धाकच राहीला नाही येथे कोणाला !
धाकच राहीला नाही....
फौजदार सह तीन पोलीस निलंबित
चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे
नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव पोलीस ,अमलदार मनोहर सिताराम गोसावी, बापुसाहेब रावसाहेब फोलणे, गणेश प्रभाकर भिंगारदिवे या पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निलंबित केले आहे त्यांनी दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे ग्रो-मोअर भूपेद्रला सोडण्या साठी. ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा शिर्डीचा भूपेद्र राजाराम सावळे याच्या कडुन एल सी बी च्या धाकराव टीमने धाक दाखवत दीड कोटी रुपयांवर डल्ला मारला तो उघकीस आला आहे.
खरच ऑनलाईन कोणी कोणी पैसे घेत का व कायद्याचे पोलीसांना ज्ञान असत असा सर्व सामान्य लोकांचा आज पर्यत समज होता आणि केवळ अरोपी म्हणतो म्हणून ही कारवाई होते का दीड कोटी रुपये घ्यायला कोणाचे बँकेतील खाते दिले ते ऑनलाईन व्यावहार देखील तपासले असतीलच अथवा खात्यावर पैसे स्विकारणारयाने किती पैसे कमिशन म्हणून घेतले की हा पोलीसाचा सराईत झिरो पन्टर आहे ?
नगर एल सी बी च्या विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण केले तेव्हा निवडणूकीत खा. लंके यांना निवडणूक दरम्यान एल सी बीच्या काही पोलीसांनी नहाक त्रास दिला म्हणून त्याचे उपोषण असेल असा बोभाटा होता तेव्हा त्यांनी नगर एल सी बी किती चिरी मिरी गोळा करते याचे आकडे देखील दिले होते.
तीन वर्षा नंतर बदली हा नियम आहे मात्र याला एल सी बी आपवाद असावी कारण गेल्या काही दिवसांपासून काही कर्मचारी येथे ठाण मांडून आहेत दुसरीकडे बदली व काम येथेच ही त्यांची शक्कल
यात तुषार धाकराव व टीमने दीड कोट घेतले ते कोणाच्या सांगण्यावरून व त्याची वाटप कशी झाली याचा हिशोब व्हायला हवा कदाचित शासनाने याची एस आय टी चौकशी करायला हवी कारण एवढी हिम्मत बिच्चाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यात कोठुण आली याचे आक्का नेमके कोण आहेत हे देखील उघड झाले पाहीजे
15 जानेवारी रोजी सावळे याला स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव व त्याच्या टिम ने सावळे व त्याच्या साथीदाराला लोणी जवळ अडविले आरबीआयचा परवाना नसताना पैसे गोळा करून लोकांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असा धाक धाकराव यानी दाखवला व पोलीस अधीक्षक कार्यालय आणले व सावळे याच्या कडुन दीड कोटी ची मागणी करून संबंधित रक्कम एका खात्यावर ऑनलाईन घेतली असे भुपेद्र याने तपासात सांगितले
खरच काही वर्षांत एल सी बी च्या पोलीसाचे राहणीमान व घरदार बदलते हा संशोधनाचा विषय आहे शेवटी पोलीसच ते त्याचाकडे सर्व यंत्रणा सज्ज असते व कोणाला कसे निपवटायवचे ही कला जमुन गेलेली लोकांचे संरक्षण करणारे जर असे बेफिकीर वागायला लागले तर काय या मुळे प्रामाणिक काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे मनोबल खचते खाकीचा धाक वेगळाच आहे मात्र खाकी घालुन जर खादी च्या सांगण्यावरून पोलीसांना गुंतवण्याचा प्रयत्न कोणी करत नाहीना हे देखील तपासले पाहीजे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहेत पोलीस कारवाई करतात व लोक निमुट पणे पाहत राहातात अवैध व्यावसाय कोणाचे आहेत हे देखील तपासले पाहीजे श्रीरामपूर एम आय डी सी मध्ये नशीली पावडर बनवली जाते त्याचा तपास खोलवर केला तर त्याच्यात देखील सावळा गोधळ सापडेल
शिकाऊ पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायवर टाच आणली होती आता त्याचा कालावधीत संपला व अवैध व्यावसाय पुन्हा डोके वर काढतील
शासन करील या भरोशावर नागरिकांनी देखील जागृत होऊन आपला परिसर गुन्हेगारी व अवैध व्यावसाय मुक्त कसा राहील या साठी पुढाकार घायला हवा. ऑनलाईन व्यावहार मध्ये अनेकदा लोक फसतात मात्र येथे पोलीस देखील फसले हे विशेष म्हणावे लागेल.
Comments
Post a Comment