील कार्यालय अहिल्यानगर येथील टपाली मतदान सुविधा केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सालीमठ यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,   लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रत्येकाच्या मताला  महत्व आहे. लोकशाहीच्या या  उत्सवामध्ये येत्या प्रत्येकाने सहभागी होत  आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने दिलेल्या १२ पर्यायापैकीचे ओळखपत्र सोबत बाळगून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही  सालीमठ यांनी यावेळी केले. 

विधानसंभा मतदान केंद्रांवर मोबाईल नेता येणार नाही आदेश निर्गमित

Image
मतदान केंद्रांवर मोबाईल नेता येणार नाही   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  २० नोव्हेंबर रोजी मतदान  असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये  निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहे. मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल सोबत बाळगता येणार नाही.  उमेदवारांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीलादेखील सोबत मोबाईल बाळगता येणार नाही.  मोबाईल बाळगल्यास मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. छुप्यारितीने मोबाईल बाळगल्यास व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या  ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निरिक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरि...

बियाण्यांच्या रांगोळीतून मतदान जागृती

Image
बियाण्यांच्या रांगोळीने मतदान जागृती   अकोले तालुक्यातील देवगाव येथील ममताबाई व जिजाबाई भांगरे यांनी गावरान बियाण्यांचा वापर करत मतदार जागृतीसाठी अनोख्या रांगोळ्या साकारल्या आहेत.  या रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश, मतदान यंत्र, निवडणूक आयोगाचे चिन्ह, आणि मतदानाची तारीख यांचे देखणे चित्रण करण्यात आले आहे. या कल्पकतेतून, ग्रामीण महिलांना व नवमतदारांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहाय्यक अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक अधिकारी सविता कचरे मतदान जनजागृतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  बायफ संस्थेच्या मदतीने, ममताबाई भांगरे गेल्या १५ वर्षांपासून अन्नमाता म्हणून  ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधत आहेत. भातशेतीच्या कामात व्यस्त असलेल्या महिलांना त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. या अनोख्या उपक्रमाद्वारे, त्यांनी महिलांना व नवमतदारांना 'हातातील कामे थांबवा आणि मतदानाला चला' असे आवाहन केले आहे. मतदान...

मत मोजणीचे ठिकाण ठरले आमदारांच्या नावाची घोषणा

Image
येथे होणार आमदारांच्या नावाची घोषित व विजया नंतर लगेच मिळेल प्रमाणपत्र नगर जिल्ह्य़ातील  विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली असून 23 नोव्हेंबर कोण बनेगा आमदार हे सिध्द होणार आहे   विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पाठविलेल्या जिल्ह्यातील सर्व १२ मतमोजणी केंद्रांना भारत निवडणूक आयेागाने मंजुरी दिली आहे.  तालुक्यातील या ठिकाणी होणार मतमोजणी  अकोले विधानसभा  मिटींग हॉल  तहसील कार्यालय नवीन इमारत ता. अकोले, संगमनेर - सहकार महर्षी भाऊसाहेब  संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, ता. संगमनेर, शिर्डी - प्रशासकीय इमारत, तळमजला, तहसील कार्यालय राहाता,  कोपरगाव - सेवा  निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, तळमजला, ता. कोपरगाव, श्रीरामपूर - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, पहिला मजला, ता. श्रीरामपूर येथे मतमोजणी होईल. नेवासा मतदारसंघासाठी न्यू गव्हर्नमेंट  ग्रेन गोडाऊन, उत्तर बाजू खोली क्र.२ संथ मेरीस् स्कुल रोड, मुंकुदपुरा नेवासा फाटा, ता.नेवासा,...

राज्यात 9 कोटी 70 लाख मतदार

Image
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी  ९ कोटी ७० लाखांहून अधिक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ प...

राहुरी -नगर -पाथर्डी धानमतदार संघात तनपुरे व कर्डीले कुस्ती

Image
राहुरी नगर पाथर्डी विधानसंभा निवडणूकीत तनपुरे व कर्डीले यांचीच कुस्ती  चर्चेतील बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरी -नगर- पाथर्डी  विधान संभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे व भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यात थेट लढत होईल अशी मतदार संघात चर्चा आहे तशी एकास एक लढत नाही बाकी पक्षा सह अपक्ष देखील आपन लोकशाही बळकट व सक्षम करण्या साठी उभे आहोत यावर ठाम असून प्रचार करत आहेत तसा हा मोठा मतदार संघ आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री  शिवाजी कर्डीले सुरवातीला एक लाख मताधिक्य मिळवून विजयी होतील असे चित्र होते मात्र नेहमी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढगारे कर्डीले दुसऱ्याच्या भरवशावर राहीले अण तेथेच घात झाला अण स्थानिक सुशिक्षित उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे आमदार झाले खरतर प्राजक्त ही निवडुन लढवयाला तयार नव्हते कारण गेल्या काही निवडणुकीत तनपुरे यांना मतदार नाकारीत होते त्यामुळेच प्राजक्त नको म्हणत होते मात्र मामा जंयत पाटील व मेहुने सुशिल देशमुख यांनी प्रचार यंत्रणाना व्यवस्थित हाताळली तसे बाकी जिवाभावाचे कार्यकर्ते या...

श्रीरामपूरात भाऊसाहेबांचे सलाईन !

Image
श्रीरामपूरात भाऊसाहेबांचे सलाईन..! चर्चेतील बातमी  @पत्रकार  शिवाजी घाडगे  खरच दिवसेंदिवस श्रीरामपूर विधानसंभा मतदार संघात दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे त्याच कारण ही असच आहे या मतदार संघातील काॅगेस चे विद्यमान आमदार लहु कानडे यांना काॅगेस ने उमेदवारी डावली व हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली तस आ लहु कानडेना हा धक्काच म्हणावे लागेल आपल्या शिवाय काॅगेस ला पर्याय नाही असे त्याचा गोड गैरसमज होता काॅगेस ने हात दिला नाही म्हणून लहु कानडे थांबतील ते कान डे कसले अण ते थेट राष्ट्रवादी दादा गटाकडे गेले अण घड्याळ बांधले तर लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला श्रीरामपूरात उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव ठेवून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना उध्दव सेनूतुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेत डेरे दाखल झाले अण माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रारात सहभागी होऊन श्रीरामपूरात चांगले लिड दिले तो पर्यंत देखील शिवसेनेची शिंदे याची विधान संभेची उमेदवारी आपल्याला मिळेल याची मनोमन खात्री कांबळे यांना होती व शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या रात्रीला कांबळे ...

नगर मध्ये 133 गृहमतदान

Image
अहमदनगर शहर मतदारसंघात १३३ मतदारांचे गृहमतदान विधानसंभा निवडणूक अंतर्गत अहमदनगर शहर मतदारसंघात गृहमतदानासाठी सहमती दर्शविलेल्या १४३ मतदारांपैकी  १३३ मतदारांनी गृहमतदान केले. उर्वरीत १० पैकी दोघांचा मृत्यू झाला असून ३ पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांचे गृहमतदान होवू शकले नाही. इतर ५ मतदारांकडे मतदान पथक रविवारी जाणार आहे. निवडणूक निरीक्षक ताई काये आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी गृहमतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी सहा निवडणुक अधिकारी श्री संजय शिंदे आणि समन्वयक अधिकारी सपना वसावा उपस्थित होते. ८५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगातर्फे ही सुविधा देण्यात आली आहे

आयपीएस संजय वर्मा आता महाराष्ट्र चे पोलीस महासंचालक

Image
आयपीएस अधिकारी संजय वर्मा  महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक  राज्याच्या पोलिस महासंचलिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या पदावरुन दुर केल्यावर  राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची नियुक्ती झाली आहे    वर्मा हे अहमदनगर नगर येथे 1995-96 ला अ‍ॅडिशनल एस पी म्हणून कार्यरत होते  राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर राज्याचे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची निवड करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं . तातपुरते मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. मंगळवारी संजय वर्मा यांना महासंचालक पदाचा चार्ज देण्यात आला  राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी होती.  संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस ...

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

Image
दिवाळीत अंधार @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीच्या कामगाराकडे किराणा आणायला पैसे नाहीत तेव्हा कटाके आणार कोठुण ही करुन कहानी आहे राहुरी तालुक्यातील एका बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याची आज पोहत काही वर्षा पर्यत येथे सोन्याचा धुर निघत होता येथील लक्ष्मीपूजन म्हणजे काय बात चौहीकडे नुस्ता आनंद काॅलनीतील खोल्या पुढे संडा रांगोळ्या अण आकाश दिवे सारे काही अलबेल दिवाळीला बोनस मिळायचा अजुबाजुची वाडीत दुकानात  वर्दळ होती रस्ते गर्दीने फुलुन गेलेली आजु बाजुच्या खेड्यातील ग्रामस्थ खरेदी साठी यायचे मात्र याला दुष्ट लागली अण हा चांगला उद्योग समुह दुष्ट चक्रात सापडला अण होत्याचा नव्हत झाले आता या वास्तु भग्न अवस्थेत आहे हा कारखाना स्थानिक नेत्याची सुरु करण्याची मानसिकता नव्हती किवा काही उपयोग झाला नाही उलट  जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांना केंद्राने पॅकेज देऊन मदत केली तशी मदत घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही अण आता येथील विकास कामांच्या कोनसिला फिक्या पडल्या अण  त्यावर नावे असलेले कर्तृत्वान नेते काळाच्या पडद्याआड गेली   यापुढे भविष्य आधारात आहे आता शा...