पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी यांचा मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केला गौरव

 पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले नौदलातील अधिकारी साईनाथ गोविंद दळवी यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी गौरव केला आहे 
घाडगे न्यूज @विषेश प्रतिनिधी 
मुंबईतील समुद्रा मार्गे झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले. मुंबईतील समुद्रा मार्गे झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे संपूर्ण जगास समजले की समुद्र मार्गे ही दहशतवादी हल्ला होऊ शकतो. भारतात केंद्र सरकारने या हल्ल्याची तातडीने दखल घेऊन सर्व सागरी यंत्रणा बळकट केली. महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थानिक सागरी घटक म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम, मत्स्य विभाग, सागरी पोलीस स्टेशन, भारतीय नौदल, तटरक्षक दल, बीएसएफ  या सर्व घटकांकडून एकत्र करून संयुक्त प्रभावी सागरी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. सागरी पोलीस घटकाचे पोलीस आयुक्त व सागरी जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक या समितीचे अध्यक्ष असून त्यांचेच मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा प्रभावीपणे करण्यात येत आहे. याच सागरी सुरक्षा यंत्रणेत पोलीस उपनिरीक्षक  साईनाथ दळवी यांची  पोलीस नौका विभाग व सागरी सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. पोलीस उपनिरीक्षक  साईनाथ दळवी हे भारतीय नौदल सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांना सागरी सुरक्षा बद्दल संखोल ज्ञान असल्याने सागरी सुरक्षा मध्ये गेले 14 वर्षापासून कार्यरत आहेत. सागरी सुरक्षा अंतर्गत सर्व सागरी घटकांची विविध अभियान राबविण्यात येतात. 
या अभियानामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. कर्तव्यातील शिस्तबद्धता व  कामसु स्वभावामुळे त्यांचे नेहमीच शासन स्तरावर  कौतुक होते. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ  दळवी यांच्या कर्तव्याची भारतीय तटरक्षक दल यांचे मार्फतीने शासन स्तरावर दखल घेण्यात आली असून त्यांना शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव,  राजेश कुमार यांचे हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवित  
आलेआहे. तसेच इतर सागरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मध्ये महत्वाचे कर्तव्य बजावलेले निवडक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेही यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी हे राहुरी फॅक्टरीवरील भूमिपुत्र असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर