Posts

Showing posts from July, 2025

शनिशिगणापुर देवस्थान बनावट अ‍ॅप दोन कर्मचाऱ्यांच्या खात्याचा आधार

Image
कर्मचाऱ्यांच्या खात्याचा आधार  एक कोटीहून अधिक रक्कम खात्यावर  शिंगणापूर येथील बनावट अ‍ॅप    शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरणात देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. हे अ‍ॅप कोणी बनविले आहे, कोणाच्या नावाने सुरु आहेत याचा तपास सुरुआहे.  तसेच चार अ‍ॅप हे बनावट असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.  सात अ‍ॅप सक्रिय अ‍ॅपच्यामाध्यमातून देवस्थानच्या खात्यात पैसे न जाता देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अधिक तपास सायबर पोलीस करत असून यामध्ये कोण दोषी आहे, याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये देवस्थानच्या वतीने तीन अ‍ॅप ला परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, एकूण सात अ‍ॅप सक्रिय असून चार अ‍ॅप हे बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे.

अहिल्यानगर संविधान भवना करीता 15 कोचीचा निधी उपमुख्यमंत्री-अजित पवार

Image
अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी - उपमुख्यमंत्री अजित पवार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मार्केट यार्ड येथे अनावरण      नगर शहरात  लवकरच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये व शासन १० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली.  मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त डॉ.यशवंत डांगे, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य अॅड.गोरक्ष लोखंडे, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे, भन्ते राहूल बोधी,  आदी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री पवार  म्हणाले, "द...

सहकार चळवळीने महाराष्ट्र च्या वैभवात भर घातली उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
सहकारी साखर कारखानदारीने महाराष्ट्रच्रा वैभवात भर घातली  उपमुख्यमंत्री- अजित पवार  ज्या जिल्हाने सहकारी साखर कारखान्याला जन्म दिला तेथील सहकारी साखर कारखाने चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याने तनपुरे साखर कारखाना बंद पडल्याची खंत देखील व्यक्त केली  राहुरी येथे रविवारी राहुरी बाजार समीतीच्या वतीने शेतकरी मेळावा व विविध विकास कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ना. अजित पवार बोलत होते. अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादीचे के. एम .पानसरे होते.   ना.अजित पवार म्हणाले की बंद पडलेला डाॅ तनपुरे साखर कारखाना हा चुकीच्या लोकांच्या ताब्यात दिल्याने बंद पडला याच जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीला जन्म घातला सहकाराची मुहूर्त मेढ येथे रोवली गेली पुढे डाॅ दादासाहेब तनपुरे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख या दिग्गज नेत्यांनी नगर जिल्ह्य़ातील सहकार चळवळ नेटाने पुढे नेली सहकारा बरोबर शिक्षणाची सोय केली या मुळे जिल्हा विकासात पुढे गेला  आता ऊसा पासून केवळ साखर तयार करुन भागणा...

एल सी बी चे दिनेश आहेर यांची बदली

Image
दीड कोटी भोवले आहेर नियंत्रण कक्षात  बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  एल सी बी चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर नियंत्रण कक्षात बदली  ग्रो मोअर कंपनीकडून दीड कोटी रुपये घेतल्याच्या अरोपावरुन चार एलसीबीचे पोलीस कर्मचारी निलंबित झाले आता  पोलीस निरीक्षक दिशेश आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या कडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा  कारभार सोपवण्यात आला आहे 

ग्रो-मोअर चा दीड कोटीचा आहेर कोणा कोणाचे हात ओला...

Image
तुषार धाकराव म्हणतात मी आरोपीला ओळख नाही  चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे  ग्रो मोअर चे भुपेद्र सावळे कोण आहेत याला मी ओळखत नसुन यातील झालेला प्रकार आपल्याला काहीच माहीत नाही असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित  पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी पावित्रा घेतला आहे  धाकराव यांच्या बरोबर तीन पोलीस निलंबित करण्यात आले आहेत   मुळे आता नेमका दीड कोटीचा आहेर कोणाला व यात कोणा कोणाचे हात ओला झाला आहे याचीच खमंग चर्चा सुरु आहे.  राहुरीतील कोणत्या मल्टीस्टेट मध्ये पैसे स्विकारले ते त्याची पुन्हा कशी वाटप झाली याचा तपास व्यवस्थीत झाला तर उघड होणार आहे  यातील अरोपीने न्यायलयात जबाब नोदवल्याने नगर एल सी बी च्या  पोलीसाचे बिग फुटले  नाहीतर चौकशीचा फार्स होतो पुन्हा जैसे थे परिस्थिती  ग्रो मोअर चे आरोपी शिर्डीतील आहेत शिर्डी जागतिक स्थान असल्याने ग्रो मोअर चा व्यावहार देखील जागतीक असल्याचा संशय आहे  साध्या शिर्डीतील भिकारया बद्दल येथील अनेक नेते बेंबीच्या देठापासून ओरडत असतात मात्र पोलिसाच्या खाबु गिरी बद्दल तोड उघडायला तयार ...

श्रीराम वेहरे राज्याचे "जल सल्लागार"

Image
राज्य शासनाने जल सल्लागार नियुक्त केल्याने कोण झाले गार विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे  महाराष्ट्र राज्य सरकार ने जलविषयक सल्लागार म्हणून श्रीराम वेदिरे याची नियुक्ती केली असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.   श्रीराम बेदिरे यांची जलविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असून त्यांना विशेष अधिकार ही देण्यात आले आहेत . श्रीराम बेदिरे यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला ते मुख्यमंत्री यांचे जलविषयक सल्लागार असनार असून ते अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत  धोरणात्मक मार्गदर्शन  राज्यातील जलविषयक दीर्घकालीन धोरणाचे प्रारुप तयार करणे, राज्यातील नदीजोड प्रकल्पांसाठी एकात्मिक दीर्घकालीन धोरण तयार करणे, जलसंधारण, भुजल, पाणी योजनाचे नियोजन, जल व्यवस्थापनाचे विविध कायदे, धोरण, पुनर्वापर धोरण यामधील सुधारणा व अमलबजावणी, जलसिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुक्ष्म सिंचनास प्रोत्साहन, जल संबधीत समित्या अहवालातील शिफारशीवर मार्गदर्शन  आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय सन्वय  केंद्रीय जल आयोग (cwc)जलशक्ती मंत्रालय, निती...

धाकच राहीला नाही येथे कोणाला !

Image
धाकच राहीला नाही....  फौजदार सह तीन पोलीस निलंबित  चर्चा  @पत्रकार शिवाजी घाडगे  नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव पोलीस ,अमलदार मनोहर सिताराम गोसावी, बापुसाहेब रावसाहेब फोलणे, गणेश प्रभाकर भिंगारदिवे या पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निलंबित केले आहे त्यांनी दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे ग्रो-मोअर भूपेद्रला सोडण्या साठी. ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा शिर्डीचा भूपेद्र राजाराम सावळे याच्या कडुन एल सी बी च्या धाकराव टीमने धाक दाखवत दीड कोटी रुपयांवर डल्ला मारला तो उघकीस आला आहे.  खरच ऑनलाईन कोणी कोणी पैसे घेत का व  कायद्याचे पोलीसांना ज्ञान असत असा सर्व सामान्य लोकांचा आज पर्यत समज होता आणि केवळ अरोपी म्हणतो म्हणून ही कारवाई होते का दीड कोटी रुपये घ्यायला कोणाचे बँकेतील खाते दिले ते ऑनलाईन व्यावहार देखील तपासले असतीलच अथवा खात्यावर पैसे स्विकारणारयाने किती पैसे कमिशन म्हणून घेतले की हा पोलीसाचा सराईत झिरो पन्टर आहे ? नगर एल सी बी च्या विरोधात खासदार निलेश लंके यांन...

स्वच्छतेत महाराष्ट्र आघाडीवर

Image
स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडीवर  राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान  स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे.  नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के.एच.  गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर  स्वच्छ महाराष्ट्र शहरी नवनाथ वाठ उपस्थित होते.   स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये ( ठाणे जिल्हा ) मिरा भाईंदर महानगर पालिकेने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार माननीय राज...

पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

Image
पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे   खरीप व रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण  व आदिवासी गटासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.  राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, या उद्देशाने राज्यांतर्गत या पीकस्पर्धा राबविण्यात येत आहेत.   सर्वसाधारण व आदिवासी गटसाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी शेतकऱ्यांची निवड...

केशव गोविंद महाविद्यालय प्राचार्य बाळासाहेब काळे यांची नियुक्ती

Image
केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या प्राचार्य पदी बाळासाहेब काळे  श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व महाविद्यालय च्या प्राचार्य म्हणून आदर्श माध्यमिक व कनिष्ठ, ब्रामणी येथील उपप्राचार्य बाळासाहेब काळे यांना पदोन्नतीने प्राचार्य म्हणून बढती देण्यात आली आहे . श्री बाळासाहेब यशबंत काळे यांनी संत तुकाराम विद्यालय येथे प्रर्यवेशक तर प्रगती विद्यालय शिक्षक म्हणून सेवा केली आहे  अलिकडेच संस्थेने त्यांना प्राचार्य म्हणून पदोन्नती दिली असून त्यांनी महाविद्यालय पदभार प्राचार्या राणी साळवे यांच्या कडून स्विकारला आहे  विद्यार्थाची गुणवत्ता वाढी साठी विविध योजना अंमलबजावणी वर श्री बाळासाहेब काळे यांचा भर असणार आहे. 

शनिलाच गैरकारभाराची साडेसाती ?

Image
शनिला गैरकारभाराची साडेसाती ? स्पेशल रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे     शनिशिंगणापुर हे जगप्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते  साडेसाती त्रास होऊ नये म्हणून अथवा प्रभाव कमी व्हावा यासाठी शनिची पुजा आर्चा श्रध्दाळु भाविक भक्त करतात  श्रीशैनेश्वर महाराजाचे शनिशिंगणापुर जगावेगळे असून.  62 वर्षा पुर्वी हे शनी ट्रस्ट स्थापन झाले गावातीलच ट्रस्टी घ्यायची घटना अस्तित्वात आहे.  घराला दारे नसनारे जगावेगळे गाव म्हणून शनिशिगणापुर नाव लौकिक आहे. साडेसातीचा फेरा सुरु झाल्यानंतर प्रत्येकजण येथे येतो आणि मंदीर नसलेल्या देवाला म्हणजेच शनिमहाराजांना तेल वाहुन जातो येथील भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून देशातील नामांकित देवस्थानापैकी एक म्हणून शनिशिंगणापुर नाव  घेले जाते मात्र गैर कारभारा मुळे संध्या हे देवस्थान चर्चेत आले आहे. मुळात देवस्थान चे दिवंगत माजी अध्यक्ष बाबूराव बानकर यांच्या नंतर येथील विश्वस्त नियुक्तीला नाही म्हटल तरी राजकीय वास लागलाच स्थानिक लोक यावर धर्मदाय न्यास नियुक्त करीत असते तशी देवस्थान घटना आहे.  श्री शनैश्वराची देशभरात ...

आता कोठे "अरुणोदय" झाला .....

Image
आता कोठे"अरुणोदय" झाला  रोख ठोक @पत्रकार शिवाजी घाडगे  डाॅक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना जिल्हा बॅकेच्या ताब्यातुन सोडविणे अधिक गरजेचे असून बॅकेच्या ताब्यातील कारखाना संचालक मंडळाच्या हातात घेण्या साठी अनेकांपुढे हात जोडावे लागत असले तरी आपल्या वडीलांच्या नावा साठी अध्यक्ष अरुण तनपुरे करतायत  राहुरी बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शना खाली जनसेवा मंडळाने डाॅक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवीली तसेच हाती सत्ता काबीज केली तसेच सभासंदानी देखील अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्यावर विश्वास दाखवत एक हाती सत्ता दिली.   या कारखान्यावर शासकीय प्रशासक होते तसेच कारखाना भाडेतत्त्वावर चालवयला देण्या सर्दभात सहकार आयुक्त यांनी तीनदा वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध केल्या होत्या म्हणजे या कारखान्याला मोडीच्या भावात कोण खाणार होते हे लक्षात आल्या नंतर काही सुज्ञ सभासद न्यायालयात धाव घेऊन ही शिक्रापुरी न्यायालयांच्या लक्षात आणून देवून कारखान्याची  निवडणूक घ्यायला भाग पाडले.  जर हा कारखाना गेला असता तर कशाचा चेअरमन व...

मुळा धरणातुन पाणी सोडणार....

Image
मुळा धरणातून पाणी सोडणार  बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  नगर जिल्हाची जलसंजवनी म्हणून ओळखले जाणारे राहुरीचे मुळा धरणातून बुधवारी पाच वाजता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे.      26000 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरणाचा एकुण साठा 18161दलघफु (69.85%) होत असल्यामुळे तसेच धरणात पाणी आवक सुरु असल्याने जलाशय परिचलन सूची नुसार नदीमध्ये 3000 क्यू एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे.पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे विसर्गात आवश्यकते नुसार वाढ केली जाणार आहे.तरी नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे व नदी पात्रात प्रवेश करू नये.तसेच कुठलीही जीवित व वित्त हानी होणार नाही या बाबत खबरदारी घ्यावी असे अव्हान जलसिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.                          

भैरुनाथ पानपुरी गाडी लागत नाही हल्ली...

Image
भैरुनाथची पानपुरी हातगाडी आता  येथे आली नाही व घरासमोरुन देखील हालली नाही .... तर याचे कारण देखील असेच होते ते म्हणजे पानपुरी वाला भैय्याने  अकस्मात या जगाचा निरोप घेतला  कालुसिंग राणावत ऊर्फ पानपुरी वाले  चित्रगुड राजस्थान वय 50 असे दुःख निधन झालेल्या भैय्याचे नाव नाव गांव इतके दिवस कोणाला ठाऊक नव्हते पानपुरी वाला भैय्या या नावाने लहान थोर हाक मारायचे.   राहुरी फॅक्टरीवर  समोर कै. गुलाबराव कदम यांच्या व्यापारी संकुल समोर गेल्या अठरा विस वर्षा पासुन पानपुरी गाडी नित्यान ऊभी असायची मात्र हल्ली मात्र ती तेथे नाही  एकादशीच्या दिवशी सकाळीच कालुसिंग यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला काही कळनासे झाले  गाडी लावण्यासाठी माल बनवण्याची घाई सुरु होती मात्र तिव्र वेदना सुरु झाल्या उपचारासाठी जवळच्या  एका खाजगी रुग्णालयात  दाखल केले त्यांनी त्यांना  उपचारा साठी नगर, अथवा प्रवरा येथे हलविण्याचा वैद्यकीय सल्ला दिला  मात्र काळ आला कि तो कुणा साठी थांबत नाही तसेच कोणाचे ऐकत देखील नाही  रस्त्यात काळाने झडप घातली अण होत्याच ...

निळवंडे धरणातून पाणी सोडले

Image
निळवंडे धरणातून विसर्ग सुरु  – निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज सोमवारी  ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ६५७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात ठेवलेले जनावरं व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच संबंधित तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे (उर्ध्व प्रवरा धरण विभाग, संगमनेर) यांनी सांगितले. पावसाच्या परिस्थितीवर लक्ष...

वांबोरी येथील सुशिला पावले यांचे निधन

Image
वांबोरी येथील श्रीमती सुशिला अर्जुन पावले 71 यांचे  अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात दुःख निधन झाले असुन त्यांच्यावर  शनिवारी 5 जुलै सकाळी 9 वाजता वाल्मीक तीर्थ येथे अंतीम संस्कार होणार आहेत.  त्यांच्या पच्छात मुले  अनंत, सुनील, संदीप असे  आहेत भगिनी अशा पावले, भाऊसाहेब व अशोक केंद्रे यांच्या त्या भगिनी तर विजय व संजय पावले यांच्या मावशी होत  दिवगंत अर्जुन पावले हे राहुरी बाजार समितीत नोकरी करत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या गेट समोर बंद ट्रक अचानक रिव्हर्स आल्याने झालेल्या आपघात अर्जुन पावले यांचे आपघाती दुःख निधन झाले होते  सुशिला पावले या दिवगंत गोविंद केंद्रे मिस्तरी यांच्या कन्या होत स्वत शिलाई मशीन वर काम करत त्यांनी कष्टात आयुष्य घालवले पुढे मुलांनी नोकरी, व्यवसाय आपले कर्तृत्व सिद्ध करून चांगला जम बसवून नाव लौकिक निर्माण केला सुशिला पावले याच्या दुःख निधनाने वांबोरी परिसरात हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे. 

चला गावाला देऊ प्लॅस्टिक पासुन मुक्ती

Image
चला गावाला देऊ प्लॅस्टिक पासुन मुक्ती  स्वच्छ भारत अभियानांतर्गत टप्पा दोन मोहीम सुरु  अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी राबविण्यात येणार असून गावात प्लॅस्टिक संक लन व साठवून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी सांगितले.  उघड्यावर पडलेला प्लॅस्टिक कचरा सकलन, साठवणूक करण्याबाबत जिल्ह्यात जुलै महिन्यात विशेष मोहीम राबविण्या बाबद निर्देश देण्यात आले असून यात जास्तीत जास्त ग्रामपंचायत सहभागी होऊन प्लॅस्टिक मुक्त गाव मोहीम यशस्वी करावी  जमा झालेला प्लॅस्टिक कचरा साठवण करून ठेवावा व यांची नोंद घेतली जाणार आहे ग्रामपंचायत व तालुका स्तरावर असेल यामुळेच कचरा प्रक्रिया करण्या करीता सुलभ होईल.  या साठी विस्तार अधिकारी (पंचायत) स्वच्छ भारत मिशनचे कामकाज पहाणारे विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती यांना समन्वयक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.  या मोहीमीचा कालवधी जुलै महिनाभरा साठी असेल व नंतर देखील सातत्य हवे  ग्रामपंचायतीला ठेवावी लागेल कचरा संकलनाची नोंद  तालुकास्तरावर गट/समुह समन्वयक...

राष्ट्रांसाठी मध्यस्थी ही मोहीम न्यायालयात राबवणार

Image
राष्ट्रासाठी मध्यस्थी” मोहिमेचे न्यायालयात आयोजन  उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये “राष्ट्रासाठी मध्यस्थी” हि विशेष मध्यस्थ मोहीम  सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात, नुकसान भरपाई, चेक बाउन्स १३८ ची प्रकरणे, वाटपाचे दावे, वाणिज्यिक दावे व सर्व प्रकरणे तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे विशेष मध्यस्थी मोहीमद्वारे मध्यस्थ प्रक्रियेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांनी केले आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मध्यस्थी आणि सामांजस्य प्रकल्प समिती (Mediation and Conciliation Project Committee) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच अंजू शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाने “राष्ट्रासाठी मध्यस्थी” हि विशे...

चलनी बनावट नोटा लोकांचा तोटा

Image
बनावट नोटा लोकांचा तोटा.... स्पेशल रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे  नगर जिल्हात अलिकडेच  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चार्ज स्विकारला व धडाकेबाज कारवाई केल्या आहेत मात्र यात पुढील काळात सातत्य राहायला हवे. अवैध व्यावसायवर चांगलाच जरब बसविला आहे  राहुरीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तीन संशयित अरोपी कडुन दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या  बनावट नोटा ताब्यात घेतल्यानंतर मोठे घबाड तपासा अंती पोलीसांच्या हाती आले  व राहुरी पुन्हा एकदा बनावट नोटा मुळे रडारवर आली तीन अरोपीला राहुरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे  पोलिसांनी संशयित अरोपी कडुन  तपासात 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  तपासात काही त्रुटी मुळे अरोपी जामीनावर सुटतात व यात देखील ते त्याचा उद्योग चालु ठेवतात.  नगर मनमाड राज्य मार्गावरील  गाडगे महाराज आश्रम शाळे समोर शनिवारी मध्य रात्री तीन जन बनावट चलनी  नोटा घेऊन जात असल्याची खबर गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळताच पोलीस अर्लट झाले अण तीन संशयित अरोपी...

दिवंगत माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक कृषी विद्यापीठ चे जनक डाॅ गोरक्ष ससाणे

Image
दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे व कृषि विद्यापीठांचे शिल्पकार - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे राज्याच्या हरितक्रांतीचे जनक असून त्यांच्या कार्यकाळातच राज्यातील चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. त्यांचे कृषि क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन आपण कृषि दिन म्हणुन साजरा करत आहोत. कै. वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे व कृषि विद्यापीठांचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्प व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिनाचे औचित्य साधुन भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम गावातील शेतकर्यांबरोबर सुसंवाद व प्रक्षेत्र भेटी कार्यक्रमाचे तांभेरे  येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प...