अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभास महंत रामगिरी जाणार ?
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळपास महंत रामगिरी जाणार ? घाडगे न्यूज - प्रतिनिधी महंत नारायणगिरी महाराजां नंतर महंत रामगिरी महाराज अतिशय सुंदर भक्तांचे आध्यात्मिक प्रबोधन करीत आहेत. असे असताना भक्तांनी महंत रामगिरी यांना एका निवेदना व्दारे प्रबोधन केले असून अशोक सहकारी साखर कारखान्यावर महंत रामगिरी यांचा अवमान झाला होता हे महंत रामगिरी कदाचित विसरले असतील मात्र भक्तगण नाही व आता महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अशोकचा गाळप हंगाम सुरु होणार असून रामगिरी याच्या हस्ते गाळप हंगाम शुभारंभ होणार असून याला महंत रामगिरी यांनी जाऊ नये असे त्यांना वाटते ज्याच्या अधिपत्याखाली अशोक चालतो ते महिलीलेवर अन्याय अत्याचार केल्याच्या आरोपा वरून अटक होते. कदाचित साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असल्याने यावर असंख्य ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी कामगार यांचे भवितव्य अवलंबून असल्याने महंत रामगिरी मोठ्या मनाने कार्यक्रमास उपस्थित राहणार असतील मात्र हे उचित आहे का हेच ते पत्र प्रती. प. पू. महंत रामगिरीजी महाराज, मठाधिपती, सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान, ...