सहकार चळवळीने महाराष्ट्र च्या वैभवात भर घातली उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकारी साखर कारखानदारीने महाराष्ट्रच्रा वैभवात भर घातली 
उपमुख्यमंत्री- अजित पवार 
ज्या जिल्हाने सहकारी साखर कारखान्याला जन्म दिला तेथील सहकारी साखर कारखाने चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याने तनपुरे साखर कारखाना बंद पडल्याची खंत देखील व्यक्त केली 
राहुरी येथे रविवारी राहुरी बाजार समीतीच्या वतीने शेतकरी मेळावा व विविध विकास कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ना. अजित पवार बोलत होते. अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादीचे के. एम .पानसरे होते. 
ना.अजित पवार म्हणाले की बंद पडलेला डाॅ तनपुरे साखर कारखाना हा चुकीच्या लोकांच्या ताब्यात दिल्याने बंद पडला याच जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीला जन्म घातला सहकाराची मुहूर्त मेढ येथे रोवली गेली पुढे डाॅ दादासाहेब तनपुरे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख या दिग्गज नेत्यांनी नगर जिल्ह्य़ातील सहकार चळवळ नेटाने पुढे नेली सहकारा बरोबर शिक्षणाची सोय केली या मुळे जिल्हा विकासात पुढे गेला 
आता ऊसा पासून केवळ साखर तयार करुन भागणार नाही तर विविध उपपदार्थ तसेच ऊर्जा निर्मिती सह अण्य जवळपास दहा विविध प्रयोगशील उत्पादने घ्यावे लागतील 
कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन विकास साधावा लागेल 
भविष्यात नव्या जुन्याचा मेळ घालून आगामी महापालिका तसेच नगरपालिका व स्थानिक स्वराज्य निवडणूका आपल्याला राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढविणार असल्याचे ना. पवार यांनी ठासून सांगितले .
 महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची उज्वल परंपरा तर आहेच मात्र येथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराष्ट्र, महात्मा ज्योतीबा फुले, घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोर विचाराची परंपरा आहे 
चुकीला चुक व बरोबर बरोबर मानमारा मी आहे तेव्हा कोणी चुक करीत असेल तर आता चुकीला माफी नाही हे सागायला ते विसरले नाहीत तर तनपुरे साखर कारखान्याला मत दान करायला मी आलो नव्हतो तुम्हीच चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमचे वाटोळे करुन घेतले आहे मात्र सहकार टिकला पाहीजे म्हणून आम्ही तुम्हाला मदत करु अशी ग्वाही देऊन 
अध्यक्ष अरुण तनपुरे हे बाजार समिती प्रमाणे तनपुरे साखर कारखाना काटकसरीने चालवतील असा अशा वाद व्यक्त करीत राज्य सरकारकडून हात आखडता घेतला जाणार नाही कारण सहकार खाते राष्ट्रवादीकडे आहे व मी अर्थमंत्री 
देशाचा कारभार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगला चालला आहे तर गृह मंत्री अमित शाह यांच्या कडे सहकार आहे. 
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे व मी स्वतः लाडक्या बहीणी साठी आम्ही 45हजार कोटीची तरतूद केली असून दिव्यांग बांधवांना देखील भरीव अशी तरतूद तर केलीच तसेच शेतकर्यांना विज बिल माफी तीन लाख शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे 
मी कधी कधी माझ्या कार्यकर्त्यांना व काम नाही केले तर माझ्या अधिकाऱ्यांवर दरडावतो मात्र हे चायनलवाले पराचा कावळा करतात लोकाचे कामे होत नसतील तर काय उपयोग लोकानी आम्हाला आठ आठ वेळा कशा साठी निवडुन दिले आहे जनतेच्या विश्वासार्हतेला तडा जाईल असे कृत्य होणार नाही यांची काळजी आपण घेतलीच पाहीजे नाहीतर पुढची पिढी आपल्याला काय म्हणेल मला नायविलाजाने माळे वाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद स्विकारावे लागले तेथे आम्ही 3636 रुपये टन उसाचा भाव देतो 
अध्यक्ष अरुण तनपुरे म्हणाले की राहुरी बाजार समिती मध्ये 19 कोटी रुपयांच्या ठेवी असून 19 कोटी रुपयाचे कामे केले आहेत सूतगिरणीवर 13 एकर जमीन लिलावाने घेऊन येथे प्रेट्रोल पंप व पशु खरेदी विक्री बाजार सुरु करण्यात आला असून वांबोरी येथे उपसमिती खरेदी केंद्र आहे आता सुरु केलेल्या उपाहारगृह मथ्ये शेतकर्यांना अल्प दरात भोजन व्यावस्था केली जाणार आहे तसेच शेतकरया साठी ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
कार्यक्रमास आ. काशिनाथ दाते, माजी आ. लहु कानडे, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, सुरेश बाफना, अजित कदम, अण्णासाहेब शेलार, दिलीप जठार, शेतकरी संघटनेचे रवि मोरे आदी उपस्थित होते संचालक हर्ष तनपुरे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा.भारत वारुळे यांनी आभार मानले  मेळाव्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments