राज्यात नऊ कोटी 70 लाख मतदार नोंदणी
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाखांहून अधिक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ प...