Posts

Showing posts from August, 2023

पेडगाव तलाठी दिड लाखाची लाच

Image
महसुल ची खाबुगिरी  तलाठी भाऊसाहेब हवे दोन लाख रुपये तडजोडी त दिड लाख  गुन्हा दाखल  आकाश नारायण काशीकेदार, तलाठी सजा पेडगाव, ता. श्रीगोदे असे तलाठी भाऊसाहेब नाव आहे  लाचेची मागणी- 2,00,000/-₹  तडजोडी अंती 1,50,000/-₹ लाचेची मागणी दिनांक- ता.11/07/2023 लाचेचे कारण - तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राकडून तोंडी भाडेतत्त्वावर पोकलेन मशिन कामा करीता घेतला होता. सदरचा पोकलेन दि.11/7/2023 रोजी रात्री 01.00 वा. पेडगाव येथील तक्रारदार यांच्या परिचयाचे इसम यांच्या शेतात लावलेला असताना पेडगावचे तलाठी श्री काशी केदार व सर्कल डहाळे हे सदर पोकलेन लावले ठिकाणी आले व तक्रारदार यांना तुम्ही सदरचा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे सांगून तक्रारदार यांना तुमच्या पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी 3,00,000/-रु. आम्हाला द्यावे लागतील असे म्हणाले व दिनांक 11/7/2023 रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तक्रारदार यांना भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे त्यांची लाच मागणीची वरील प्रमाणे तक्रार नोंदवली. त्यानुसा...

देशाच्या सहकाराला महाराष्ट्रने दिशा दिली-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Image
देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील  साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण*  भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे. असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे काढले.  प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अ...

केद्रीय संरक्षण मंत्री व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले शिर्डीत साई दर्शन

Image
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साई बाबाचे दर्शन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले.   केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मंदिरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते. 

उद्योजक अनुभव कार्यशाळा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजीत उद्योन्मुख उद्योजक - प्रवास आणि अनुभव कार्यशाळेचे तांत्रिक सत्र संपन्न महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे उद्योन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव तथा महासंचालक डॉ. हिमांशू पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि. श्री. विलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील, भा.कृ.अ.प.च्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के.के. पाल उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये तीन तांत्रिक सत्र घेण्यात आले. पहिल्या ...

मुख्यमंत्री एकनाथ शिदे शिर्डीत

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीत गुरुवारी 31 ऑगस्ट 2023  साईचे दर्शन घेणार मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरात दोनदा घेतला बाबाचा आर्शिविद बाबाच्या दर्शना नंतर ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील जंयती निमित्त व साहित्य पुरस्कार समारंभ उपस्थित राहणार आहेत 

शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याच्या साठी 30 हजार लाच घेताना पोलीस अटकेत

Image
खाकीतील लाचखोरी @पत्रकार शिवाजी घाडगे  शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याची लाच स्विकारताना पोलीस काॅस्टेबल संदीप गडाख याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले नाशिक येथील 27 युवकाने केली होती तक्रार यामुळेच दुधाळ याची कारकिर्द वादग्रस्त बरोबर लाचखोर ठरली आहे दुधाळ यानी राहुरी,बेलवंड  पोलीस ठाण्यात वर्ष भरा चा कार्यकाळ पुर्ण करु शकले नाहीत व आता शि॔डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान व येथील पोलीस ठाण्याचे दुधाळ कारभारी होते  आपल्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने रंगेहात पकडताच दुधाळ यांनी देखील ठोकली आहे  लाचेची मागणी दि.15/6/2023 रोजी:- 100000/- ते  150000/-  तडजोडी अंती 30,000/- स्विकरण्याची तयारी दर्शविली  दि. 26/7/2023 रोजी- 100000/- लाच स्वीकारली लाचेचे कारण   तक्रारदार यांचे विरुद्ध शिर्डी पो. स्टे. येथे भा.द. वि. कलम 354 च्या दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व त्यांचेवर तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी दिनांक 15/6/23 रोजी   पंचासमक्ष आलोसे गडाख यांनी पो. नि. दुधळ यांचेसाठी 1 ...

