यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधरात
स्पाॅट रिपोर्ट @घाडगे न्यूज
मध्यतंरी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभे पिके सडुन गेले हाता तोडाशी आलेले घास पाण्यात गेला
बि-बियाणे खरेदी साठी कर्ज घेतलेले वाढत असून उद्याच्या भरवशावर आज मात्र आता विकायला काही नाही शेतकरी अन्नदाता ची यंदाची दिवाळी अंधारात साजरी केली गेली.
आपल सार गणीत कोलमडून गेले
शेतीतील उत्पादन आदिक होण्या ऐवजी कायम वजावट
शेतात अतिवृष्टीचे पाणी घुसल्याने माती देखील शिल्लक राहीली नाही होत्याच नव्हत झाल दसऱ्याला 150 रुपये किलोने विकली गेलेली झेंडूची फुले आता दिवाळीदा अवघी 50 रुपये किलोने विकली गेली मागच्या दिवाळीत 200 रुपये जोडी विकली जाणारी लक्ष्मी ( शिराई ) अवघी 100 रुपये जोडी होती तर बाजारातुन बत्ताशे गुल झाले .
पणत्या आणायला देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत ज्युन्याच पणत्या
आणि विक्री साठी येणारा कुंभार देखील मातीच्या पणत्या घेऊन येत नाही कारण पणत्या बनवायला माती शिल्लक नाही
कसे बसे किराणा दुकान दाराच्या हाता पाया पडून किराणा आणला त्याने देखील बक्षिसाची कुपणे दिली नाहीत कारण मागचीच उधारी बाकी ना रिबेट ना पेमेंट हा नाचा पाढा कधी दुर होईल अशी अवघड परिस्थिती बळी राज्याची
कधी काळी येथील सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, उस उत्पादक, कामगार, शेतमजूर, व्यावसायिक यांना मोठा आधार होती मात्र गेली काही वर्षा पासुन कारखान्यांच्या चिमणीतुन धुर निघाला नाही ज्यांनी कारखान्याची ही अवस्था केली तेही राहीले नाहीत
सोन्याने भाव गगनाला भिडले मात्र शेतीमाल मातीमोल नेमक चालय काय हे कधी थांबणार आणि हे कोण थांबवणार
फार्मर आयडी झाले सगळेच कागदपत्रर लोड करून झाले अजुन शेतकऱ्यांची ओळख पुसली गेली ती पुराच्या पाण्या मुळे पिकेतर वाहुन गेली पशुधन वाहुन गेले
वसुबारसला झालेला टोणगा जादा दुध पेईल म्हणुन तोडाला मुसकी बांधुन सोडुन द्यावा लागतोय
शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर कोणत्याच आयडीची गरज नाही शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले आज शेतकऱ्याची खिल्ली उडवितात आम्हाला खाऊ घाला मात्र काही मागु नका ही वृत्ती भुज बळावतेय
द्दरीद्री पाटील म्हणुन हिनावते
शेतकऱ्यांचे जीवन हे एक खडतर प्रवास आहे, पण तेच जीवन इतरांना समाधान देते.
मात्र तो शेतकरी समाधानी आहे ?
आज त्याच्या घरा समोर आकाश कदील लागला का नाही हे पाहायला कोणाला वेळ नाही
शेतकरी हा केवळ अन्न निर्माण करण्याचे काम नाही, तर निसर्गाशी जुळलेले एक सुंदर नाते आहे. आपल्या जीवन प्रवासात खडतर कष्टाचे चिज होईल या आशेवर तो जगतो आहे
त्याला आनंदाचा शिधा अथवा मदत नको आहे फक्त त्यांच्या घामाच्या मालाला योग्य दाम हवा आहे सोयाबीन काळी पडल्याने चेहरा काळवडला तर कापसाच्या वाती झाल्या ऊस आडवा झाला
येथील य॔त्रणा उडवा उडवीचे उत्तरे देतेय
नगदी पिकाची हाल विचारायला नको फळ बागेतील फळे गळुण गेली फक्त बाग शिल्लक आहे
आता फक्त समोर अंधार आहे पंती जपून ठेवली ती लावली
आम्ही कशी करणार दिवाळीत
माॅल मध्ये अथवा ऑनलाईन खरेदी कारण आम्ही इंडीयातील गरीब भारतात राहतो येथील रस्त्याना समृध्दी महामार्ग म्हणतात मात्र आमची बैल गाडी अथवा टॅक्टर या रस्त्यावरून जात येत नाही येथील महामार्ग पाच पाच वर्ष पुर्ण होत नाहीत खड्डे बुजवण्यात येथील राज्यकर्त्यांना भुषण वाटते मात्र आपघात प्राण गमावल्याचे काय
तिकडुन तो डोनाल्ड टॅम्प बरळतोय त्यामुळे मोठ मोठ्या उद्योजकांना देखील या दिवाळीच फराळ गोड लागेले नाही
आणि शेअर्स खाली आल्याने गोल्डला अच्छे दिन आलेत मात्र आम्ही फक्त त्या कडे पाहायचे कारण येथे दिवाळी साजरी करायला पैसे नाहीत तर गोल्ड कोठुण खरेदी करणार कोणी काही म्हणत असले तरी शेतकऱ्याची यंदाची दिवाळी मात्र आधारातच गेली
संपुदे अंधार सारा
उजळू आकाशात तारे
गंधाळल्या पहाटेचे
वाहू दे आनंद वारे
जाग यावी सृष्टीला की
माणूस येथला जागा व्हावा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे,
घट्ट व्हावा प्रेम धागा
स्वच्छ सारे मार्ग व्हावे,
मनेही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी
माणसातली अंतर कमी व्हावे
मनातून माणुसकी जागी व्हावी
अंधार येथील निघुन जावा
Comments
Post a Comment