फ्रान्स मध्ये कौशल्य स्पर्धा
फ्रान्समध्ये जागतिक कौशल्य स्पर्धा जायचय मग करा अर्ज जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार असून त्यात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धकांचे नामांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील युवक-युवतींनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरूणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींनी विविध ५२ क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी. ...