आर्दश पंत संस्थेला आणखी एका पत संस्थेची

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  आर्दश नागरी पंतसंस्थेला आता आणखी एका नव्या पत संस्थेची टक्कर या पंत संस्था अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी चेअरमन अण्णा मामा चोथे व त्याच्या समर्थकांना अल्हाद बाजुला ठेवण्यात आल्यानंतर बरेच पुला खालून पाणी गेल्यावर हे संगळे राज्यकीय नाट्य जिव्हारी लागल्या नंतर आता पुन्हा एका संस्थेचा नव्याने जन्म होणार असल्याचे बोलले जात आहे असे  संध्या अनेक पंत संस्था मध्ये अनेक घोटाळे उघडकीस आले असले तरी आर्दश चा कारभार आर्दश आहे त्यामुळेच येथे मोठी स्पर्धा पाहवयास मिळते 

धरणातील पाण्याचा जपून वापर करा-ना.राधाकृष्ण विखे-पाटील

Image
जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा -- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील   गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री  विखे पाटील बोलत होते.   यावेळी आमदार बबनराव पाचपुते,आमदार प्रा.राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ.किरण लोहमटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,    पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,  जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व स...

प्रियंका गाडे यांना पीएचडी

Image
प्रियंका सुभाष नालकर-गाडे यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त प्रियंका यांना पुणे विद्यापीठची चंद्ररूप टाकले जैन कॉलेज कॉमर्स, श्रीरामपूर या संशोधन केंद्र अंतर्गत बेलापूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. मारुती केकाणे यांच्या सहाय्यक मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन या विषयात पीएचडी प्राप्त झाली असून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कृषी कर्जाचा सखोल अभ्यास सदर संशोधनात केलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर ,डॉ. राजेंद्र कळमकर तसेच राजषी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्य स्वाती हापसे 

एम पी के व्हीत 28 व्या कडधान्य बैठकीचे आयोजन

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात 28 व्या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्प आणि भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर (भा.कृ.अ.प.) यांचे संयुक्त विद्यमाने 28 वी वार्षिक रब्बी कडधान्य बैठक दि. 1 ते 3 सप्टेंबर, 2023 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजीत करण्यात आली आहे. या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचे उद्घाटन 1 सप्टेंबर, 2023 रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पिके) डॉ. टी.आर. शर्मा हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहे. याप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (कडधान्य व तेलबिया) डॉ. संजीव गुप्ता, कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी.पी. दिक्षीत, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि कानपूर येथील अखिल भारतीय रब्बी कडधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी तसेच ...

तृतीयपंथीय प्रमाणपत्र व ओळखपत्र साठी ऑनलाईन अर्ज करा

Image
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा  तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावुन घेत त्यांच्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्याबरोबरच तृतीयपंथीयांना प्राथमिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र जारी करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने transgender.dosje.gov.in हे पोर्टल  विकसित केले आहे. जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांनी नोंदणी करुन तृतीयपंथी असल्याबाबत प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी तृतीयपंथी कुठल्याही ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. ट्रान्सजेन्डर धोरणानुसार एखाद्याची ओळख दर्शविण्यासाठी आणि पासपोर्ट, आधार व इतर कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग केला जावू शकतो. त्यामुळे सदर ओळखपत्र, प्रमाणपत्र तृतीयपंथीयांसाठी महत्वाचे आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्वंयघोषणापत्र, प्रत...

जिल्हाक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांची बदली

Image
नगरच्या क्रीडा अधिकरी भाग्यश्री बिले यांची पुण्याला बालेवाडी येथे बदली त्यांनी नगर जिल्ह्यात अवघे दीड वर्ष सेवा केली  नगर जिल्ह्यात पाच वर्षांत 13 जिल्हा क्रीडा अधिकरी झाले आहेत एक अधिकारी आपला सेवाकाल पुर्ण करु शकला नाही हे विशेष खो खो खेळा प्रमाने क्रीडा अधिकार्यांना खो देण्यात आली भाग्यश्री बिले या अशियन चॅपियन धाव पटु असून त्या 21 जानेवारी 2022 मध्ये नगरला रुजु झाल्या 

शेती महामंडळाच्या करार शेतीला पाणी देण्यासाठी 40 हजारांची लाच घेणारे तिघे पकडले

Image
पाण्याचा पैसा शेती महामंडळाच्या करारी शेतीस पाणी देण्यासाठी  40 हजाराची लाच स्विकारताना पाटबंधारेचे तीन कर्मचारी पकडले  नगरच्या लाच लुचपत विभागाची कारवाई  यशस्वी सापळा  तक्रारदार- पुरुष  वय- ५८ वर्ष, रा.महांकाळ वडगांव, तालुका श्रीरामपूर, जि.अहमदनगर आरोपी १) आलोसे अंकुश सुभाष कडलग, वय-४२ वर्ष धंदा- नोकरी, कालवा निरीक्षक, वर्ग-३, वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर, जि. अहमदनगर रा.बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर २) अनिस सुलेमान शेख, वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम) रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर ३) संजय भगवान करडे, वय-३८ वर्ष, धंदा-फुल व्यवसाय, (खाजगी इसम) रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर लाचेची मागणी- ८५,०००/- ₹ तडजोड अंती ४०,०००/- ₹ लाच स्वीकारली -४०,०००/-₹   ०७/०६/२०२३  लाचेचे कारण -.तक्रारदार यांचे सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण...

झाले गेले विसरून जाऊ:राजकारणात विसरायचे असते

Image
झाले गेले विसरून जाऊ राजकारणात विसरायचे असते  चर्चा तर होणारच  @पत्रकार शिवाजी घाडगे  सत्ताआली की कोणी काही म्हणत असले तरी डोक्यात हवाख जात असते मग ही हवा लोक बरोबर उतरवत असतात असेच शिर्डी संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे सेवानिवृत्त झाल्या झाल्या शिवसेच्या धनुष्यबाणावर खासदार झाले साई बाबा च्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात ऐवढ्या मोठ्या जागतीक दर्जाच्या देवस्थान वर भाऊसाहेब सिओ होते तसे जिल्ह्यात त्यांनी गटविकास अधिकारी म्हणून देखील काम केले होते अंगणवाडी सेविका ते ग्रामसेवका पर्यत ते चांगले परिचित होते मात्र  निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले सोलापूर मतदार संघातील पंढरपूर हुन शिर्डीत आले खरे मात्र जातीय प्रचाराने त्याना पराभव स्विकारावा लागला नंतर पुढे भाऊसाहेब अचानक काॅगेस मध्ये गेले मात्र त्यांना प्रचंड शिवसैकाच्या रोशाला सामोर्य जावे अक्षरश्या त्याच्यावर अंडे देखील फेकले गेले काॅगेस मध्ये असताना त्याचा पराभव झाला व पुन्हा येथे दहा वर्ष सेनेचा उमेदवार लोकसभेत सदस्य झाला या तिन्ही वेळी शिवसेना व भाजप ची युती होती आता या...

भाऊसाहेब च्या हाताला शिवबंधनची गाठन

Image
भाऊसाहेबांना शिवसैनिकांनी माफ केले हातात बांधले शिवबंधन         मुंबईत काय घडल!!! @पत्रकार शिवाजी घाडगे  शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिर्डीचे खासदार झालेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिक दिल दार आहेत भाऊसाहेब चुकीच्या ठिकाणी गेले होते त्यांना त्याचा पच्छाताप झाला शिवसैनिक मोठ्या मनाचे आहेत म्हणून त्यांना पुन्हा शिवसेनेत घेण्यात आले आहे  दुसरा पक्ष प्रवेश ही श्रीरामपूर येथील श्रीराम मंडळाचे संस्थापक व नगरसेवक संजय छलारे यांचा ते माजी आमदार शिर्डी संस्थाचे अध्यक्ष दिवगंत नेते जंयत ससाणे यांची खद्दे समर्थक व विश्वासु सहकारी होते  छलारे हे शिवसेनेत प्रवेश केल्याने सहाजिकच अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत श्रीरामपूर च्या विद्यमान आमदार याच्या नातेवाईक मातोश्रीवर जाऊन येताच छलारे शिवसेनेत दाखल झाले छलारे हे प्रामाणिक व निष्ठावान नेते आहेत  भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपा मधुन शिवसेनेत गेल्याने भाजपकडून शिवसेनेत लोक येतायत हे ठाकरे यांना संदेश द्यायचा होता तो देऊन टाकला...

जयेशला वरचा सा

Image
बेक्रीग  राहुरीच्या बालशाहीर जयेश खरे ला भेटला वरचा सा + जी च्या लिटील चॅम्प्स सारेगमप या स्पर्धेत बुधवारी रात्री जयेश खरे  शाहीर अण्णा भाऊ साठे यांची माझी मैना गावाकडे राहीली ही लावणी सादर करून साऱ्याची मने जिकली  महा गुरु जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी जयेश वरचा सा + देत पुढचे प्रवेश कुपन दिले तर कवि सलील कुलकर्णी यांनी जयेश ला बालशाहीर पदवी बहाल केली

अखिल भारतीय गरिबी निर्मूलन जिल्हाध्यक्ष-पत्रकार अक्षय करपे

Image
अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पत्रकार अक्षय करपे यांची निवड अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी लेखक पत्रकार अक्षय करपे यांची संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या आदेशाने निवड झाली आहे. सविस्तर वृत्त असे की आज समाजातील वंचित गरीब शोषित वर्ग जो वर्षानुवर्ष गरीबी मध्ये घोरपळून निघत आहे त्याला बाहेर कसे काढता येईल याकडे आज कोणाचेही लक्ष नाही. गरीब गरीब श्रीमंत श्रीमंत होताना दिसत आहे देशातील गरीबी दिवसान दिवस वाढत जाताना दिसत असूनही आज श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत जात आहे. देशामध्ये समाजातील प्रत्येक गरिबाला हक्काचे घर शिक्षण मुलाबाळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध कशा करून देता येईल याकडे आज प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. यावेळी अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा लेखक पत्रकार अक्षय करपे यांनी निवड झाल्यानंतर बोलताना म्हटले आहे की अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीचा उद्देश कोणत्याही राजकीय प्रकारचा नसून समाजातील गरिबी कशी दूर करता येईल हाच या समितीचा उद्देश असून या माध्यमातून गरिबांच्या हक्काचा पैसा त्यां...

उजव्या कालव्याला पाणी सोडा-प्रहार

Image
उजवा कालव्याला  पाणी सोडा- प्रहारचे तालुध्यक्ष सुरेश लांबे  यांची मागणी   मुळा धरण उजव्या कालव्यातून शेती पिकांसाठी त्वरित पाणी आवर्तन सोडण्याची शेतकरी नेते सुरेश लांबे यांनी राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा ऋतू सुरू होऊन अडीच महिने उलटुनही नगर जिल्ह्यासह मुळा धरण लाभक्षेत्रात अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाउस न झाल्यामुळे खरीप हंगामातील अनेक शेतक-यांना कपाशी, सोयाबीन, बाजरी व ईतर पिकांची पेरणी करता आलेली नाही, तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने त्या भागात पेरणी झाली. परंतु त्यानंतर पाऊस न पडल्याने पिके जळुन चालली आहे. आज रोजी मुळा धरणात 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठा उपलब्ध असुन अजुनही नवीन पाण्याची आवक सुरु आहे. अजुनही दिड महिना पावसाळा हंगाम शिल्लक असुन मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होऊन धरण पुर्ण क्षमतेने भरु शकते. परंतु आज रोजी शेतक-यांनी पेरणी केलेल्या पिकांसाठी उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास जिवदान मिळेल. तरी आठ दिवसांपासुन मुळा डाव्या कालव्याला पाणी सोडुन त्या भागातील श...

पाऊस नसल्याने नागाची वारुळे निर्माण झाली नाही

Image
पाऊस नसल्याने वारुळे नाही  @पत्रकार शिवाजी घाडगे  नागपंचमीचा सण अतिशय सामसुमित गेला कुठाच उत्साह नाग पंचमिला नव्हाता ना वारुळे नागाला दुध नाही अण लाह्या नाही पाऊस नसल्याने जिवाची लाही लाही झाली आहे   ईतका भयावहक दुष्काळ संध्या असुन पाऊस नसल्याने ऊभे पिके करपुन गेली अण वारुळे देखील निर्माण झाली नाही  झोके झाडाला दिसलेच नाहीत नाग पंचमी निमित्त झाडाला झोके बाधले जातात बाल गोपाल व सुहासिनी झोका खेळण्याचा आनंद घेताता मात्र श्रावणीतिल पहिलाच सण एकदम निराश जनक गेल्याचे पहावयाला मिळाले  सणाचा उत्साह दिवसेंदिवस कमी होत चालला आहे ग्रामीण भागात झोके झोकात खेळताना पाहवयास मिळायचे आता मात्र एकदम झोके ही गायब झाले असुन सणावर दुष्काळाचे सावट पाहवयास मिळाले  पावसाची वाट पाहुन डोळे आले मात्र पाऊस आलाच नाही  डोळ्याची साथ इतकी मोठ्या प्रमाणात होती की अनेकांनी डोळे आले म्हणून काळे चष्मे घातलेले दिसले पावसाची वाट पहाता पहाता डोळे आले मात्र पाऊस आला नाही     मुळा धरणातून वांबोरी चारी साठी जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील यांच्या हस्ते ...

राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा मधल्या रस्त्यावर बिबट्याचा वावर

Image
बेक्रीग  देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी मधल्या रस्त्यावर सोमवरी रात्री पुन्हा बिबट्याने दूचाकी स्वराला दिले बिबट्याने दर्शन देवळाली येथील एका दवाखान्याच्या कार्यक्रम नंतर येणार्या दुचाकी स्वारा समोरुन बिबट्या पळाला  पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने पिसरात बिबट्याची दहशत कायम आहे वन विभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे 

काॅगेस वर्किंग कमिटी जाहीर

Image
बेक्रीग  @पत्रकार शिवाजी घाडगे   काॅगेस च्या केद्रीय कार्यकारी समिती(cwc) रविवारी झाली असून या 39 जर्नल सचिव 18 कायम निमंत्रित 5 प्रभारी, जर्नल सचिव 9 ,विषेश निमंत्रित 9 , एक्स 4 ,सदस्य निवडण्यात  आलेअसुन  यात महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह मुकुल वासनिक,प्रणिती शिदे,चंद्रकांत हंडोरे,माणिकराव ठाकरे,यशोमती ठाकुर यांचा समावेश आहे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे भाजपा पाठिंब्यावर आमदार झाल्यामुळे टाळले

भाऊसाहेबाच्या हाती मशाल

Image
भाऊसाहेब च्या हाती मशाल  @पत्रकार शिवाजी घाडगे  शिवसेनेला अचानक सोड चिठ्ठी देऊन पंजा वर लढणारे माजी खासदार पुन्हा मशाल हाती घेणार 23 सप्टेंबर मुर्हत ठरला  संध्या महाराष्ट्रात सगळेच राजकीय पक्ष मध्यंतरीच्या सत्तांतर नंतर हतबल झालेले दिसतात मध्यंतरी घड्याळाला दिल्लीश्र्वरानी चावी दिली  प्रतेकालाच हवाअसलेला अकडा पार करायचा  महाराष्ट्रात 48 लोकसंभेच्या जागा असून भाजपा सेनेकडे 42 जागा आहेत भाजपाकडे 24 भाजपाकडे व शिवसेनेकडे 18  राष्ट्रवादी व काँग्रेस  भाजप व शिवसेना यांची अनेक वर्षांपासून ची युती संपुष्टात आली  मुख्यमंत्री एकनाथ शिदे याच्या युतीने पुन्हा 13 खासदार मिळाले    खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे जिल्हा परिषद नोकरीत होते शिर्डीच्या साई विश्वस्त मंडळात मुख्यकारी अधिकारी म्हणून काम करीत होते अनेकानी त्यांनी मैत्री पुर्वक संबध ठेवले व सेवानिवृत्त नंतर त्यांनी 2009 शिवसेनेची उमेदवारी मिळवली समोर मंत्रि रामदास आठवले होते ॲट्रोसिटी प्रचाराने आठवले पराभुत झाले व दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेस चे शिवाजी कर्डीले यांचा पराभव झाला नंतर माज...

एमपीकेव्हीत अ‍ॅन्टी रॅगिंग दिवस साजरा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगिंग दिवस साजरा  शिक्षण सुरु असतांना वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना करियर घडविण्यासाठी मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांने एकदिलाने राहावे. एकमेकांच्या अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यास मदत करावी. विद्यापीठ राबवत असलेले व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा आंतरविद्या जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात कुलगु रु डॉ. पी.जी. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महानंद माने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, सहाय्यक कुलसचिव श्री. आर.डी. पाटील, तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिल भणगे, विद्यार्थी कल्याण अधिकारी (पम) डॉ. विजय पाटील, डॉ. राजेंद्र क्षिरसागर, कार्यालय अधिक्षक श्री. किरण शेळके उपस्थित होते.  यावेळी डॉ. स...

आदर्श च्या चेअरमन बुलेट चोरीला

Image
बेक्रीग  राहुरी फॅक्टरी येथील आर्दश पतसंस्थेचे चेअरमन तथा शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णु गिते यांची बुलेट अज्ञात चोरट्यांनी लाबवली ,तसेचे अण्य दोघांच्या  दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या एकाच रात्री तीन मोटार सायकल चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे रात्रीचा चेक पाॅईट केव्हाच बंद झाला आता नागरिकांची सुरक्षा नागरिकांच्या हाती

जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाई यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासनाची पाच लाखाची मदत

Image
जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना शासनाची पाच लाखांची मदत शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण "पोटा साठी नाचते मी परवा कोणाची"   ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते  पाच लाखांच्या मदतीचा धनादेशाचे वितरण करण्यात आला. शिर्डी  येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले ‌  मागील काही दिवसांपासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांताबाईंचे पुनर्वसन करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.  मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतीच तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांची द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत सन- २००९ पासून त्यांना वर्ग 'क'...

उजव्या कालव्यातून पाणी सोडा-चव्हाण

Image
भंडरादरा उजवा कालव्यातून पाणी शेती सिंचना साठी सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष अनिल चव्हाण यांनी निवेदना व्दारे केली आहे  पाऊस लाबल्याने खरीप पिके धोक्यात आली आहे डाव्या कालव्याला पाणी सोडले मग उजव्या कालव्यातील शेतकऱ्यांवर अण्याय का तेव्हा तातडीने उडव्या कालव्या साठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे 

पावसाचे वाहुन जाणारे कोकणातील पाणी पच्छिम महाराष्ट्रात वळवणार-मुख्यमंत्री शिंदे

Image
कोकणातील पाणी पच्छिम महाराष्ट्रात वळवणार   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -  गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे  'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार  बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, आ.किरण लहामटे, आ.प्रा.राम शिंदे, आ.आशुतोष काळे, आ.सत्यजित तांबे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, महानंदाचे अध्यक्ष रा...

झी च्या रुपाने राहुरीचा जयेशआवाज साता समृद्रा पार

Image
राहुरीच्या बाल गायक जयेश आवाज साता समृद्रा पार पोहचला!!! @पत्रकार शिवाजी घाडगे  सारे. ग .म. प. ला घेऊन राहुरीचा आवाज बाल गायक जयेशच्या रुपाने महाराष्ट्र भर गाजला . संध्या झी च्या पडद्यावर लिटील चॅम्प्स सा रे ग म प चा सुरेल आवाजाच्या सुरावर प्रेक्षक तल्लीन झाले आहेत एके काळी आळदीची कार्तीकी गायकवाड ने घागर घेऊन धुमाकुळ घातला होता तीने लहान वयात प्रेक्षकांना भुरळ घातली होती त्या नंतर आनेक बाल कलाकार या पॅल्ट फार्म वर येऊन गेले असाचा बुधवारी रात्री वाजुळ पोही ता .राहुरी जि- नगर येथील  बाल गायक जयेश खरे वय 12 याने वाट दुसुदेरे देवा हे गाणे गाऊन सगळ्यांच्या मनातील वाटेचे भाव देवा पर्यत पोहचवले काहीना वाट सापडत नाही तर काहीची सापडलेल्या वाटा विस्कटत असतात मी या वाटेवर पुन्हा येईल अथवा माझ्या वाटेला कोणी जाऊ नका प्रतेकालाच वाट दिसायला हवी व दिसलेल्या वाटेवर जीवनाची सहल आनंद व्हायला जयेश सारखा बाल गायक आर्क यातना ईश्वराला करतोय वाजुळ पोहीत पारे याच्या कडुन शिक्षण घेतलेला जयेश एकदम महागुरु जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या पुढे व ज्यांनी महाराष्ट्र तील प्रतेकाच्या ओठावर हसु व ...

सागर ची आत्महत्या

पत्नी व सासुचा खुनी सागरची देखील आत्महत्या  कात्रज येथे पहाटे पत्नी व सासूच्या डोक्यात पहार घालुन खुन करणारा सागर साबळे यांने देखील एम आय डी सी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले आहे यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणाचे जीवन संपुष्टात आले आहे    बुधवारी पहाटे  कात्रड येथे   पत्नी नुतन सागर साबळे वय 23 व तीची आई सुरेखा दिलीप दांगट वय 45 यांना सागर याने पहारेच्या साह्य़ाने जीवे ठार मारुन पसार झाला होता त्याचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आहे  राहुरीचे पोलीस निरीक्षक या घटने बाबत म्हणाले की प्रथम दर्शनी ही घटना कुटुंबीक कल्हातुन झाल्याचे प्रथम दर्शनी दिवस असले तरी यात आणखी काही आहे याचा तपास सुरु आहे माय लेकीचा मृतदेह शव विच्छेदना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे  "सागर याने आपली दोन वर्षाची मुलगी आपल्या नातेवाईका कडे पहाटे दिली व मी पुन्हा येतो अस सागुन तो घरा बाहेर घाई गडबडीत पळाला मात्र दुपारी त्याचा मृतदेह आत्महत्या केलेल्या स्थितीत एम आय डी सी परिसरात आढळला

माय लेकीचा खुन

Image
माय लेकीला जावयाने जीवे मारले  बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  घर जावायाने  बायको व सासूला डोक्यात पहार घालुन जीवे ठार मारले मंगळवारी धोड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस होता जावयाला गोड धोड जेवणाची मेजवानी सासुर वाडीला देण्याची पध्दत रुढ आहे मात्र एका माथे फिरु जावयाने आपल्या बायकोला व सासुला पहार डोक्यात घालुन ठार केले आहे आई व मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पडून होत्या   राहुरी तालुक्यात बुधवारी पहाटे ही घटना कात्रड येथे उघडकीस आली  पत्नी नुतन सागर साबळे वय 23 व तीची आई सुरेखा दिलीप दांगट वय 45 असे ठार झालेल्या नावे असुन  घर जावाई म्हणून राहत असलेल्या सागर याच्यावर सशय आहे  त्याने आपली दोन वर्षाची मुलगी नातेवाईका कडे देऊन पसार झाला असून पोलीस घटना स्थळावर पोहचले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजय जाधव हे करीत आहेत श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले आहे 

सर्वांगिण विकासा साठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Image
सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील   जिल्ह्याच्या विकास करणे हाच आपला ध्यास आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास , नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवुन सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या विकासासाठी जिल्हावासियांनी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आवाहन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.       भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री  विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.      यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळ...

महात्मा फुले विद्यापीठात झेंडावंदन

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न विद्यार्थी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करावे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळ पर्वात आहोत. देशाला स्वांतत्र्य मिळण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य विरांनी आपले बलिदान दिले आहे. हा देश घडविण्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक थोर पुरुषांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने मोठी प्रगती केली आहे. 6 ते 7 दशकात आपला देश अन्नधान्य आयात करत होता. आता आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण होवून इतर देशांना अन्नधान्य निर्यात करत आहोत. आपले यान चंद्राकडे झेपावत आहे, आयटी क्षेत्रात आपण भरारी घेत आहोत. विद्यार्थी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करावे असे आवाहन ध्वजारोहन प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 77 वा स्व...

माजी प्राचार्य भागवत ढूमने काळाच्या पडद्या आड

Image
माजी प्राचार्य भागवत ढुमने यांचे स्वातंत्र्य दिनी दुःखद निधन झाले असुन  गेली 36वर्ष आध्यापन क्षेत्रात त्याचे मोठे योगदान होते  राहुरी फॅक्टरी गुरुकुल वसाहत येथील प्रा.भागवत छगनराव ढुमणे वय (८३) यांचे स्वातंत्र्य दिनी मंगळवारी दि.१५/०८/२०२३ सकाळी ८:०० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.         त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 13 वाजता प्रसादनगर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे  त्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्दश विद्यालय ब्राम्हणी येथे प्राचार्य म्हणून सेवा केली  त्याच्या पच्छात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे संत ज्ञानेश्वर विद्यालयतील सेवक पंकज  व कृषी अधिकारी अशितोक्ष,मुलगी नुतन यांचे ते वडील होत 

ज्वालावर पेट्रोल हल्ला

Image
ज्वालाला पेटवण्याचा डाव  @पत्रकार शिवाजी घाडगे  तंटामुक्त गांव ची कमान काढुन टाका  बहुतांशी गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अशा कमानी आपल्या दिमाखात उभ्या असलेल्या पाहिल्या की आपले उर भरून येते मात्र या कमानी आता उतरवण्याची गरज निर्माण झाली आहे कारण राहुरी स्टेशन येथे शनिवारी रात्री साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक निसार सय्यद यांच्या घरावर पेट्रोल च्या पॅलस्टीक पिशव्या टाकून घर पेटवण्याचा डाव हाणून पाडण्यात आला असला तरी हा प्रकार नक्कीच गंभीर आहे कुटुंब जागे होते म्हणून पेटवली वहाने विझवण्यात आली सय्यद निसार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा तपास दिवसभर अधारात होता राहुरी ही अतिशय शांत व चांगला तालुका मानला जायचा आता मात्र तसे राहीले नाही निर्भिड पत्रकारीता दैनिकात करण्याचे दिवस काधीच संपले आहे कारण पेड न्युज घेतल्यावर कोण निर्भिड राहणार सामाजिक प्रश्न हळु कमी होत चालले आहेत कारण भांडवलदार वर्तमान पत्राची चाटु गिरी करणारे कागदी वाघा सारखे जिल्ह्यातील पत्रकारीचा दरारा हळु हळु कमी होत चाललाय काय असे आम जनतेला वाटने सहाजिकच आहे कारण महात्मा गांधी...

कृषी कन्या देह-यात

Image
देहरे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीकन्याचे स्वागत  देहरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले . या कृषीकन्या ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी येथे आल्या असून , गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .  महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय  विळदघाट येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे  यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या पुजा सुरेश लांबे ,मोहिते शुभदा आण्णा , तांबे भैरवी भानुदास, सूर्यवंशी मैथिली दत्तात्रय , लष्करे प्रथमेशवरी संतोष या येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कृषीकन्या पुढील दहा आठवड्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे अनुभव जाणुन गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड , सेंद्रिय शेती  बीजप्रक्रिया , एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, शेतातील अवजारांचा वापर शेतीचे आर्थिक नियोजन , जनावरांचे लसीकरण आदी विषय...

माती व पाणी तपासणी गरजेचे-डाॅ गोरंटीवार

Image
माती व पाणी परिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज - संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार माती व पाणी परिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून शेती निविष्ठांचा वापर काटेकोरपणे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. यासाठी माती व पाणी परिक्षणावरील प्रशिक्षण गरजेचे असून त्याकडे प्रत्येक संस्थेने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मृद विज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसांचे माती व पाणी परिक्षणावर आधारीत सशुल्क प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. या माती व पाणी प्रशिक्षणावर आधारीत पहिल्या प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, माजी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, मृद विज्ञान विभाग प्रमुख व प्रशिक्षणाचे संचालक डॉ. बी.एम. कांबळे, प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. रीतु ठाकरे व डॉ. श्रीगणेश शेळके उपस्थित होते.  यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार पुढे म्हणाले की जी.पी.एस. वर आधारीत माती नमुना घे...