महात्मा फुले विद्यापीठात महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा
महात्मा फुले कृषि विद्यापीठात 63 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा महात्मा फुले कृषि विद्यापीठाची सर्व क्षेत्रात दमदार वाटचाल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असंख्य लोकांच्या आंदोलनातून, प्रचंड खडतर प्रयत्नांमधून व 107 लोकांच्या बलिदानातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आपना सर्वांना त्या शहिदांविषयी, महाराष्ट्राविषयी अभिमान असला पाहिजे. त्याचबरोबर देशाच्या विकासात कामगारांचाही सहभाग फार मोठा आहे म्हणुन आजचा दिवस कामगार दिवस म्हणुनही साजरा केला जातो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. शेतकर्यांसाठी शिफारशीबरोबरच प्रत्यक पिकांचे नवनविन वाण तसेच शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. कास्ट प्रकल्प, सेंद्रिय शेती, देशी गाय प्रकल्प यासह अनेक प्रकल्पांसाठी शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे. विस्तार कार्य प्रभावी होण्यासाठी विद्यापीठ लवकरच कम्युनिटी रेडिओ सुरु करीत असून त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन प्रभावी पध्दतीने शेतकर्यांपर्यंत पोहचणार आहे...