मुळा धरणातुन पाणी सोडणार....

मुळा धरणातून पाणी सोडणार 
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे 
नगर जिल्हाची जलसंजवनी म्हणून ओळखले जाणारे राहुरीचे मुळा धरणातून बुधवारी पाच वाजता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे. 
    26000 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरणाचा एकुण साठा 18161दलघफु (69.85%) होत असल्यामुळे तसेच धरणात पाणी आवक सुरु असल्याने जलाशय परिचलन सूची नुसार नदीमध्ये 3000 क्यू एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे.पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे विसर्गात आवश्यकते नुसार वाढ केली जाणार आहे.तरी नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे व नदी पात्रात प्रवेश करू नये.तसेच कुठलीही जीवित व वित्त हानी होणार नाही या बाबत खबरदारी घ्यावी असे अव्हान जलसिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

                        

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर