श्रीराम वेहरे राज्याचे "जल सल्लागार"

राज्य शासनाने जल सल्लागार नियुक्त केल्याने कोण झाले गार
विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे 
महाराष्ट्र राज्य सरकार ने जलविषयक सल्लागार म्हणून श्रीराम वेदिरे याची नियुक्ती केली असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 
 श्रीराम बेदिरे यांची जलविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असून त्यांना विशेष अधिकार ही देण्यात आले आहेत .
श्रीराम बेदिरे यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला ते मुख्यमंत्री यांचे जलविषयक सल्लागार असनार असून ते अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत 
धोरणात्मक मार्गदर्शन 
राज्यातील जलविषयक दीर्घकालीन धोरणाचे प्रारुप तयार करणे, राज्यातील नदीजोड प्रकल्पांसाठी एकात्मिक दीर्घकालीन धोरण तयार करणे, जलसंधारण, भुजल, पाणी योजनाचे नियोजन, जल व्यवस्थापनाचे विविध कायदे, धोरण, पुनर्वापर धोरण यामधील सुधारणा व अमलबजावणी, जलसिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुक्ष्म सिंचनास प्रोत्साहन, जल संबधीत समित्या अहवालातील शिफारशीवर मार्गदर्शन 
आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय सन्वय 
केंद्रीय जल आयोग (cwc)जलशक्ती मंत्रालय, निती (NITI) आयोग, नॅशनल वाॅटर मिशन, विविध पाणी तंटा लवाद याच्या बरोबर समन्वय, जलसंपदा, मृद व जलसंधारण, पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यावरण, महसूल, कृषी, वन व विभागाशी सन्वय 
जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव सविता बोधकरे याच्या स्वाक्षरीने श्रीराम वेदिरे यांची जलविषयक सल्लागार म्हणून नियुक्तीचे आदेश निर्गमित झाले आहेत 
श्रीराम वेदारे यानी अमेरिकेत 15 वर्ष अभियंता म्हणून नोकरी केली आहे 2009 मध्ये ते पुन्हा भारतात आले भारत सरकार च्या जलसंपदा नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयात सल्लागार म्हणून काम पाहिले आहे 
टिहरी धरण नदीच्याअभ्यास समितीचे सदस्य राहीले आहेत 
गंगोत्री ते गंगा सागर पर्यत गंगा नदीचा अविरत प्रवाह कसा राखायचा याविषयी उपाययोजना सुचवल्या आहेत 
सध्या ते राजस्थान सरकारचे एकात्मिक कमांड आणि पाणलोट क्षेत्र विकास याविषयी स्थापित केलेल्या टाक्स फोर्सचे सदस्य आहेत 
त्यानी जलविषयक अनेक पुस्तके लिहली असून "जल व्यवस्थापन गुजरातची यशोगाथा" 
गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या पाण्याचा वापर करून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासाठी "वाटर ग्रिड" आणि भारता साठी अपरिहार्य नदीचा पुर्ण जलव्यवस्थापन पध्दतीचा समावेश आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर