श्रीरामपूरात लढेगे तो जितेगे दादा ताईची लढत लक्षवेधी

श्रीरामपूरात लढेगें तो जितेगे दादा ताईची लढत लक्षवेधी सोबतीला अपक्ष
स्पेशल रिपोर्ट 
घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे 
श्रीरामपूर नगर पालिकेत आगामी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जागे साठी असलेतरी 
येथे  आदिक व ससाणे अशी लढत 
होणार असून अधिकृत पक्षा बरोबर  अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आज मावतील 
 विषेश म्हणजे महिला राखीव नसाला तरी महिला म्हणून राष्ट्रवादीच्या  अनुराधा आदिक यांच सभव्य उमेदवार मानल्या जात आहे 
 काँग्रेस कडुन करण ससाणे तर  दोन प्रमुख उमेदवारांसह  भाजपा कोणता चेहरा देणार 
असे असताना अनेक इच्छुक आपले नशीब आजमावतील 
निवडणूकीत पुन्हा  दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक कुटुंब व दिवंगत माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जंयत ससाणे कुटुंब म्हणजे विद्यमान नगराध्यक्षा अनुराधा  आणि जिल्हा बॅकेचे संचालक करण यांच्यात होणार हे निश्चित असले तरी पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहेत ससाणे हे सर्व मान्य नेतृत्व असले तरी एक मराठा लाख मराठा 
मुळे मागील निवडणुकीत ससाणे यांना पराभव स्विकारावा लागला 
तेव्हा यावेळेस ते तशी सावधानता बाळगतील सोबतीला आमदार हेमंत ओगले असलेतरी ससाणे विरोधात पाॅवरफुल टिम आहे 
श्रीरामपूर नगर पालिकेवर  काँग्रेस चे ३० वर्षा पेक्षा जास्तीचे वर्चस्व असून तसे  काँग्रेस विभक्त झाली अण येथे गोविंदराव यांनी जंयत ससाणे आपलेसे करत त्यांना काॅगेसची उमेदवारी बहाल केली तेव्हा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या समवेत असलेले जंयत ससाणे काँग्रेस कडुन उमेदवारी करत थोड्या फार फरकाने  आमदार म्हणून निवडुन आले मुरकुटे तेव्हा जेष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडुन उभे राहीले माजी आमदार भानुदास मुरकुटे जवळपास १०वर्ष आमदार होते त्यांचा अशोक सहकारी साखर कारखान्या मुळे ग्रामीण भागात चांगले प्रस्त होते मात्र श्रीरामपूर पालिका ताब्यात असल्या मुळे माजी आमदार जंयत ससाणे यांना विजय मिळवणे सोपे झाले जवळपास १०वर्ष ससाणे काँग्रेस चे आमदार राहीले पुढे गोविंदराव आदिक मंत्री असताना त्यांनी जंयत ससाणे यांना साईबाबा संस्थान चे अध्यक्ष केले यामुळेच जंयत ससाणे यांची काँग्रेस वरिष्ठ नेत्यांबरोबर चांगले संबंध आले पुढे श्रीरामपूर मतदार संघ आरक्षित झाला तेव्हा देखील जंयत ससाणे यांनी आपले सहकारी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सलग १०वर्ष काँग्रेस चे आमदार केले नंतर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व  माजी आमदार जंयत ससाणे यांच्यात मतभेद झाले तेसे त्यांच्या दोघात नाही तर बयाबया मध्ये झाले सहाजिकच यांचा तोटा दोघांना बसला तेव्हा काँग्रेस ने शिवसेनेच्या तिकीटावर पराभूत झालेले लहु कानडे यांना तिकीट दिले तेव्हा काँग्रेस चे तिकीट आर पी आय चे जिल्हाअध्यक्ष सुरेंद्र थोरात यांना द्यावे असा आग्रह दलित कार्यकर्ता कडुन होता सुरुवातीला श्रेष्ठी राजी होते मात्र खा रामदास आठवले यांच्या शिर्डीतील लोकसंभा पराभव कारण पुढे करत सुरेंद्र थोरात यांच्या उमेदवारी ची रिक्स काँग्रेसने घेतली नसली तरी स्थानिक उमेदवाराना डावले यांची सल कार्यकर्ते च्या मनात कायम आहेच 
त्यावेळी शिवसेने कडुन निवडणूक लढवलेले 
लहु कानडे यांनी  काँग्रेस कडुन उमेदवारी मिळवली  तेव्हा माजी लहु कानडे यांना  ससाणे गटाची मदत झाली पुढे आमदार झाल्यावर लहु यांनी बाहु फुगवले स्वतंत्र चुल मांडली नंतर मात्र गेली १५ वर्ष आमदारकी साठी राहायला आलेले विद्यमान आमदार हेमंत ओगले यांनी दिल्ली दरबारी आपले राजकीय वजन वापरत काँग्रेस ची उमेदवारी मिळवली अण ते जिल्ह्यात एकमेव काँग्रेसचे आमदार झाले आता आमदार हेमंत ओगले 
व करण ससाणे एकत्र आहेत मात्र ससाणे यांनी मोठे केलेले नेते त्याच्या समोरासमोर विरोधात आहेत व दुसरीकडे दिवंगत नेते जंयत ससाणे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांचा दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत पराभव केला तो एक मराठा लाख मराठा एकीकरणाने तेथे काबळे, मुरकुटे, आदिक व अण्य नेते मंडळी एक होतेच 
 तेव्हा हे श्रीरामपूर ट्रेलर झाले आता देखील तसे झाल्यास करण ससाणे यांना सावध राहवे लागेल बरेच नेते ससाणे यांना जंयत ससाणे यांच्या निधनानंतर बाजुला गेले आहेत यावेळेस माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भुमिका देखील महत्वाची आहेच म्हणा कारण शिंदे शिवसेनेत मुरकुटे आहेत  दिवंगत नेते जंयत ससाणे यांनी कार्यकर्त्याना ताकत दिली होती असे असले तरी काही अंधारातील व्यावहार उजेडात आल्याने त्यांना करण ससाणे यांना सोडचिठ्ठी देण्या शिवाय पर्याय नव्हता माजी आमदार लहु कानडे यांचा पराभव केल्याने आता कानडे देखील त्याचे राजकीय विरोधक आहेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व हिंदु रक्षक सागर बेग शिवसेनेत शिंदे आहेत तसेच प्रकाश चित्ते, अनिल फड, 
 तेव्हा वरकरणी श्रीरामपूर ची निवडणूक जेवढी सोपी वाटते तेव्हडी नाही कारण भाजपा देखील आपला उमेदवार देवु शकते कारण कमळाला देखील लढावे लागेल दुसरीकडे श्रीरामपूर नगर पालिकेत अनुराधा आदिक यांनी जनसंपर्क दांडगा ठेवला आहे आणि श्रीरामपूर शहरात राजकीय पाया मजबूत करण्या साठी पालिका आपल्या ताब्यात ठेवण्या साठी नेते सरावले आहेत असे असले तरी श्रीरामपूरात ससाणे व आदीक आशिच राजकीय फाईट होईल तेव्हा करण ससाणे आपले राजकारण पालिका ताब्यात घेऊन आदिक करतात की अथवा ससाणे यांच्या विरोधाला आदिक अनु करतात हे निकाला नंतर समजेल तो पर्यंत दिवाळी आगोदर खमंग चर्चा होत राहील छोटे मोठे राजकीय फटाके वाजत राहतील 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन