भैरुनाथ पानपुरी गाडी लागत नाही हल्ली...

भैरुनाथची पानपुरी हातगाडी आता  येथे आली नाही व घरासमोरुन देखील हालली नाही ....
तर याचे कारण देखील असेच होते ते म्हणजे पानपुरी वाला भैय्याने  अकस्मात या जगाचा निरोप घेतला 
कालुसिंग राणावत ऊर्फ पानपुरी वाले 
चित्रगुड राजस्थान वय 50 असे दुःख निधन झालेल्या भैय्याचे नाव नाव गांव इतके दिवस कोणाला ठाऊक नव्हते पानपुरी वाला भैय्या या नावाने लहान थोर हाक मारायचे. 
 राहुरी फॅक्टरीवर  समोर कै. गुलाबराव कदम यांच्या व्यापारी संकुल समोर गेल्या अठरा विस वर्षा पासुन पानपुरी गाडी नित्यान ऊभी असायची मात्र हल्ली मात्र ती तेथे नाही 
एकादशीच्या दिवशी सकाळीच कालुसिंग यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला काही कळनासे झाले 
गाडी लावण्यासाठी माल बनवण्याची घाई सुरु होती मात्र तिव्र वेदना सुरु झाल्या उपचारासाठी जवळच्या 
एका खाजगी रुग्णालयात  दाखल केले त्यांनी त्यांना  उपचारा साठी नगर, अथवा प्रवरा येथे हलविण्याचा वैद्यकीय सल्ला दिला 
मात्र काळ आला कि तो कुणा साठी थांबत नाही तसेच कोणाचे ऐकत देखील नाही 
रस्त्यात काळाने झडप घातली अण होत्याच नव्हत झाल
 परप्रांतीय व भाषा वादाकडे त्याच्या चांगुलपणाने ग्रांहक तसेच रहिवाशांना आपलेसे केले होते एका मुलीचा विवाह केला तर मुलगा कृष्णा इंग्रजी माध्यमात आठवीत शिकतो ते पानपुरीच्या हातगाडीवर 
घर भाड्याने घेतलेले घरी पत्नी मुले पानपुरी, रगडा, भेळ साहीत्य बनवायचे बारा नंतर आपली हात गाडी ढकलत जायचा व रात्री दहा साडे दहा दरम्यान पुन्हा घराकडे हातगाडीवर प्रपंच नेटका केला मात्र हातावरील 20 रुपये गोळा करणारा रुग्णालयात जातो तेव्हा 20 हजार कोठुण आणणार परिस्थिती पुढे मनुष्य हतबल होऊन जातो त्यांच्या अचानक जाण्याने गल्ली हाय मोकळुन रडली मात्र पुढचे सारे अवघड होऊन बसले कृष्णा शाळेत जाईल की पानपुरी विकेल मात्र त्याच्या डोक्यावर बापाचे छत नसेल 
भाषा वाद व प्रात वादपलिकडे त्याने मानसे आपलेसे केले होते आज कुणा साठी कुणी रडारला तयार नाही मात्र कालुसिंग याने सगळ्या गल्लीला रडायला लावले ते त्याच्या चांगुलपणाने आपल्या व्यावसाय निटनेटका व चिकाटीने केला मात्र त्याच्या अचानक जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले हात गाडी लावयाची जागा मोकळच आहे बसायचे बाकडे एकमेकांवर ठेवलेले जणु काही तो पुन्हा येईल गाडी वर खंमग चवीचा ग्रांहक स्वाद चाखतील मात्र पानपुरीची गाडी जागेवर नसल्याने अनेक माघारी फिरावे लागते जेव्हा दुःख निधनाची बातमी समजते तेव्हा मात्र अरेरे लई वाईट झाले असे शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाहीत 
लहान थोराना आपलेसा करून गेला एक परप्रांतीय भैरुनाथ.... त्याच्या जाण्याने त्याची बायको मुले मात्र अनाथ झाली आहेत. 
कालुसिंग वर अतिम संस्कार  गावी राजस्थान येथे झाले....

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन