चलनी बनावट नोटा लोकांचा तोटा
स्पेशल रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे
नगर जिल्हात अलिकडेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चार्ज स्विकारला व धडाकेबाज कारवाई केल्या आहेत मात्र यात पुढील काळात सातत्य राहायला हवे.
अवैध व्यावसायवर चांगलाच जरब बसविला आहे राहुरीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तीन संशयित अरोपी कडुन दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्यानंतर मोठे घबाड तपासा अंती पोलीसांच्या हाती आले
व राहुरी पुन्हा एकदा बनावट नोटा मुळे रडारवर आली तीन अरोपीला राहुरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी संशयित अरोपी कडुन तपासात 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासात काही त्रुटी मुळे अरोपी जामीनावर सुटतात व यात देखील ते त्याचा उद्योग चालु ठेवतात.
नगर मनमाड राज्य मार्गावरील गाडगे महाराज आश्रम शाळे समोर शनिवारी मध्य रात्री तीन जन बनावट चलनी नोटा घेऊन जात असल्याची खबर गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळताच पोलीस अर्लट झाले अण तीन संशयित अरोपी प्रतिक भारत पवार वय 33 रा- सोलापूर, राजेंद्र कोडिबा चौगुले वय 42 रा- कर्जत अहिल्यानगर, तात्या विश्वनाथ हजारे वय 40 रा -पाटोदा कर्जत जि अहिल्यानगर हे तीन अरोपी होय. हे त्रिकुट कोठे एकत्र आले या आगोदर सप्टेंबर 1998 मध्ये राहुरीत सोलापूर येथील शिमगारे व पत्की एका टोळी मार्फत बनावट नोटा एका लाॅज वर थांबून वितरित करत होते आता 27 वर्षा नंतर पुन्हा राहुरी बनावट नोटांच्या रडारवर आली आहे.
पुर्वी नोटा नव्हत्या तेव्हा वस्तूची देवाण घेवाण होऊन व्यावहार व्हायचे वस्तु देवाण घेवाण करताना अडचणी देखील येऊ लागल्या साल भर काम करायचे व याच्या मोबदल्यात धान्य किवा वस्तु घेतल्या जायच्या परंतु त्या वस्तू देवाण घेवाण साठी त्रासीक ठरत असल्याने पैशाचा शोध लागला व आज सर्वत्र पैसा प्यारा झाला आहे.
जो तो आप आपल्या परीने अमाप संपत्ती कमवण्याच्या मागे धावतो आहे अशाच प्रकारे पप्पू ऊर्फ प्रतिक भारत पवार रा अर्जुन नगर ता करमाळा जि, सोलापूर याने टेंभुर्णे येथे शितलनगर येथे समाधान गुरुव यांचे घर भाड्याने घेऊन यात बनावट नोटा मिनी छापखाना टाकला व येथे बनावट चलनी नोटा छापुन तो चलनात आणु लागला
नोकरी भरतीसह वेगवेळ्या प्रकारचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम प्रतीक पवार करायचा यातील नवीन प्रिन्टर च्या साह्याने त्याने 500 रुपयांची हुबेहुब प्रिन्ट काढली अण यातूनच बनावट नोटा छापुन चलनात आणून बखळ पैसा कमवण्याची कल्पना सुचली नोटा चलनात आनताना दोनदा
पोलीसांनी जेरबंद केले आता जामीनावर असताना देखील तो शांत राहीला नाही नोटा छापण्याचा लागला छंद अण राहुरी पोलीसांनी केला जेरबंद अशी अवस्था प्रतीक झाली 64 लाख रुपयाची बनावट चलनी नोटा त्याच्या सह त्याच्या दोन साथीदार करवी पोलीसांना छापखान्यात सापडल्या झेरॉक्स मशिन, प्रिन्टर, कागद, शाई, सह अण्य साहित्य राहुरी पोलीसांनी छापखान्यातुन जप्त करुन सिंल बंद केले आहे
प्रतिक हा मागील आठ महिन्यांपासून जामीनावर आहे मात्र त्याचे पाय जमिनीवर नव्हतेच आपण औद्योगिक वसाहती मध्ये कामाला आहोत असे सांगून त्याने घर भाड्याने घेतले होते व त्याला नगर जिल्ह्य़ातील राजेद्र चौघुले व तात्या हजारे रा कर्जत जोड मिळाले मात्र या बनावट नोटा खपवण्या साठी ते राहुरीला आले होते की अण्य दुसरीकडे जाणार होते सुरुवातीला काही खऱ्या नोटा ही टोळी देते नंतर विश्वास संपादन करुन एकास दोन असा भाव असतो अशी चर्चा आहे नगर जिल्ह्यात कोणा मार्फत किती बनावट नोटा या आगोदर चलनात आल्या याचा तपास पोलिसांनी करणे आवश्यक असून भारतीय अर्थव्यस्था खिळ खिळी करणार्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी बनावट नोटा तयार करणाऱ्या प्रक्षिणन संस्थेचा तपास करणे गरजेचे आहे बनावट नोटाची निर्मिती थांबवण्यासाठी काही ठोस पावले उचलावीत बनावट नोटा प्रमाणेच अनेक गंडा घालु ऑनलाइन स्किम देखील आल्या आहेत तेव्हा अधिकच्या लोभाला बळी न पडता आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याची जबाबदारी प्रतेकाची आहेच
बनावट नोटा छापणारी एक टोळी पोलीसांनी तुरुंगात डाबली आहे अशा आणखी काही टोळ्या आहेत का याचा शोध घेणे जरुरीचे आहे
राहुरी पोलीसांनी बनावट नोटा छापुन चलनात आनणारे पकडून चांगले कौतुकास्पद काम केले आहे व यापुढील काळात यात सातत्य ठेवावे व यातील अरोपीला शिक्षा होईल असे संबळ पुरावे न्यायालयाला द्यावेत
Comments
Post a Comment