शुटीबाॅल स्पर्धेत यशसंपादन केलेल्या खेळाडु समृध्दी पवळेचा गौरव

 समृध्दीचा गौरव शूटींग बाॅल यश

आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाच्या यशामध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु. समृद्धी महेश पवळे हिचा महत्वाचा सहभाग राहीला 
कु. समृद्धी महेश पवळे यांची कन्या ज्येष्ठ नागरिक चांगदेव पवळे यांच्या नात  डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत  संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा विशेष गुण गौरव 
 करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी शाल व वैभव ढूस लिखित ‘अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन तिचे अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, चांगदेव पवळे, सार्थक पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी समृद्धीच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे राहुरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असून, समृद्धी पवळे हिच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आहे. समृध्दीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन