नागरिकांनी जिल्हा विकासा साठी सुचना पाठविण्यास मुदतवाढ-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा 10 ऑक्टोबरपर्यंत सुचना पाठविण्यास मुदतवाढ - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा प्रशासन पुढील २५ वर्षासाठी जिल्हा विकास धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या आहे. हा आराखडा जिल्हयाच्या सर्वागिण आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने ध्येय, उदिष्टे, धोरणे आणि कृतीची इ. चा समावेश असेल.हा जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा. यापूर्वी नागरिकांच्या सुचना 20 सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. परंतु सर्व क्षेत्रातील पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुचना पाठविण्यास 10 ऑक्टोबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी लिखीत स्वरुपात सुचना पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांनी केले आहे. ...