आता कोठे "अरुणोदय" झाला .....

आता कोठे"अरुणोदय" झाला 
रोख ठोक @पत्रकार शिवाजी घाडगे 
डाॅक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना जिल्हा बॅकेच्या ताब्यातुन सोडविणे अधिक गरजेचे असून बॅकेच्या ताब्यातील कारखाना संचालक मंडळाच्या हातात घेण्या साठी अनेकांपुढे हात जोडावे लागत असले तरी आपल्या वडीलांच्या नावा साठी अध्यक्ष अरुण तनपुरे करतायत
 राहुरी बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शना खाली जनसेवा मंडळाने डाॅक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवीली तसेच हाती सत्ता काबीज केली तसेच सभासंदानी देखील अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्यावर विश्वास दाखवत एक हाती सत्ता दिली. 
 या कारखान्यावर शासकीय प्रशासक होते तसेच कारखाना भाडेतत्त्वावर चालवयला देण्या सर्दभात सहकार आयुक्त यांनी तीनदा वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध केल्या होत्या म्हणजे या कारखान्याला मोडीच्या भावात कोण खाणार होते हे लक्षात आल्या नंतर काही सुज्ञ सभासद न्यायालयात धाव घेऊन ही शिक्रापुरी न्यायालयांच्या लक्षात आणून देवून कारखान्याची 
निवडणूक घ्यायला भाग पाडले.
 जर हा कारखाना गेला असता तर कशाचा चेअरमन व कशाचा व्हा चेअरमन मुळात हा कारखाना बंद कसा राहील याची विह रचना आखून ठेवलेली होती. 
राहुरी बाजार समिती प्रमाणे फक्त अध्यक्ष अरुण तनपुरे चालवु शकतात म्हणून तर सभासंदानी सत्ता अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या हातात दिली जिल्हा बँकचे कर्ज एक रक्कमी कसे फेडता येतील व या साठी कसा पैसा उपलब्ध करवा लागणार या विषयी गाभिर्यानी चर्चा व मार्गदर्शन होणे जरुरीचे आहे कारखान्यावर कर्जाचा बोजा सोडून काहीच नाही  कारखाण्यातील अनेक मशनरी चोरी गेलेल्या संध्या येथे उदराला खायला कागद देखील नाही. 
व अजून कारखाना बँकेच्या ताब्यात असल्याने संचालक मंडळाने निवडुन येऊन देखील कारखान्यात पाय ठेवता आला नाही म्हणून तर अध्यक्ष पदाची निवडणूक संलग्न संस्थेच्या कार्यालयात घ्यावी लागली मुळात निवडणूक आलेले 21 संचालक एक आहेत पहिला कारखाना सुरु होणे गरजेचे आहे. 
व मागील काही कडु गोड अनुभव तनपुरे कुटुंबाला आल्या मुळे कदाचीत ताक ही फुकुन पित असावे कारण मुळा प्रवरा, जिल्हा परिषद अध्यक्ष पद कार्यकर्त्यांना दिले व त्यांनी वेगळी चुल राजकीय माडत तनपुरे यांनाच अस्मान दाखविले हे विसरतील ते तनपुरे कसले.
आता राहता राहीला प्रश्न तो जो की कारखान्याचा अध्यक्ष असतात तेच संलग्न संस्थेचा पद सिध्द 
अध्यक्ष असतात मुळात अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून पक्षाला मोठी ताकद दिली असून भविष्यात कारखाना सुरु करण्या साठी व केंद्र सरकार चे पॅकेज मिळवण्या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत कामी येणार असून भविष्यात तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा तनपुरे यांच्या वर्चस्वा खाली आल्या तर नवल नाही व कारखाना निवडणूक आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी खासदार सुजय विखे यांनी उमेदवार उभे केले नाही म्हणून अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा पॅनल आला मग राहुरी बाजार समितीत तर कर्डिले व विखे प्रणित पॅनल होता यात फक्त सत्यजित कदम व शाम निमसे निवडुन आले हेही ठाऊक होतेच .
मुळात मागील विविध संभा निवडणूकीत पराभव आ. शिवाजी कर्डिले यांचा कोणा मुळे झाला हे कर्डिलेना ठाकुक असल्याने कर्डिले यावेळेस निवडणूक उमेवार नामनिर्देशन पत्र भरण्या साठी सुध्दा यांना बरोबर घेतले नाही मी राहुरी व संगमनेर मधुन विधानसंभा निवडणूक लढविणार असे म्हणताच आ. शिवाजी कर्डिले यांनी टोपी झटकली होती 
आ शिवाजी कर्डिले हे हिंदुत्व च्या मुद्यावर या वेळेत निवडुन आले आहेत अध्यक्ष अरुण तनपुरे याचे चिरंजीव संचालक हर्ष तनपुरे देखील राहुरीतील तालमीत छत्रपती शिवरायांची विटंबना कोण्या समाज कटकानी केली तेव्हा राज्य मार्गावरील माडी घालून बसले होते.
तेव्हा काही दिवस धोडे सबुरीने घ्यावे लागेल मुळात अध्यक्ष अरुण तनपुरे अतिशय धुरंधर तितकेच खमके आहेत मागील 1991च्या विधान संभा निवडणूकीत अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी  आपले बंथु माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मतदान प्रक्रियेत गोधळ घालणारा विरोधात कारखान्याच्या प्राथमिक शाळेच्या बुध वर बाह्या मागे केल्याचे नवीन पिढीला ठाऊक नाही. आता अध्यक्ष अरुण तनपुरे यांचे वय देखील 75 वर्ष झाले आहे मागील निवडणुकीत तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव हा अनपेक्षित होता यावेळेस मात्र बहुमात आहे.
हा कारखाना कायमचा बंद रहावा व परिसरातील ऊस आम्हाला मिळावा असे अनेकांना वाटत होते मात्र शेवटी आपले ते आपलेच असतात असे म्हणत यावेळेस अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या हातात हा बंद कारखाना सभासंदानी विश्वासाने दिला त्या विश्वास ते निश्चित पात्र ठरावेत तर खऱ्या दुष्टीने राहुरीत  "अरूणोदय" झाला हे सार्थ ठरेल मात्र आज तरी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या खुर्चीला कर्जाचे काटे आहेत हे नक्कीच. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर