निवासी अतिक्रमणे नियमित करण्या साठी ढुस यांच्या कडून जनजागृती मोहीम

निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी
आप्पासाहेब ढूस यांच्याकडून रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम
राहुरी :
शासन निर्णयातील तरतुदीनुसार देवळाली प्रवरा हद्दीतील निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील वसाहत परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आप्पासाहेब ढूस यांनी शासन निर्णयातील विविध तरतुदींची माहिती नागरिकांना दिली.
यावेळी गजानन येवले, अबूबकर शेख, बाळू पेटारे, राहुल गायकवाड, कांतीलाल गायकवाड, संगीता सोज्वल, रैसा शेख, सुग्राबी शेख, मार्था बोर्डे, दत्तात्रय देसाई, शारदा थोरात, बबन सरोदे, अनिल खरात, बाळू पंडित, सोमनाथ कांबळे, दीपक थोरात, नर्मदा वरगुडे, कुसुम बोरकर, सतीश गायकवाड, रमाबाई पालवे, आत्माराम शिंदे, रतनबाई बाबुळके, चंद्रकांत दहिवाले, सुनीता म्हस्के, आकाश पेटारे, लीलाबाई पेटारे, संगीता देसाई, सिद्धार्थ दहिवाले आदींसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपले मत मांडताना आप्पासाहेब ढूस यांनी १ जानेवारी २०११ पूर्वी शासनाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे नियमित करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदी विषद केल्या. तसेच अतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे जोडावीत आदी सर्व माहिती रहिवाशांना समजावून सांगितली. यासोबतच उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अलीकडेच शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाच्या आधारे देवळाली प्रवरा हद्दीतील पात्र जागा व घरांचा शोध घेण्यासाठी आम्ही विविध बैठकींच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. नागरिकांनी शासन निर्णयाचा आधार घेऊन आपल्या हद्दीतील जास्तीत जास्त अतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आप्पासाहेब ढूस यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन